Homeदेश-विदेशGarrett Gee travel influencer Throws 7-Year-Old Son Into a Cliff Pool Mother...

Garrett Gee travel influencer Throws 7-Year-Old Son Into a Cliff Pool Mother Records Viral Video | धक्कदायक! वडिलांनी 7 वर्षांच्या मुलाला दरीत…, आईनेच केला Video शूट; म्हणाला, “मी एक…”


गॅरेट जी ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर व्हायरल व्हिडिओ: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर गॅरेट जी (Garrett Gee) सध्या मोठ्या चर्चेत आहेत. कारण त्यांनी आपल्या सात वर्षांच्या मुलाला उंच कड्यावरून पाण्यात फेकतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी जुलै महिन्यात व्हायरल झाला होता, आणि त्यानंतर गॅरेट जी यांच्यावर जोरदार टीका झाली. मात्र गॅरेट यांनी आता या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत सांगितले की, “माझा हेतू चुकीचा नव्हता, मी एक चांगला बाप आहे आणि माझा उद्देश मुलाला भीतीवर मात करायला शिकवणं हा होता.”

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये

या व्हिडीओमध्ये गॅरेट याची पत्नी जेसिका (Jessica) हिने संपूर्ण प्रसंगाचं रेकॉर्डिंग केलं आहे. व्हिडीओमध्ये दिसतं की गॅरेट आपल्या मुलाला उंच डोंगरावर घेऊन जातो, खाली खोल दरी आहे जिथं पाणी भरलेलं आहे. त्यांचा मुलगा कॅली (Cali) पाण्यात उडी मारू इच्छितो पण घाबरतो. त्याच क्षणी गॅरेट मागून येतात आणि त्याला उचलून थेट पाण्यात फेकतो.मुलगा पाण्यात सुरक्षितपणे पडतो आणि हसतोही, पण इंटरनेटवरील लोकांनी हे पाहून प्रचंड संताप व्यक्त केला. अनेकांनी या कृतीला ‘धोकादायक’ आणि ‘मानसिक आघात देणारी’ अशी टीका केली. या घटनेनंतर सोशल मीडियावर चाइल्ड सेफ्टी आणि पॅरेंटिंग विषयी मोठा वाद निर्माण झाला.

हे ही वाचा: Indian Government Money: भारत सरकारच्या पैशांचा हिशोब कोण ठेवतं? जाणून घ्या

गॅरेट जी कोण आहे?

गॅरेट जी हे एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कंटेंट क्रिएटर आहे, ज्याला ‘The Bucket List Family’ म्हणून ओळखलं जातं. तो आपल्या कुटुंबासोबत जगभर प्रवास करतात आणि ट्रॅव्हल व अॅडव्हेंचर कंटेंट तयार करतो. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स आहेत.

हे ही वाचा: Shocking: कोलंबियाच्या घनदाट जंगलात लपलेले एक आलिशान घर, आतमध्ये गेल्यावर… बघा Photos

गॅरेट याने पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, “हे पॅरेंटिंग अॅडव्हाइस नाही. प्रत्येक मूल वेगळं असतं. सुरक्षित राहा!”

का केलं गॅरेट जीने असं?

गॅरेट याने नंतर स्पष्ट केलं की त्याचा व्हिडीओ पालकत्वाबद्दल सल्ला देण्यासाठी नव्हता. त्याने लिहिलं, “प्रत्येक मूल वेगळं असतं. आपण आपल्या मुलांना ज्या पद्धतीने शिस्त लावतो, शिकवतो, त्याला आव्हानं स्वीकारायला लावतो  ती प्रत्येक घरात वेगळी असते. माझी पहिली प्राथमिकता सुरक्षा आहे. दुसरी म्हणजे आव्हानांचा सामना शिकणं, आणि तिसरी म्हणजे आनंदाने जगणं.”

हे ही वाचा: ‘या’ एका सवयीने घेतला संजीव कुमार यांचा जीव! फक्त 47 व्या वर्षी ‘शोले’च्या ठाकुरांनी घेतला निरोप

पीपल मॅगझिनशी बोलताना त्याने सांगितलं, “जर कोणी तो व्हिडीओ पाहिला आणि फक्त त्या एका क्षणावरून मत बनवलं, तर त्यांना ते चुकीचं वाटणं साहजिक आहे. पण जे लोक आमचं संपूर्ण प्रवास पाहतात, ते जाणतात की आम्ही किती विचारपूर्वक आणि जबाबदारीने पालकत्व करतो.”

थोडक्यात, गॅरेट जींच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा रंगली आहे. काही जणांनी त्यांची कृती धोकादायक म्हटली, तर काहींनी त्यांच्या “धैर्य शिकवण्याच्या” विचाराला पाठिंबा दिला. मात्र या घटनेने पालकत्वाच्या सीमांवर आणि मुलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठा प्रश्न उभा केला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...
spot_img

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
error: Content is protected !!