Homeदेश-विदेशभारतीय लष्कराच्या शस्त्रास्त्राच सामर्थ्य तर पाहा, 33 ग्रेमचा Nano drone तर खूपच...

भारतीय लष्कराच्या शस्त्रास्त्राच सामर्थ्य तर पाहा, 33 ग्रेमचा Nano drone तर खूपच कमाल


भारताची वाढती लष्करी शक्ती: जागतिक स्तरावर अनेक देश आपल्या लष्करी खर्चात वाढ करत असून लष्करी सामर्थ्य वाढवत आहेत. तसेच भारताचे लष्करी सामर्थ्यदेखील काही कमी नाही. भारताच्या शस्त्रागारात एकाहून एक शस्त्र आणि उपकरणे आहेत. असाच एक दमदार उपकरण आहे ब्लॅक हॉर्नेट नॅनो ड्रोन  (Black Hornet Nano drone).  जम्मू आणि काश्मीरमध्ये या उपकरणाने दहशतवाद्यांच्या नाकी नऊ करुन ठेवलंय. सीमा ओलांडणारे घुसखोर असोत किंवा इमारतीत लपलेले दहशतवादी असोत, फक्त 33  ग्रॅम वजनाचा हा काळी चिमणी म्हणून ओळखला जाणारा ड्रोन शत्रूच्या छोट्या छोट्या ठिकाणांमध्ये शांतपणे घुसतो आणि सैनिकांना संपूर्ण माहिती पुरवतो. त्यानंतर सैन्य कारवाई सुरू करते आणि कोणतीही जीवितहानी न होता दहशतवाद्यांना ठार मारते.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

इतक्या कमी तापमानतही करेल काम
हा गुप्तचर पक्षी म्हणजेच ब्लॅक हॉर्नेट, ज्याला नॅनो ड्रोन असेही म्हणतात, भारतीय लष्कराच्या विशेष दलाच्या ताफ्याचा भाग आहे. हे ड्रोन काश्मीर आणि लडाखच्या सर्वात उंच भागातही काम करण्यास सक्षम आहे.
ब्लॅक हॉर्नेट – 10 अंश ते 49 अंश तापमानात काम करू शकते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लष्कराच्या विशेष दलांनी अखनूरमधील बट्टल येथील सीमेजवळील एका मंदिरात लपलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी ब्लॅक हॉर्नेटचा वापर केला होता.

2023 मध्ये लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट
जम्मू आणि काश्मीरमध्ये, हे छोटे नॅनो-ड्रोन विशेष दलांना विशेष ऑपरेशन्स करण्यास सक्षम करत आहेत. लष्कराच्या आधुनिकीकरण प्रक्रियेचा एक भाग म्हणून, दहशतवादविरोधी ऑपरेशन्समध्ये गुंतलेल्या बटालियनना हे ड्रोन पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

2023  मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यात हे ड्रोन समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासून, दहशतवादविरोधी कारवायांमध्ये त्याचा नियमितपणे वापर केला जात असून अखनूरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात लष्कराच्या विशेष दलांनी या ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवले.

ब्लॅक हॉर्नेटची वैशिष्ट्ये पाहुन व्हाल थक्क

1. हे ड्रोन नॉर्वेमध्ये डिझाइन करण्यात आले आहे. त्याचा डिस्प्ले वजन 586  ग्रॅम, हँड कंट्रोल 104 ग्रॅम आणि बेस स्टेशन 526 ग्रॅम आहे. ते 25 मिनिटे हवेत राहू शकते आणि त्यात 64 जीबी स्टोरेज आहे.

2. हे ड्रोन असे कॅमेरे लावलेले आहेत जे एचडी  फोटो कॅप्चर करू शकतात आणि लाईव्ह व्हिडिओसुद्धा प्रसारित करू शकतात.

3. नॅनो ड्रोन चालवणारे लष्करी कर्मचारी मनीष गुरुंग यांनी स्पष्ट केले की हे आवाजदेखील करत नाही. लपलेल्या दहशतवाद्याच्या तीन मीटरच्या आत आले तरी तो सापडत नाही. हे ड्रोन नियंत्रण कक्षाला दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांची अचूक माहिती देते, ज्यामुळे ऑपरेशन्स करणे खूप सोप्पे झाले आहे.

4 .हे ड्रोन एका लहान हेलिकॉप्टरसारखे दिसते, ज्यामध्ये जुळे रोटर्स आहेत आणि त्याची उडण्याची श्रेणी सुमारे दोन किलोमीटर आहे.

5. ड्रोनचे ग्राउंड कंट्रोल स्टेशन (GCS) युनिट तुमच्या हातात धरता येईल इतके लहान आहे.

6. ड्रोन एका एन्क्रिप्टेड सिग्नलचा वापर करून उडवला जातो.

7. हे ड्रोन स्कायलाइट्स, खिडक्या आणि दरवाज्यांमधून सहजपणे आत प्रवेश करते आणि संपूर्ण माहिती झटपट देते.

8. नैसर्गिक आपत्तींमध्ये अडकलेल्या लोकांबद्दल अचूक माहिती देण्यासही हे ड्रोन सक्षम आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. ब्लॅक हॉर्नेट ड्रोन कुठे आणि कसे वापरले जाते?

जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखच्या उंच भागात दहशतवादविरोधी कारवायांसाठी याचा वापर होतो. हे ड्रोन खिडक्या, दरवाजे किंवा स्कायलाइट्समधून शांतपणे प्रवेश करून शत्रूंची अचूक माहिती पुरवते.

2. भारतीय लष्कराने हे ड्रोन केव्हा समाविष्ट केले?

2023 मध्ये भारतीय लष्कराच्या विशेष दलांनी जम्मू आणि काश्मीरमधील ताफ्यात ब्लॅक हॉर्नेट नॅनो ड्रोन समाविष्ट केले.

3. या ड्रोनचा उपयोग कशासाठी होतो?

  • दहशतवाद्यांचे ठिकाण शोधणे.

  • गुप्तचर माहिती गोळा करणे.

  • लाइव्ह व्हिडिओ आणि एचडी फोटोद्वारे माहिती पुरवणे.

  • नैसर्गिक आपत्तींमध्ये अडकलेल्या लोकांचे ठिकाण शोधणे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मुंबई राजभवन SRPF जवानाची ड्युटीवर आत्महत्या; पोलीस तपास

0
मलबार हिल येथील अत्यंत सुरक्षित आणि 'व्हीआयपी' समजल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात...

TMC ने EC ला 2027 पर्यंत समित्या वैध घोषित केल्या

0
नवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे...

7 जुलै रोजी वक्री बुध राशी बदलेल:5 ऑगस्टपर्यंत बुध मिथुन राशीत राहील, जाणून घ्या...

0
बुध सध्या वक्री आहे, म्हणजेच हा ग्रह मागे सरकत आहे. 7 जुलै रोजी वक्री बुध कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जुलैपर्यंत...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...
spot_img

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...
error: Content is protected !!