Homeदेश-विदेशPM Kisan Yojana 31 lakh names Cancelled After Ladki Bhaeen check your...

PM Kisan Yojana 31 lakh names Cancelled After Ladki Bhaeen check your name Marathi News | ‘लाडकी बहीण’नंतर ‘पीएम किसान’च्या 31 लाख नावांवर फुल्ली, तुमचं नाव कसं तपासाल? जाणून घ्या


पीएम किसान योजना: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. सरसकट सर्व महिलांना दरमहा 1500 रुपयांचा हफ्ता वितरीत देण्यात आलाय. पण निवडणुकीनंतर हळुहळू अपात्र महिलांना यातून वगळण्यास सुरुवात झालीय. हा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. दरम्यान दुसरीकडे केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू केली आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत राज्यांना हे कार्य पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

आतापर्यंत 31.1 लाख कुटुंबांमध्ये पती-पत्नी दोघेही लाभ घेत असल्याचे आढळले, तर 1.76 लाख प्रकरणांत अल्पवयीन मुलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. याशिवाय, 8 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनी मालकीबाबत शंका निर्माण झाली आहे. संशयित खात्यांमुळे 20 व्या हप्त्याचे वितरण रोखले गेले होते, ज्यामुळे लाखो शेतकरी प्रभावित झाल्याची माहिती देण्यात आलीय.

पात्रता निकष कडक

योजनेसाठी कुटुंबातील फक्त एक प्रौढ सदस्य (पती किंवा पत्नी) लाभ घेऊ शकतो. लाभार्थीचे वय किमान 18 वर्षे असावे आणि जमीन मालकी 1 फेब्रुवारी 2016 नंतरची नसावी. अपात्र व्यक्तींना वार्षिक 6000 रुपयांचा (3 हप्त्यांत 2000 रुपये प्रत्येकी) लाभ मिळू शकत नाही. शेतकऱ्यांनी e-KYC प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, अन्यथा खाते अडकू शकते आणि हप्ता मिळणार नाही.

लाभार्थी यादी कशी तपासावी?

पीएम किसान पोर्टल (pmkisan.gov.in) वर जाऊन ‘नो युअर स्टेटस’ वर क्लिक करा. नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा टाकून OTP मागवा. OTP भरून पात्रता, शेवटचा हप्ता आणि जमीन बीजान (हिरवी टिक) तसेच e-KYC स्थिती तपासा. जर दोन्ही ‘हो’ दाखवत असतील, तर चिंता नको; पैसे खात्यात येतील. नोंदणी क्रमांक नसेल तर आधार किंवा मोबाईल नंबरने ‘नो युअर रजिस्ट्रेशन नंबर’ सेक्शन वापरा आणि OTP ने माहिती मिळवा.

मोबाईल नंबर अपडेटची प्रक्रिया

नोंदणीत मोबाईल नंबर जोडलेला नसल्यास लाभ अडकतो. पोर्टलवर ‘मोबाईल नंबर लिंक’ पर्याय निवडा. आधार नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकून OTP मागवा. OTP भरून नवीन मोबाईल नंबर जोडा आणि पुष्टी करा. हे डीबीटी प्रक्रियेसाठी आवश्यक आहे, जेणेकरून हप्ता थेट खात्यात जमा होईल. CSC केंद्रावर जाऊनही हे अपडेट करता येते.

21 व्या हप्त्याचे वितरण कधी?

चार राज्यांत (पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड) २१ व्या हप्त्याचे 2000 रुपये आधीच जमा झाले आहेत. उर्वरित राज्यांसाठी दिवाळीपूर्वी (20 ऑक्टोबर 2025 पर्यंत) शक्यता आहे, मात्र अधिकृत घोषणा बाकी आहे. शेतकऱ्यांनी e-KYC आणि दस्तऐवज अपडेट करून तयारी करावी. यामुळे विलंब टाळता येईल आणि शेतीखर्चासाठी वेळेवर मदत मिळेल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्यासाठी पात्रता कशी तपासावी?

उत्तर: तुमची पात्रता तपासण्यासाठी पीएम किसान पोर्टल (pmkisan.gov.in) वर जा. ‘नो युअर स्टेटस’ पर्याय निवडा, नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा टाका. OTP मागवा आणि टाकल्यानंतर तुमची पात्रता, जमीन बीजान (हिरवी टिक) आणि e-KYC स्थिती तपासा. जर दोन्ही ‘हो’ दाखवत असतील, तर तुम्हाला २१ वा हप्ता मिळेल; अन्यथा e-KYC तात्काळ पूर्ण करा.

प्रश्न: नोंदणी क्रमांक माहित नसल्यास काय करावे?

उत्तर: जर तुम्हाला नोंदणी क्रमांक माहित नसेल, तर पीएम किसान पोर्टलवर ‘नो युअर स्टेटस’ मध्ये ‘नो युअर रजिस्ट्रेशन नंबर’ पर्याय निवडा. तुमचा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका. OTP मागवून पडताळणी केल्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक मिळेल. याचा वापर पात्रता आणि हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी करा.

प्रश्न: मोबाईल नंबर कसा अपडेट करावा आणि तो का आवश्यक आहे?

उत्तर: मोबाईल नंबर अपडेटसाठी पीएम किसान पोर्टलवर ‘मोबाईल नंबर लिंक’ पर्याय निवडा. आधार किंवा नोंदणी क्रमांक टाकून OTP मागवा, नवीन नंबर जोडा आणि पुष्टी करा. याशिवाय, CSC केंद्रावरही अपडेट करता येते. मोबाईल नंबर जोडणे e-KYC आणि डीबीटी प्रक्रियेसाठी आवश्यक आहे, जेणेकरून २१ व्या हप्त्याचे २,००० रुपये थेट खात्यात जमा होतील.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!