Homeदेश-विदेशओला उबेरशी स्पर्धा करणार भारतातील पहिली स्वदेशी टॅक्सी सेवा, जाणून घ्या भारत...

ओला उबेरशी स्पर्धा करणार भारतातील पहिली स्वदेशी टॅक्सी सेवा, जाणून घ्या भारत टॅक्सी कशी आहे


ओला उबेरशी भारत टॅक्सी कशी स्पर्धा करेल: कित्येक वर्षांपासून देशात ओला-उबेरचे साम्राज्य आहे. अॅप आधारित टॅक्सी सेवांची दादागिरी या काही वर्षात वाढली आहे. कधी अचानक भाडेवाढ तर कधी राईड रद्द करणे. तर कधी सर्ज प्रायसिंगच्या नावाने लूट. या अॅप आधारित टॅक्सी फक्त ग्राहकांचीच नाही तर ड्रायव्हरलादेखील मनस्ताप होतो. त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा खासगी कंपन्यांच्या कमीशनमध्ये जातो. मात्र आता लवकरच हे चित्र बदलणार आहे. भारत सरकारने टॅक्सी नावाने देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

भारत टॅक्सी ही कोणतीही परदेशी कंपनी नाहीये तसंचकोणतीही कॉर्पोरेट प्रकल्पदेखील नाहीये. तर, ही चालकांची एकप्रकारची संस्था असणार आहे. ही संस्था केंद्रीय सहयोग मंत्रालय आणि नॅशनल ई गव्हर्न्स डिव्हीजनअंतर्गंत विकसित करण्यात येणार आहे. ज्यामुळं देशभरातील चालकांना त्यांच्या मेहनतीचा पूर्ण सन्मान आणि प्रवाशांना खात्रीलायक सेवा मिळणार आहे.

भारत टॅक्सीचे वैशिष्ट्यै म्हणजे यात ड्रायव्हरना त्यांच्या कमाईचा पूर्ण अधिकार मिळणार आहे. त्यांना कंपनीला 20-25 टक्के कमिशन द्यावे लागणार नाही. त्या व्यतिरिक्त फक्त सदस्यत्वाची नोंदणी द्यावी लागेल. तीदेखील दैनिक, साप्ताहिक किंवा महिन्याला भरावी लागणार. हे मॉडेल पूर्णपणे सहकारी भावनावर आधारित आहे. इथे प्रत्येक सदस्य भागीदार आणि मालक व लाभार्थी असणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसारया मॉडेलमुळं फक्त चालकांची आर्थिक सुबत्ता तर वाढणारच आहे पण त्याचबरोबर स्वावलंबी देखील वाढणार आहे.

प्रत्येक टॅक्सीमध्ये जीपीएस ट्रॅकिंग, रीअल वेळ देखरेख आणि 24*7 हेल्पलाइन यासारख्या सुविधा असणार आहेत. प्रवाशांना ड्रायव्हरचे नाव, फोटोवाहन क्रमांक आणि भाडे बुकिंग करतानाच अॅपमध्ये दिसणार आहेत. भारत टॅक्सीचा पायलट प्रकल्प नोव्हेंबर 2025 पासून दिल्लीत सुरू होणार आहे. येथे 650 टॅक्सी आणि त्यांचे मालक-चालक या मिशनमध्ये सहभागी होती. डिसेंबरमध्ये ही सेवा मुंबई, पुणे, भोपाळ, लखनौ आणि जयपूरसारख्या शहरात सुरू होणार आहे. सरकारचे लक्ष्य आहे की 2026पर्यंत भारत टॅक्सीची सेवा सर्व प्रमुख मेट्रो शहरात सक्रीय करावी. 2030 पर्यंत देशभरातील 1 लाख चालकांना जोडण्यात यावे.

जून 2025 मध्ये, सरकारने भारत टॅक्सी चालविण्यासाठी सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेडची स्थापना केली. हा उपक्रम ₹300 कोटींच्या सुरुवातीच्या भांडवलासह सुरू करण्यात आला. त्यावर कोणत्याही खाजगी मालकाचे नियंत्रण राहणार नाही, परंतु प्रत्येक सदस्य चालक सह-मालक असेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!