Homeदेश-विदेशकर्नाटकात जातीच्या सर्वेक्षणापूर्वीही वीरशैवा लिंगायत हिंदू जातीची जनगणना मोठी मागणी नाही

कर्नाटकात जातीच्या सर्वेक्षणापूर्वीही वीरशैवा लिंगायत हिंदू जातीची जनगणना मोठी मागणी नाही


कर्नाटक वीरशैवा लिंगायत: कर्नाटकात सामाजिक आणि आर्थिक सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय.. मात्र या सर्व्हेक्षणाला सुरूवात होण्याआधीच मोठा वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय.. लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संघटनेने  समाजातील सर्व सदस्यांना या सर्वेक्षणात स्वतःची ओळख ही हिंदू म्हणून नव्हे तर ‘वीरशैव-लिंगायत म्हणून नोंदवण्याचे आवाहन केलंय.  या आवाहनामुळे कर्नाटकच्या  राजकारणात मोठी खळबळ उडालीय.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

कर्नाटकमध्ये सामाजिक आणि आर्थिक सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय कर्नाटकातील काँग्रेस सरकारने घेतलाय.. येत्या 22 सप्टेंबर पासून कर्नाटकात या सर्व्हेक्षणाला सुरूवात होणार आहे..  मात्र या सर्व्हेक्षणाआधीच वीरशैव लिंगायत समाजाच्या महासभेने एक मोठा मागणीकरून कर्नाटकच्या राजकारणात एकच खळबाळ उडवून दिलीय..लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संघटनेने  समाजातील सर्व सदस्यांना या सर्वेक्षणात स्वतःची ओळख ही हिंदू म्हणून नव्हे तर ‘वीरशैव-लिंगायत म्हणून नोंदवण्याचे आवाहन केलंय… लिंगायत समाज दीर्घकाळापासून हिंदूंपासून स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करतोय. वीरशैव-लिंगायत महासभेने हे अधिकृत पत्र जारी करून समाजातील सदस्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत..

‘हिंदू नाही वीरशैव-लिंगायत म्हणा’

‘लिंगायत समुदाला हिंदू धर्माचा हिस्सा म्हणून नका’
लिंगायत हा वेगळा धार्मिक गट, स्वतंत्र ओळख द्या
लिंगायत समुदायाच्या सर्वोच्च संघटनेची मागणी
सर्वेक्षणात हिंदू नव्हे तर वीरशैव-लिंगायत म्हणून स्वतंत्र ओळख द्यावी
कर्नाटकात लिंगायत समुदायाची लोकसंख्या 17 टक्के असल्याचा दावा
सामाजिक आर्थिक सर्वेक्षणावरुन नव्या वादाची शक्यता
भाजपच्या हिंदू व्होट बँकेवर परिणाम होण्याची शक्यता

लिंगायत समाज हा हिंदू समाजाचा अविभाज्य घटक असल्याचं म्हणत भाजप खासदार अजित गोपछडे यांनी कर्नाटकातील या सर्व्हेक्षणावरून सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधलाय.

लिंगायत समाजाने कोणता पंथ स्विकारायचा हा त्यांचा अधिकार आहे.. मात्र आतापर्यंत लिंगायत समाज हा हिंदू धर्माचाच भाग होता असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संघटनेनं कर्नाटकात ही मागणी केल्यानंतर महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या नेत्यांनीही समाजाला आवाहन केलंय.. राज्यातील लिंगायत समाजातील जनतेनं जात निहाय जणगणने करताना धर्म लिंगायत मेंशन करावा आणि जातीमध्ये व्यवसायाची जात मेंशन करावी असं आवाहन लिंगायत महासभेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी केलंय.

https://www.youtube.com/watch?v=xfte8dfo1ju

कर्नाटकमध्ये सामाजिक आणि आर्थिक सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय हा काँग्रेसचे मास्टरस्ट्रोक असल्याचं मानलं जातंय.. कर्नाटकात मोठ्या प्रमाणात असलेल्या लिंगायत समाजाने आपल्याला वीरशैव लिंगायत अशी ओळख देण्याची मागणी करत हिंदू नसल्याचं म्हटलंय. यामुळे आता राज्य सरकार या मागणीकडे कसं पाहणार आणि त्यावर भाजपची भूमिका काय असणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे.

FAQ

1. कर्नाटकातील सामाजिक आणि आर्थिक सर्व्हेक्षण 2025 म्हणजे काय?

कर्नाटक सरकारने सामाजिक आणि आर्थिक सर्व्हेक्षण (Socio-Economic and Educational Survey) करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे राज्यातील जाती, उपजाती, शिक्षण, रोजगार आणि आर्थिक स्थिती यांची माहिती गोळा केली जाईल. हे सर्व्हेक्षण 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार आहे.

2. या सर्व्हेक्षणाला का वाद निर्माण झाला आहे?

सर्व्हेक्षण सुरू होण्यापूर्वीच अखिल भारत वीरशैव-लिंगायत महासभेने लिंगायत समाजाला त्यांची धार्मिक ओळख “हिंदू” ऐवजी “वीरशैव-लिंगायत” म्हणून नोंदवण्याचे आवाहन केले आहे. यामुळे लिंगायत समाजाला हिंदूंपासून स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे, ज्याने राजकीय आणि सामाजिक खळबळ उडाली आहे.

3. वीरशैव-लिंगायत महासभेची नेमकी मागणी काय आहे?

लिंगायत समाजाने सर्व्हेक्षणात धर्माच्या रकान्यात “Others” मध्ये “वीरशैव-लिंगायत” नोंदवावे.
जातीच्या रकान्यात “लिंगायत” किंवा “वीरशैव” आणि उपजातीच्या रकान्यात त्यांच्या विशिष्ट उपजाती (उदा. पंचमसाली, बनजिगा, नोनाबा) नोंदवावी.
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग न मानता स्वतंत्र धार्मिक ओळख द्यावी.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जपानच्या PM ताकाइची राष्ट्रपती भवनात पोहोचल्या:गार्ड ऑफ ऑनरने स्वागत; आज मोदींसोबत गुंतवणूक आणि सुरक्षा...

0
जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांचे गुरुवारी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. पंतप्रधान...

जीवनातील समस्यांमुळे एक व्यक्ती निराश झाला होता:प्रेरक कथा: दुःखी व्यक्ती संतांकडे पोहोचला, जाणून घ्या...

0
फार जुन्या काळातील एक लोककथा आहे, एक व्यक्ती आयुष्यातील अडचणींमुळे निराश झाला होता. त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्या...

बेल्जियमने सेनेगलला 3-2 ने हरवले:86व्या मिनिटापर्यंत 0-2 ने मागे, शेवटच्या 4 मिनिटांत स्कोअर बरोबरीत,...

0
बेल्जियमने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी 86व्या मिनिटापर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही अतिरिक्त वेळेत सेनेगलला 3-2 ने हरवले. आता त्यांचा सामना यजमान अमेरिकेशी होईल....

शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच:6 खासदार, सचिन अहिर यांच्यानंतर आता शिक्षक आमदार किरण सरनाईक शिंदेंसोबत

0
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, इतर पक्षांतील नेत्यांचा शिवसेनेत येण्याचा ओघ...
spot_img

बेल्जियमने सेनेगलला 3-2 ने हरवले:86व्या मिनिटापर्यंत 0-2 ने मागे, शेवटच्या 4 मिनिटांत स्कोअर बरोबरीत,...

0
बेल्जियमने फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी 86व्या मिनिटापर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही अतिरिक्त वेळेत सेनेगलला 3-2 ने हरवले. आता त्यांचा सामना यजमान अमेरिकेशी होईल....

ईशान किशन नंबर-1 टी-20 फलंदाज:अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय ठरला, अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर...

0
भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. त्याने सुमारे १२ महिन्यांपासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक...

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...
error: Content is protected !!