Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकविश्व सनातन संस्कृतीकडे वळत आहे ! - डॉ. सुधांशू त्रिवेदी

विश्व सनातन संस्कृतीकडे वळत आहे ! – डॉ. सुधांशू त्रिवेदी

दिल्ली शंखनाद महोत्सव : भारताचे सामरिक धोरण !

 

नवी दिल्ली – पूर्वी सनातन संस्कृतीची खिल्ली उडवणारे लोक आता आयुर्वेदाकडे वळत आहेत. रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीकडे वळत आहे. चहा-कॉपीऐवजी ‘हर्बल टी’कडे वळत आहेत. एकेश्वरवादी लोक अनेक देवांवर विश्वास ठेवत आहेत. देशातील १७७ देशांनी भारताच्या ‘योग दिना’च्या ठरावाला संयुक्त राष्ट्र संघात अनुमोदन आहे. मौजमजेत रममाण होणारे युरोपातील देश कुंभमेळ्यामध्ये येत आहेत. हा सनातन संस्कृतीचाच प्रभाव आहे. विश्व हळूहळू सनातन संस्कृतीकडे वळत आहे, हा पालट इतरांना बाधित न करता होत आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी केले. ते नवी दिल्लीतील ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’ आणि ‘सनातन संस्था’ यांच्या वतीने आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त बोलत होते.

गझवा-ए-हिंदला वैचारिक उत्तर देण्यासाठी प्रारंभ करा! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह, ‘रॉ’चे माजी अधिकारी

          या महोत्सवात ‘रणसंवाद – भारताचे सामरिक धोरण’ या परिसंवादात बोलतांना ‘रॉ’चे माजी अधिकारी कर्नल आर.एस.एन. सिंह म्हणाले, “आपल्या देशात अंतर्गतही एक पाकिस्तान आहे. प्रत्यक्ष पाकिस्तानात आपण ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवू शकतो; पण देशांतर्गत पाकिस्तानचे काय करणार? या कट्टरतावादी विचारांपासून आपल्याला धोका आहे. भारतीय राजकारणाचा आपण विचार करताना दिसून येते की, येथील देशद्रोह्यांची साथ घेतली आणि अंतर्गत पाकिस्तान्यांची मदत घेतली की, सत्तेत रहाता येते. आपल्या देशातील अंतर्गत पाकिस्तानी ऑपरेशन सिंदूरमुळे फार दुःखी होतात. त्यामुळेच या ‘गझवा-ए-हिंद’ला वैचारिक उत्तर देण्यासाठी प्रारंभ करा.”

           विंग कमांडर विनायक डावरे म्हणाले“‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी खरी कारवाई झाली. सेनेने अचूक लक्ष साध्य करत यापूर्वी शत्रूवर छोट्या स्वरूपात कारवाई झाल्या. ९३ हजार पाक सैनिकांनी १९७१ च्या युद्धाच्या वेळी शरणागती पत्करली; मात्र नॅरेटिव्हच्या लढाईत आपण हरलो. पूर्व पाकिस्तान (बांगलादेश)ला स्वातंत्र्य ‘मुक्ती बाहिनी’मुळे मिळाले. च या नॅरेटिव्हला त्यावेळी भारताने याला विरोध केला नाही.”

           ब्रिगेडियर (निवृत्त) संजय अग्रवाल म्हणाले, “भारत-चीन १९६२ च्या युद्धाविषयी अनेकदा चर्चा होते, मात्र १९६७ च्या युद्धात भारताने चीनला पराभूत केले होते, हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. भारताने आपली शक्ती जाणावी, यासाठी अशा महोत्सवांची आवश्यकता आहे. देशाने आपले लक्ष्य निर्धारीत करावे.”

           यूथ फॉर पनून काश्मीर’चे अध्यक्ष श्री. राहुल कौल कश्मिरी हिंदूंच्या संघर्षाविषयी सांगताना म्हणाले, “कश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद झाला हे अजूनही सरकार मानायला तयार नाहीत. पर्यटनाने दहशतवाद थांबेल या भ्रमात कोणी राहू नये. जगती जम्मू येथे १६ जानेवारी २०२६ पासून विशेष अभियान सुरु करत आहोत. जम्मू काश्मीरमधील हिंदूंना देशातील सर्व हिंदूंच्या सहकार्याची आवश्यकता आहे.”

           दूरदर्शन (डीडी) न्यूजचे संपादक श्री. अशोक श्रीवास्तव म्हणाले, “‘काही राजकीय नेते हिंदुत्वाला डेंग्यू, मलेरिया, एड्स म्हणतात, तेव्हा प्रसारमाध्यमे शांत बसतात. सध्या इस्लामोफोबियाची चर्चा आहे. प्रत्यक्षात हिंदूफोबिया प्रचंड प्रमाणात आहेत. हिंदूफोबियाविषयी एक अहवाल आहे. भारतात डिसेंबर २०२५ च्या पहिल्या ११ दिवसांत हिंदूंना केवळ ते हिंदू आहेत, म्हणून त्रास देण्याच्या १०४ घटना घडल्या आहेत.”

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!