Homeदेश-विदेशपूर मदत म्हणून अमित शहा यांनी कर्नाटक महाराष्ट्राला 1950 कोटी रुपयांची आगाऊ...

पूर मदत म्हणून अमित शहा यांनी कर्नाटक महाराष्ट्राला 1950 कोटी रुपयांची आगाऊ मदत मंजूर केली


अमित शहा यांनी 1950 कोटी रुपये आगाऊ दिले. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 2025-26 या वर्षासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य सरकारांना एसडीआरएफच्या केंद्रीय हिश्श्याचा दुसरा हप्ता म्हणून 1950.80 कोटी रुपये आगाऊ मंजूर करण्यास मान्यता दिली आहे. या वर्षी नैऋत्य मान्सूनमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना तात्काळ मदत करण्यासाठी या राज्यांना मदत करण्यासाठी 1950.80 कोटी रुपयांच्या एकूण रकमेपैकी 384.40 कोटी रुपये कर्नाटकसाठी आणि 1566.40 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सर्वतोपरी मदत करण्यास वचनबद्ध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध असल्याचं म्हटलं आहे.

27 राज्यांना केंद्र सरकारने दिला निधी

या वर्षी, केंद्राने एसडीआरएफ अंतर्गत 27 राज्यांना 13603.20 कोटी रुपये आणि एनडीआरएफ अंतर्गत 15 राज्यांना 2189.28 कोटी रुपये आधीच जारी केले आहेत. याशिवाय, राज्य आपत्ती निवारण निधी (एसडीआरएफ) मधून 21 राज्यांना 4571.30 कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ) मधून 9 राज्यांना 372.09 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

फडणवीसांनी मानले आभार

या मदतीची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानले आहेत. “मान्सून काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने एनडीआरएफचा दुसरा अग्रिम हप्ता म्हणून आणखी 1566.40 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत. माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांचा मी नितांत आभारी आहे. ही अग्रिम मदत असून अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातील प्रक्रिया अजून सुरू आहे,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

सर्व राज्यांना केली मदत

केंद्र सरकारने पूर, भूस्खलन, ढगफुटी यासारख्या घटनांमुळे प्रभावित झालेल्या सर्व राज्यांना आवश्यक असलेल्या एनडीआरएफ पथके, लष्करी पथके आणि हवाई दलाच्या मदतीसह सर्व लॉजिस्टिक सहाय्य देखील प्रदान केले आहे. या वर्षीच्या पावसाळ्यात, बचाव आणि मदत कार्यासाठी 30 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये एनडीआरएफच्या सर्वाधिक 199 पथके तैनात करण्यात आली होती.

महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली असून आता केंद्राच्या पाठबळामुळे शेतकऱ्यांना वेगाने मदत पोहोचवणं शक्य होणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!