जगातील सर्वात मोठी हिमशैल: पृथ्वीवर वर्षानुवर्षांवर्षांपासून होणाऱ्या भौगोलिक बदलांमध्ये आता आणखी एका मोठ्या आणि काहीशा चिंता वाढवणाऱ्या बदलाची भर पडली आहे. हे संकट प्रत्यक्षात आपल्यापासून बरंच दूर असलं तरीही त्याची व्याप्ती पाहता येत्या काळात हवामानविषयक बदल चिंता वाढवू शकतात असा इशारा संशोधकांनी दिला आहे.
जागतिक स्तरावरील हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार जगातील, पृथ्वीवरील सर्वात मोठा हिमनग A23A चक्काचूर होण्यास सुरुवात झाली असून, सर्वात मोठा तरंगता हिमनग आता नष्ट होत आहे हे दाहक वास्तव. या बदलामुळं हवामान चक्राचाही नाश होण्याची भीती असून, त्यामुळं समुद्रातील पाण्याच्या पातळीतही झपाट्यानं वाढ होण्याची चिंता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
हा हिमनग अर्थात Iceberg 1986 मध्ये अंटार्क्टिकाच्या फिल्नचर रोने हिमखंडापासून वेगळा झाला होता. दशकानुदशकं अंटार्क्टिकापाशीच राहीला मात्र सागरी लाटांनी त्याला उत्तरेकडे ढकललं जिथं सहसा हे हिमनग वितळण्यास सुरुवात होते. 2025 च्या सुरुवातीला या हिमनगाचा आकार रोड बेटाइतका असून त्याचं वजन 1 ट्रिलियन इतका होता. आता मात्र त्याचा आकार ह्यूस्टन शहराइतका लहान झाला असून, काही काळातच या हिमनगाचं अस्तित्वं नाहीसं होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जगातील या सर्वात मोठ्या हिमनगाचा अंत होत असताना आता ब्रिटनमधील D15A हा जगातील सर्वात मोठा हिमखंड ठरला आहे. NASA च्या माहिीतनुसार हल्लीच A23A चे लहान लहान तुकडे वेगळे होण्यास सुरूवात झाल्यानंतर त्या लहान तुकड्यांना आता नव्यानं A23D, A23E आणि A23F अशी नावं देण्यात आली.
संशोधकांनी काय भीती व्यक्त केली?
कोलारॅडो विद्यापीठातील संशोधक टेड स्कॅम्बोस यांच्या मते ही एक अतिशय महत्त्वाची घटना असून, जागतिक तापमानवाढ आणि लाटांमुळं हा हिमखंड आणखी कमकुवत होत असून तो तुटण्याची प्रक्रिया अधिक वेगानं सुरू होईल ज्याचा थेट परिणाम ऋतूचक्रावरही होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
FAQ
A23A हिमनग म्हणजे काय आणि त्याची निर्मिती कशी झाली?
A23A हा जगातील सर्वात मोठा हिमनग होता, जो 1986 मध्ये अंटार्क्टिकाच्या फिल्नचर-रोने हिमखंडापासून (Filchner-Ronne Ice Shelf) वेगळा झाला. हा हिमनग सुमारे 3,672 चौरस किलोमीटर (1,418 चौरस मैल) क्षेत्रफळाचा आणि 1 ट्रिलियन मेट्रिक टन वजनाचा होता, जो रोड आयलंडपेक्षा किंचित मोठा होता.
A23A हिमनग आता का तुटत आहे?
A23A हिमनग सध्या दक्षिण अटलांटिक महासागरात उष्ण पाणी आणि दक्षिण गोलार्धातील वसंत ऋतूच्या प्रभावामुळे वेगाने तुटत आहे.
A23A च्या तुटण्यामुळे समुद्र पातळी वाढेल का?
नाही, A23A सारखे तरंगते हिमनग वितळल्याने समुद्र पातळी थेट वाढत नाही, कारण ते आधीपासूनच पाण्यात तरंगत असतात. तथापि, अंटार्क्टिकातील हिमशेल्फ आणि हिमनदांच्या (Glaciers) वितळण्यामुळे जमिनीवरील बर्फ सागरात मिसळतो, ज्यामुळे समुद्र पातळी वाढते.

































