Homeदेश-विदेशमुघल सम्राट दारा शिकोह हा सर्वात सुशिक्षित शासक होता

मुघल सम्राट दारा शिकोह हा सर्वात सुशिक्षित शासक होता

मुघल सम्राट इतिहास: इतिहासाचा जेव्हाजेव्हा उल्लेख होतो तेव्हातेव्हा काही संदर्भ आवर्जून समोर येतात. यापैकी एक मुद्दा म्हणजे मुघल साम्राज्याचा. कैक वर्षे मुघलांनी त्यांचं अस्तित्वं विविध प्रांतांमध्ये टिकवून ठेवलं. इतिहासात नमूद असणाऱ्या संदर्भांनुसार एक काळ होता जेव्हा मुघलांच्या कारकिर्दीला भरभराट आली आणि एक काळ होता जेव्हा उतरती कळा लागून हे साम्राज्य लयास जाताना दिसलं. अनेक इतिहासकारांच्या लिखाणातही याचे संदर्भ आढळतात.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

मुघलांची ओळख…

मुधल साम्राज्य हे त्यांच्या सत्तेचा विस्तार, कलेप्रती त्यांची ओढ आणि प्रशासकीय व्यवस्थेसह अनेक कारणांनी ओळखली गेली. पण, याच साम्राज्याची एक दुर्लक्षित बाजू म्हणजे शिक्षण आणि ज्ञानार्जन. या क्षेत्रांत मुघलांनी बरंच योगदान दिल्याचं म्हटलं जातं. असं म्हणतात की चांगल्या शासनकाळासाठी विद्वान आणि बौद्धिक जाण असणं महत्त्वाचं असून सैन्याप्रमाणंच हे घटकही फार महत्त्वाचे असतात.

वरील कारणास्तव, मुघल दरबारासंदर्भातील काही ऐतिहासिक प्रसंग पाहिले असता तिथं शिक्षक, विद्वान आणि लेखकांचा विशेष आदर केल्याचं पाहायला मिळतं. अली एम अजीज, इरफान हबीब, जेएन सरकार यांसारखे लेखकही या माहितीला दुजोरा देतात, ज्यांनी आपल्या लिखाणातून विविध पुस्तकांमध्ये मुघर दरबारातील परंपरांवर उजेड टाकला आहे.

कशी होती मुघलकालीन शिक्षणव्यवस्था?

मुघल शहजादे हे महालातच शिक्षण घेत असत. फारसी, अरबी, भूगोल, इतिहास, गणित, शास्त्र, साहित्य अशा विषयांचं ज्ञान ते घेत. आग्रा आणि लाहोर ही त्या काळातील दोन महत्त्वाची शैक्षणिक केंद्र होती, जिथं देशोदेशीचते विद्वान येऊन शहजाद्यांना शिकवणी देत.

कोण होता सर्वात विद्वान बादशाह?

असं म्हणतात की, शाहजहांचा सर्वात मोठा मुलगा, दारा शिकोह हा मुघलांच्या इतिहासातील सर्वात विद्वान आणि ज्ञानी शहजादा होता. सत्ता आणि युद्धात त्याला स्वारस्य नव्हतं. याऊलट त्याचा अध्यात्म आणि तत्सम गोष्टींकडे अधिक कल होता. सूफी संतांच्या संपर्कात राहण्यासोबतच दारा शिकोहनं विविध धर्मांविषयीसुद्धा ज्ञान मिळवलं होतं. सर्वधर्म समान असल्याचं त्याचं मत. उपनिषदांचं अध्ययन आणि 50 उपनिषदांचं फारसीमध्ये भाषांतर दारा शिकोहनंच केलं, स्वरचित मज्म-उल-बहरेनमध्ये त्यानं सूफी आणि वेदांतांतील साम्य अधोरेखित केलं. याच कारणास्तवर इतिहासकारसुद्धा त्याच्याकडे सर्वात ज्ञानी, उदारमतवादी आणि प्रगतीशील मुघल बादशाह म्हणून पाहतात.

(वरील माहिती उपलब्ध ऐतिहासिक संदर्भांवर आधारित असून, ही इतिहासकारांची वैयक्तिक मतं आहेत. झी 24तास त्याची खातरजमा करत नाही.)

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!