Homeदेश-विदेशSIPs STP and SWP real money making options Personal Finance Investment Marathi...

SIPs STP and SWP real money making options Personal Finance Investment Marathi News | SIP तर सर्वच करतात STP आणि SWP ठरतेय पैसे वाढवण्याची मशीन, कमाईचं सिक्रेट कोणीच नाही सांगणार!

एसटीपी वि एसआयपी वि एसडब्ल्यूपी: SIP म्हणजे दर महिन्याला किंवा आठवड्याला ठरलेली छोटी रक्कम म्युचुअल फंडात गुंतवणे. याला पगारातून थोडे थोडे बचत करून श्रीमंत होण्याचा सोपा फॉर्म्युला म्हणतात. यात बाजार खाली-वर गेला तरी सरासरी 12% पर्यंत परतावा मिळण्याची शक्यता असते. छोट्या रकमेतून मोठा निधी तयार होतो. कारण येथे कंपाउंडिंगची जादू चालते. म्हणूनच आजकाल प्रत्येक गुंतवणूकदार SIP करतो. पण तुम्ही एसटीपी आणि एसडब्ल्यूपीबद्दल ऐकलंय का? जे तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरु शकतात. काय आहेत नेमक्या योजना? सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

STP चा जादूई फायदा काय?

समजा तुमच्याकडे अचानक 5 ते 10 लाख रुपये एकदम आले पण शेअर बाजारात एकदम टाकायला घाबरताय. मग STP हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही सर्व पैसे सुरक्षित डेट फंडात ठेवता आणि दर महिन्याला 20-50 हजार रुपये हळूहळू इक्विटी फंडात हलवता. यामुळे बाजार कोसळला तरी एकदम नुकसान होत नाही. हा ‘लमसम पैशाची SIP’ असते, ज्यामुळे जोखीम कमी आणि परतावा चांगला मिळतो.

SWP म्हणजे निवृत्तीनंतरचा पगार

SWP म्हणजे सिस्टेमॅटिक विड्रॉवल प्लान. तुम्ही म्युचुअल फंडात मोठी रक्कम गुंतवली असेल आणि आता दर महिन्याला 30-50 हजार रुपये नियमित हवे असतील तर SWP सुरू करा. फंडातून ठरलेली रक्कम आपोआप बँकेत येते. उरलेले पैसे फंडात गुंतलेले राहतात आणि त्यावर परतावा मिळत राहतो. निवृत्त झालेल्या मंडळींसाठी हा एकप्रकारे महिन्याला पगार मिळण्यासारखा पर्याय आहे.

तीनही पर्याय कधी वापरावेत?

नोकरी व्यवसाय करताय आणि भविष्यासाठी बचत हवी तर मग SIP करा.  एकदम मोठी रक्कम आली आणि हळूहळू शेअर बाजारात टाकायची तर STP करा. निवृत्त झालात किंवा दर महिन्याला निश्चित उत्पन्न हवे असेल तर SWP करा.

खास गोष्ट कोणती?

STP आणि SWP हे दोन्ही पर्याय तुम्ही तुमच्याच म्युचुअल फंडात कधीही सुरू किंवा बंद करू शकता. यासाठी नवे फंड किंवा नवे खाते उघडण्याची गरज नाही.

महत्वाचा सल्ला

SIP, STP आणि SWP हे तिघेही एकाच कुटुंबातील भाऊ-बहीण आहेत. तुमच्या पैशाच्या गरजेनुसार कोणता भाऊ किंवा बहीण तुम्हाला जास्त मदत करेल हे ठरवा. पण लक्षात ठेवा – गुंतवणूक करताना तुमची जोखीम घेण्याची क्षमता आणि गरज लक्षात घेऊनच निर्णय घ्या!

(Disclaimer – हा लेख माहितीसाठी देण्यात आलाय. म्युच्यूअल फंड गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधिन असते. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. SIP, STP आणि SWP यात नेमका काय फरक आहे?

उत्तर:  SIP: दर महिना/आठवड्याला ठरलेली छोटी रक्कम म्युचुअल फंडात टाकायची (बचत वाढवण्यासाठी).  STP: एकदमुश्त मोठी रक्कम आधी डेट फंडात ठेवून हळूहळू इक्विटी फंडात हलवायची (जोखीम कमी करून गुंतवणूक करायची).  SWP: आधी गुंतवलेल्या पैशातून दर महिना/तिमाही ठरलेली रक्कम काढायची (नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी).

२. माझ्याकडे अचानक १० लाख रुपये आले तर काय करावे – SIP की STP?

उत्तर: एकदम १० लाख शेअर बाजारात टाकणे धोक्याचे आहे. त्याऐवजी STP करा: सर्व पैसे सुरक्षित डेट फंडात ठेवा आणि दर महिन्याला ५०-७५ हजार रुपये इक्विटी फंडात हलवा. असे केल्याने बाजार कोसळला तरी एकदम नुकसान होणार नाही आणि चांगला सरासरी परतावा मिळेल.

३. निवृत्तीच्या वेळी दर महिन्याला ४०-५० हजार रुपये उत्पन्न हवे असेल तर काय करावे?

उत्तर: तुम्ही आधीच चांगला कॉर्पस (उदा. १-२ कोटी) म्युचुअल फंडात) तयार केला असेल तर SWP सुरू करा. दर महिन्याला ४०-५० हजार रुपये काढण्याची सोय करा. उरलेले पैसे फंडात गुंतलेले राहतील आणि त्यावर परतावा मिळत राहील. यामुळे तुम्हाला दुसरा ‘महिन्याचा पगार’ मिळेल आणि मूलभूत रक्कमही जास्त काळ टिकेल.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!