Homeदेश-विदेशनेपाळ जनरल झेड झेड निषेध हिंसाचार पंतप्रधान मोदींनी या विषयावर पहिली टिप्पणी...

नेपाळ जनरल झेड झेड निषेध हिंसाचार पंतप्रधान मोदींनी या विषयावर पहिली टिप्पणी दिली


नेपाळ जनरल झेड निषेध हिंसाचारावरील पंतप्रधान मोदी: भारताचा शेजारच्या नेपाळमधील सरकार कोसळलं आहे. सोशल मीडियावरील बंदी आणि त्यामधून भ्रष्टाचाराविरोधात येथील तरुणाई रस्त्यावर उतरल्याने मोठ्याप्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी 20 आंदोलकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अगदी माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी यांना आंदोलकांनी जिवंत जाळल्याची घटनाही मंगळवारी समोर आली. दुसरीकडे राज्यकर्त्यांनी देश सोडून पलायन केल्यानंतर येथील लष्कराने मंगळवारी रात्री 10 वाजल्यापासून देशाचा कारभार हाती घेतल्याची घोषणा केली आहे. असं असतानाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळमधील परिस्थितीवर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

मोदींनी बोलावली विशेष बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळमधील हिंसाचारासंदर्भात चर्चा करण्यासाठी रात्री एक विशेष बैठक बोलावली होती. मोदींनी नेपाळमधील शांततेवर भाष्य केलं आहे. आता येत्या काही दिवसांमध्ये नेपाळमध्ये शांतता परतेल अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोदी नेमकं काय म्हणाले?

रात्री 10 वाजून 11 मिनिटांनी पंतप्रधान मोदींनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. “आज हिमाचल प्रदेश आणि पंजाबहून परतल्यावर, सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत नेपाळमधील घडामोडींवर चर्चा झाली. नेपाळमधील हिंसाचार हृदयद्रावक आहे,” असं मोदींनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी, “अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत हे पाहून मला दुःख झाले आहे. नेपाळची स्थिरता, शांतता आणि समृद्धी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मी नेपाळमधील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना शांततेला पाठिंबा देण्याचे नम्र आवाहन करतो,” असंही म्हटलं आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भारत सरकारला नेपाळबरोबर मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवण्यात अपयश आल्याचं म्हटलं आहे. नेपाळला आता चीन अधिक जवळचा वाटू लागल्याचा उल्लेख ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे. “भारतात मोठ्या प्रमाणात नेपाळची जनता रोजगार कमवीत आहे, पण नेपाळवर पूर्ण नियंत्रण आहे ते चीनचे. नेपाळची अर्थव्यवस्था चीनच्या मदतीवर अवलंबून आहे. एकेकाळी नेपाळ, भूतानसारखी राष्ट्रे भारताचे विश्वासू मित्र होती. नेपाळात नवे सरकार आले की, तेथील पंतप्रधान सगळ्यात आधी भारत भेटीवर येत. आज नेपाळचे पंतप्रधान आधी चीन दौऱ्यावर व नंतर पाकिस्तानात जातात. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे. शेकडो चिनी शिक्षक सध्या नेपाळात आहेत व नेपाळची जनता त्यांच्याकडून चिनी भाषेचे धडे घेत आहे. नेपाळचा रंग आधी भगवा होता. तो आता पूर्णपणे लालभडक झाला व भारत सरकार हा बदल रोखू शकले नाही,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

FAQ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळमधील कोणत्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावली होती?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळमधील हिंसाचारासंदर्भात चर्चा करण्यासाठी रात्री एक विशेष बैठक बोलावली होती.

या बैठकीत कोणत्या समितीने भाग घेतला?
या बैठकीत सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने (Cabinet Committee on Security) भाग घेतला होता.

पंतप्रधान मोदींनी नेपाळमधील परिस्थितीबाबत काय म्हटलं आहे?
पंतप्रधान मोदींनी नेपाळमधील हिंसाचाराला “हृदयद्रावक” असं संबोधलं आहे. त्यांनी अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आणि नेपाळची स्थिरता, शांतता आणि समृद्धी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं नमूद केलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!