Homeदेश-विदेशजागतिक युद्ध यूएस व्हेनेझुएला तणाव गेराल्ड फोर्ड विमानवाहू वाहक हल्ला यूएस लष्करी...

जागतिक युद्ध यूएस व्हेनेझुएला तणाव गेराल्ड फोर्ड विमानवाहू वाहक हल्ला यूएस लष्करी तैनाती युद्ध चिन्हे


जागतिक बातम्या: अमेरिका हा आर्थिक महासत्ता असणारा देश सध्या कैक कारणांनी चर्चेत असून, सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या या देशाचं नाव एका अतिशय तणावग्रस्त विषयामुळं चर्चेच आलं आहे. व्हेनेज्युएलाशी वाढते ताणावपूर्ण संबंध पाहता अमेरिकेनं आता संघर्षासाठीची पूर्ण तयारी दाखवली आहे. हल्ल्यासाठी आपण सज्ज असल्याचं दाखवत या देशाकडून कॅरेबियन क्षेत्रात ट्रम्प यांच्या देशाकडून युद्धनौका, लढाऊ विमानं तैनात करण्यात आली आहेत. शुक्रवारीच ट्रम्पप यांनी हे लष्कर आणि त्यांच्या हालचाली अतिशय नाटकीयरित्या वाढवत ‘यूएसएस जेराल्ड फोर्ड’ ला लॅटिन अमेरिकेत पाठवण्याचे आदेश दिले.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अमेरिकेकडून उचलली जाणारी ही पावलं पाहता याकडे वॉशिंग्टनमधील आतापर्यंतच्या सर्वाधिक सशस्त्र लष्करी कारवाईच्या दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. कॅरेबियन क्षेत्रात अमेरिकी सैन्याची उपस्थिती वाढवण्याच्या ट्रम्प यांच्या योजनेचाच हा भाग समजला जात आहे. ज्यामध्ये 8 वाढीव युद्धनौका, 1 अण्वस्त्र सुसज्ज पाणबुडी, एफ 35 लढाऊ विमान यांचा समावेश आहे.

जागतिक युद्धनिती आणि राजकारणातील जाणकारांच्या माहितीनुसार अमेरिकेच्या मनसुब्यांबाबत चिंतेत भर टाकणारं ठरू शकतं. ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखालील अमेरिकी सरकारनं मागील बऱ्याच काळापासून मादुरो यांच्या नेतृत्त्वाअंतर्गत व्हेनेज्युएलातील सरकारवर अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना शणर देणं आणि लोकशाही संस्थांचं खच्चीकरण करण्याचे गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळं आता या दोन देशांमधील तणाव आणखी पेटण्याची शक्यता आहे.

लढाऊ विमानं तैनात होणं म्हणजे…

पेंटागनचे प्रवक्ते सीन पर्नेलयांनी X च्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, ‘युएस साऊथकॉम क्षेत्रात वाढलेल्या अमेरिकी लष्कराच्या उपस्थितीमुळं आमच्या सैन्यात वाढ होईल, जेणेकरून त्यांच्या हालचाली आमच्या लक्षात येतील. अमेरिकी सुरक्षा आणि पश्चिमी गोलार्धातील शांतता भंग करु पाहणाऱ्यांना यामुळं नक्कीच धोका असेल, कारण त्यांना आम्ही वेळीच थांबवू आणि त्यांचा खात्मा करु.’

आंतरराष्ट्रीय स्तरावर एका गंभीर प्रकरणानं चिंतेत भर, युद्धाचं सावट

अमेरिका आणि व्हेनेज्युएलामध्ये वाढलेला हा तणाव पाहता आता एक नवं युद्ध पेट घेणार का? हीच चिंता जगातील इतर राष्ट्रांना सतावत आहे. कारण ठरत आहे ते म्हणजे अमेरिकेकडून करण्यात आलेली जगातील सर्वात मोठ्या लढाऊ नौकेची तैनाती. 2017 मध्ये सेवेत आलेलं युएस देराल्ड फोर्ज हे अमेरिकेचं सर्वात नवं आणि जगातील सर्वात मोठं लढाऊ युद्धपोत असून, ज्यावर 5000 हून अधिक सैनिक, नाविक आणि 75 लढाऊ विमानं तैनात आहेत. कथित स्वरुपात यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून अमेरिकी सैन्यानं कॅरेबियन समुद्रात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या जहाजांवर 10 हवाई हल्ले केले होते. ज्यामध्ये 40 जणांचा मृत्या झाला. पेंटागननं यांदर्भातील फार माहिती दिली नसली तरीही मारल्या गेलेल्यांमध्ये अनेकजण व्हेनेज्युएलाचे होते हे मात्र सांगिचलं. दरम्यान व्हेनेज्युएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी सातत्यानं ट्रम्प, अमेरिका आपल्याला या पदावरून हटवण्यासाठी कट रचत असल्याचं म्हटल्यानं या तणावात आणखी भर पडली आहे.

वॉशिंग्टनमध्ये मादुरो यांच्या अटकेसाठी मदत करणाऱ्यांना 5 कोटी डॉलर इतकं बक्षीस मिळणार असल्याचं सांगण्यात आलं. तर, अमेरिकेनं त्यांच्यावर अमली पदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारी कृत्यांना पाठिंबा देणयाचे आरोप लावले. मादुरो यांनी मात्र ते फेटाळून लावले. फक्त व्हेनेज्युएलाच नव्हे, तर कोलंबियासोबतही अमेरिकेच्या नात्यात मीठाचा खडा पडल्यानं आता या तणावाच्या परिस्थितीत अमली पदार्थ तस्करीचा मुद्दा आणखी किती धुमसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

अमेरिका आणि व्हेनेज्युएलामधील वाढत्या तणावाची मुख्य कारणे काय आहेत?
अमेरिका व्हेनेज्युएलाच्या राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्या सरकारवर अमली पदार्थांची तस्करीला प्रोत्साहन देणे, लोकशाही संस्थांचे खच्चीकरण करणे आणि गुन्हेगारी कृत्यांना पाठिंबा देण्याचे गंभीर आरोप करत आहे. ट्रम्प प्रशासनाने मादुरो यांच्या अटकेसाठी ५ कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले असून, व्हेनेज्युएलाकडून अमेरिकेला ‘कट रचण्याचा’ आरोप आहे.

अमेरिकेने कॅरेबियन क्षेत्रात कोणत्या लष्करी हालचाली केल्या आहेत?
ट्रम्प यांच्या आदेशानुसार, अमेरिकेने कॅरेबियन समुद्रात युद्धनौका, लढाऊ विमाने आणि इतर सैन्य तैनात केले आहेत. यात ८ वाढीव युद्धनौका, १ अण्वस्त्र-सुसज्ज पाणबुडी आणि F-35 लढाऊ विमाने समाविष्ट आहेत. शुक्रवारी (२४ ऑक्टोबर २०२५) ‘यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड’ ही जगातील सर्वात मोठी आणि नवीनतम विमानवाहू युद्धनौका लॅटिन अमेरिकेत पाठवण्यात आली.

पेंटागनच्या प्रवक्त्याने काय म्हटले आहे?
पेंटागनचे प्रवक्ते सीन पर्नेली यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर सांगितले की, यूएस साऊथकॉम क्षेत्रात वाढलेल्या अमेरिकी सैन्य उपस्थितीमुळे सैन्यात वाढ होईल आणि शत्रूंच्या हालचाली लक्षात येतील.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!