Lakh लाख रुपये सोन्याच्या साखळीसह गणपती विसर्जन: आज अनंत चतुर्थीचा दिवस… गणेशभक्त आज जड अंत:करणाने लाडक्या गणरायाला निरोप देतात. सामान्यपणे दहा दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान दीड दिवसांचे, पाच दिवसांचे, सात दिवसांचे गणपती अनेकांच्या घरी विराजमान होतात. अनेकजण दहा दिवसांसाठीही घरी गणरायांची सेवा करतात. मात्र दहाव्या दिवशी गणरायांना भावपूर्ण निरोप देऊन पुढल्या वर्षी ते कधी येणार याची आतुरतेने वाट पाहणारे कोट्यवधी गणेश भक्तांसाठी अनंत चतुदर्शीचा दिवस धाकधूक वाढवणाराच असतो. मात्र एका कुटुंबाची धाकधूक वेगळ्याच कारणाने वाढला. जेव्हा घरातील गणरायांचं विसर्जन करुन परतल्यानंतर आपण गणरायांच्या मूर्तीसोबत खरी सोनसाखळी विसर्जित केल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पुढील दहा तास वेगळाच ड्रामा रंगला. या साऱ्या प्रकारात अख्खा गाव गोळा झाला, एक संपूर्ण तलाव उपसावा लागला अन् स्थानिक नेत्यालाही या प्रकरणात लक्ष घालावं लागलं. एवढं करुन या नाट्याचा शेवट काय झाला माहितीये? चला जाणून घेऊयात…
नक्की कुठे घडला हा प्रकार?
वर थोडक्यात वर्णन केलेला सारा प्रकार घडला तो महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या कर्नाटकमधील आयटी सीटी अशी ओळख असलेल्या बंगळुरुमध्ये! विजयनगरमधील दहशरहाली सर्कल येथे राहणारं रामय्या आणि उमादेवी हे जोडपं घरगुती गणपतीचं विसर्जन केल्यानंतर घरी परतलं. मात्र घरी परतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी बाप्पाच्या मूर्तीवर चढवलेली खरी सोनसाखळी विसर्जन करताना काढलीच नव्हती आणि त्या सोनसाखळीसोबतच बाप्पााच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. या सोनसाखळीची किंमत 4 लाख रुपये इतकी असल्याने दोघांना घामच फुटला. ही सोनसाखळी शोधण्यासाठी दोघे बाप्पाची मूर्ती विसर्जित केलेल्या तलावाजवळ पोहोचले. ही सोनसाखळी शोधण्यासाठी तब्बल 10 हजार लीटर पाणी उपसलं. तसेच 300 गणेश मूर्तींचं विसर्जन केलेल्या तलावामधील गाळ शोधून काढण्यासाठी अगदी माणसं नेमावी लागली.
कशी काय गणेश मूर्तीसोबत गेली ही सोनसाखळी?
गणपतीच्या मूर्तीवर विसर्जनाच्या वेळी फुलांच्या माळा आणि इतर सजावट तशीच ठेवण्यात आल्याने ही खरी सोनसाखळी काढली नाही हे रामय्या आणि उमादेवी यांनी विसर्जन करुन घरी गेल्यानंतर समजलं. आपण सोनसाखळीसहीत गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन केल्याचं लक्षात आल्यानंतर या दोघांनी तातडीने या कृत्रिम तळ्याकडे धाव घेतली. गणेश मूर्तीचं विसर्जन करणाऱ्या मुलाने मूर्तीच्या गळ्यात सोनसाखळी पाहिली होती. मात्र ती नकली असेल म्हणून ठेवली आहे.
स्थानिक आमदारानेही केली मदत
विसर्जन घाटावर गणेश मूर्तींच विसर्जन करणाऱ्या मुलाने सोनसाखळी पाहूनही ती खोटी असल्याचं वाटल्याने मूर्तीचं विसर्जन केलं. यासंदर्भात आपण एकदा विसर्जनाआधी विचारपूस करायला हवी होती, असं या तरुणांनी सारा प्रकार लक्षात आल्यानंतर म्हटलं. नंतर ही सोनसाखळी विसर्जन घाटावर काम करणाऱ्या एका मुलाने केलेल्या मार्गदर्शनामुळे अनेकांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी सकाळी सापडली. हा सारा प्रकार दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी मागील वर्षी घडला होता. याबद्दलचं वृत्तांकन ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने केलं होतं. अशी सोनसाखळी हरवल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरल्यानंतर तातडीने स्थानिक आमदार प्रिया कृष्णा यांनीही मदतीचा हात पुढे केला. प्रिया यांनी ही सोनसाखळी शोधण्यासाठी मदतीला 10 माणसं पाठवली. दहा तास चिखल, पाण्यात शोध घेतल्यानंतर अखेर ही सोनसाखळी सापडली आणि या दोघांचा जीव भांड्यात पडला. या जोडप्याला त्यांची हारवलेली सोनसाखळी परत मिळाल्याने इतरांनीही समाधान व्यक्त केलं. हा सारा प्रकार अनेकांसाठी धडा असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली होती.
FAQ
हा प्रकार कुठे घडला?
हा प्रकार कर्नाटकातील बंगळुरू येथील विजयनगर, दहशरहाली सर्कल परिसरात घडला. गणपती विसर्जन कृत्रिम तलावात केले गेले होते.
सोनसाखळी गणपती मूर्तीसह कशी विसर्जित झाली?
विसर्जनाच्या वेळी गणपती मूर्तीवर फुलांच्या माळा आणि इतर सजावट ठेवण्यात आली होती. रामय्या आणि उमादेवी यांनी मूर्तीच्या गळ्यातील खरी सोनसाखळी काढायला विसरले. विसर्जनानंतर घरी परतल्यावर त्यांना याची जाणीव झाली, आणि त्यांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली.
विसर्जन घाटावरील कर्मचाऱ्याने काय चूक केली?
विसर्जन घाटावरील कर्मचाऱ्याने मूर्तीच्या गळ्यातील सोनसाखळी पाहिली, पण ती नकली समजून विसर्जन केले. नंतर त्याने सांगितले की, विसर्जनापूर्वी त्याने विचारपूस करायला हवी होती.

































