Homeपुणे / पिंपरी-चिंचवडवैयक्तिक: मोहनलाल - मराठी बातम्या | दिग्गज अभिनेता मोहनलाल फिल्मोग्राफी मोहनलाल सिनेमा...

वैयक्तिक: मोहनलाल – मराठी बातम्या | दिग्गज अभिनेता मोहनलाल फिल्मोग्राफी मोहनलाल सिनेमा कारकीर्द मोहनलाल चित्रपटांमध्ये झेडडब्ल्यूएस 70


मल्याळी सिनेमा, त्यातले विविध विषय, विविध प्रयोग, दमदार अभिनेते आणि अभिनेत्री या सगळ्यांनी प्रेक्षकांचे लक्ष अलीकडच्या काळात विशेषत: ओटीटीवरील उपलब्धतेमुळे जास्त ठळकपणे वेधून घेतले असले तरी त्याआधीही मल्याळी सिनेमाची पताका आपल्या खांद्यावरून समर्थपणे मिरवणारी अनेक नावे आहेत. त्यातले एक महत्त्वाचे नाव अभिनेते मोहनलाल यांचे. त्यांना आज (२३ सप्टेंबर) प्रदान करण्यात आलेल्या २०२३ साठीच्या दादासाहेब फाळके पुरस्कारामुळे यावर पुन्हा एकदा सरकारी शिक्कामोर्तब झाले इतकेच.

पुन्हा एकदा असे म्हणण्याचे कारण म्हणजे जेमतेम पासष्टीच्या या अभिनेत्याला आत्तापर्यंत अभिनयासाठी पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. नऊ वेळा राज्य पुरस्कार मिळाले आहेत. त्याशिवाय पद्माश्री, पद्माभूषण हे पुरस्कारही त्यांच्या खाती जमा आहेत. त्यांच्या रूपाने मल्याळम सिनेमाला मात्र पहिल्यांदाच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. अगदी शालेय जीवनापासून अभिनयाची कारकीर्द सुरू करून मोहनलाल यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमधून काम केले.

अॅक्शन, कॉमेडी, रोमँटिक, सामाजिक अशा सर्व जॉनरच्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. मुख्य म्हणजे त्यांनी मल्याळमबरोबरच तमिळ, तेलुगु, कन्नड या दक्षिण भारतीय चित्रपटांत आणि हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे. ‘प्रणवम कला’ नावाची त्यांची स्वत:ची चित्रपटनिर्मिती करणारी कंपनीदेखील आहे. या सगळ्याच्या जोडीने सामाजिक कामांसाठीदेखील मोहनलाल ओळखले जातात.

त्यांचे पूर्ण नाव मोहनलाल विष्णुनाथन नायर. जन्म १९६० चा. अर्थातच केरळमधला. त्यांचे वडील केरळ राज्य सरकारमध्ये कायदे विभागाचे सचिव होते. सहाव्या इयत्तेत असताना ‘कॉम्प्युटर बॉय’ नावाच्या नाटकात त्यांनी साकारलेल्या नव्वदीच्या वृद्धाच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. त्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून थिरनोत्तम नावाचा पहिलावहिला सिनेमा केला. त्यात त्यांनी एका गतिमंद नोकराची भूमिका केली होती. तो सिनेमा त्या वेळी प्रदर्शित होऊ शकला नाही, (त्यासाठी २५ वर्षे जावी लागली) पण त्यामुळे मोहनलाल यांचे काहीच अडले नाही.

हेही वाचा

तिथून त्यांची अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधली कारकीर्द झळाळतच राहिली. त्यामुळे ‘मंजिल विरिंजा पूक्कल’ हा त्यांचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. मात्र त्यांना सुपरस्टार केले ते ‘राजविन्ते माकन’ या चित्रपटाने. ‘किरीदम’, ‘मणिचित्रताजु’, ‘दृश्यम’, ‘पुलिमुरुगन’, ‘इरुवर’, ‘कंपनी’ आणि ‘जनता गॅरेज’ असे त्यांचे अनेक चित्रपट मल्याळम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. मोहनलाल यांच्या चित्रपटासाठी प्रेक्षकांच्या रांगा लागल्या आहेत, हे केरळमधले नेहमीचे चित्र आहे, असे सांगितले जाते.

राजविन्ते माकन या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेचा प्रेक्षकांवर चांगलाच प्रभाव पडला होता. तर ‘चित्रम’ या सिनेमातील त्यांचे विनोदी पात्र तेवढेच लोकप्रिय झाले. ‘भारतम’मध्ये त्यांनी एका संगीतकाराच्या भावनात्मक संघर्षाचे परिपूर्ण दर्शन घडवले होते. ‘कीरीदम’ या चित्रपटात तरुणाच्या जीवनातील कठीण निर्णयांचे वास्तव त्यांनी प्रेक्षकांसमोर उभे केले.

‘देवासूरम स्पाडिकम’ या चित्रपटांमध्ये त्यांनी सांस्कृतिक, सामाजिक आणि कौटुंबिक संघर्षांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत दर्जेदार अभिनय केला. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’ या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या कुटुंबासाठी पाय रोवून उभ्या राहणाऱ्या एका सामान्य माणसाचे दर्शन घडवले. १९८६ या एका वर्षात तर मोहनलाल यांचे ३४ चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्या वेळी त्यांचे वय होते, २६ वर्षे. या ३४ पैकी २५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरले होते. या वर्षी दर १५ दिवसांनी मोहनलाल यांचा एक चित्रपट प्रदर्शित होत होता. या सगळ्यामुळे मोहनलाल हे केरळी सिनेमाचा चेहरा आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!