Homeदेश-विदेशदिवाळीत चांदीच्या किमती स्वस्त झाल्यामुळे विक्रमी उच्च युटिलिटी मराठी बातम्यांमधून 8 टक्क्यांनी...

दिवाळीत चांदीच्या किमती स्वस्त झाल्यामुळे विक्रमी उच्च युटिलिटी मराठी बातम्यांमधून 8 टक्क्यांनी घसरण झाली


चांदीच्या किमती: दिवाळीच्या उत्सवकाळात चांदीच्या किमती गगनाला भिडल्यानंतर आता या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होतेय. 17 ऑक्टोबर रोजी एमसीएक्सवर चांदीच्या वायद्यांमध्ये जवळपास 10% ची घसरण नोंदवली गेली. ज्यात प्रति किलो 170415 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून भाव 153700 रुपयांपर्यंत खाली आले. जागतिक बाजारातही 6% घसरण होऊन प्रति औंस 54 डॉलरांवरून ५51.5 डॉलरांवर स्थिरावले. ही घसरण चांदीच्या सर्वकालीन उच्चांकापासून 8% इतकी आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

का वाढलेली किंमत?

गेल्या काही महिन्यांत चांदीला सुरक्षित गुंतवणुकीचा दर्जा मिळाला, ज्यामुळे किंमती सतत वाढत होत्या. औद्योगिक क्षेत्रातील वाढती गरज, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि सौर ऊर्जा क्षेत्रात चांदीचा वापर वाढला असून, पुरवठ्यातील कमतरतेमुळेही भाव उंचावले. मात्र, शुक्रवारी उलट स्थिती पाहायला मिळाली. ज्यात अमेरिका-चीन व्यापारी तणाव कमी होण्याच्या बातम्या समोर आल्या आणि गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील 100% अतिरिक्त कर “दीर्घकालीन नसल्याचे” कबूल केले आणि सुरक्षित धातूंची मागणी घटली.

नफावसुलीचा मुख्य धागा काय?

ट्रम्प यांच्या विधानानंतर गुंतवणूकदारांनी चांदीतील नफा काढण्यास सुरुवात केली होती. ज्यामुळे भावांवर दबाव आला. एमसीएक्सवर शुक्रवारी भाव खाली येऊन बंद झाल्यानंतर सोमवारी 20 ऑक्टोबर रोजी 0.1% वाढ होऊन प्रति किलो 156755 रुपयांवर पोहोचले. ही घसरण बुलियन बाजारातील सामान्य नफावसुलीचे लक्षण आहे. ज्यात अल्पकाळातील तेजी नंतर स्थिरतेकडे वळते. जागतिक बाजारातही हीच स्थिती दिसून आल्याचे पाहाला मिळत आहे.

तज्ज्ञांचे मत काय?

ही घसरण बाजारातील नफावसुलीमुळे झाली असून, चांदीच्या संरचनात्मक बदलांमुळे भविष्यात किंमती जास्त राहतील, असे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालात म्हटलंय. ‘औद्योगिक मागणी मजबूत असून, पुरवठ्यातील अडथळे कायम आहेत, ज्यामुळे उत्पादन वाढवण्यासाठी उच्च भाव आवश्यक आहेत, असे तज्ज्ञ सांगतात. 1980 आणि 2011 च्या तेजीशी तुलना केल्यास सध्याची वाढ मागणीवर आधारित आहे. ज्यात चांदी सोन्यापेक्षा 1.7 पट वेगाने चढ-उतार होतेय, असे तज्ञ सांगतात.

गुंतवणूकदारांसाठी संधी

ही घसरण चांदी खरेदी गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी ठरू शकते. कारण भविष्यात दीर्घकालात औद्योगिक वापर वाढेल. असे असले तरी जागतिक व्यापारी घडामोडींवर तुम्हाला नजर ठेवावी लागेल. दिवाळीतील ही घसरण गुंतवणूकदारांना सतर्क करणारी आहे. ज्यात अल्पकाळातील अस्थिरता असली तरी भविष्यातील तेजीची शक्यता कायम आहे. चांदीचे भाव स्थानिक कर आणि जागतिक चलनावर अवलंबून राहतील, असेही तज्ञ सांगतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१. दिवाळीच्या काळात चांदीच्या किमतीत काय बदल झाले?

दिवाळीच्या हंगामात चांदीच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर मोठी घसरण अनुभवली. १७ ऑक्टोबर रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या वायद्यांमध्ये १०% घसरण होऊन किंमत प्रति किलो १,७०,४१५ रुपयांवरून १,५३,७०० रुपयांवर आली. जागतिक बाजारातही ६% घसरण होऊन प्रति औंस ५४ डॉलरवरून ५१.५ डॉलरवर भाव स्थिरावले. सोमवारी, २० ऑक्टोबरला ०.१% वाढ होऊन प्रति किलो १,५६,७५५ रुपये झाले, पण एकूण ८% घसरण कायम आहे.

२. चांदीच्या किमतीत घसरणीमागील कारणे काय आहेत?

अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव कमी होण्याच्या बातम्यांमुळे गुंतवणूकदारांनी चांदीत नफा बुक केला, ज्यामुळे किमतींवर दबाव आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील १००% अतिरिक्त कर दीर्घकालीन नसल्याचे सांगितल्याने सुरक्षित गुंतवणुकीची मागणी घटली. यामुळे बुलियन बाजारात नफावसुली सुरू झाली. याशिवाय, सणासुदीच्या हंगामानंतर भौतिक मागणी कमी होणे हेही एक कारण आहे, ज्यामुळे अल्पकालीन घसरण दिसून आली.

३. तज्ज्ञांच्या मते, चांदीच्या किमतीचा भविष्यातील दृष्टिकोन काय आहे?

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या मते, ही घसरण नफावसुलीमुळे झाली असली तरी चांदीच्या बाजारात संरचनात्मक बदल होत आहेत. औद्योगिक मागणी, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि सौर ऊर्जा क्षेत्रात वाढ, तसेच पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे दीर्घकाळात किमती जास्त राहण्याची शक्यता आहे. तज्ज्ञ सांगतात की, चांदी सोन्यापेक्षा १.७ पट वेगाने चढ-उतार करते, आणि सध्याची तेजी मागणीवर आधारित आहे. गुंतवणूकदारांसाठी ही घसरण खरेदीची संधी ठरू शकते, परंतु जागतिक व्यापारी घडामोडींवर लक्ष ठेवावे लागेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!