Homeपुणे / पिंपरी-चिंचवडगणेशोत्सवाची प्रबोधनात्मक भित्तिपत्रके लावल्यावरून सनातनच्या साधकाचा पोलिसांकडून बेकायदेशीर डांबून छळ!

गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक भित्तिपत्रके लावल्यावरून सनातनच्या साधकाचा पोलिसांकडून बेकायदेशीर डांबून छळ!

दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची सनातन संस्थेची मागणी

मुंबई – गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवडी परिसरात ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा’ अशा आशयाची प्रबोधनात्मक भित्तिपत्रके लावणाऱ्या श्री. संदीप हरिश्चंद्र शिंगाडे या सनातनच्या साधकाला किडवाई मार्ग पोलिसांनी कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय ताब्यात घेऊन दीड तास त्यांचा छळ केला. पोलिसांच्या या मनमानी आणि दडपशाहीचा आम्ही सनातन संस्थेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करतो. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी दिली.

२६ ऑगस्ट २०२५ या दिवशी रात्री ७:३० वाजता ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा’ या विषयाचे भित्तिपत्रक लावत असतांना कोळेकर, कांबळी आणि रामसिंग या नावाच्या पोलिसांनी सनातनचे साधक श्री. शिंगाडे यांना कोणतेही वॉरंट किंवा कारण न देता जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेणे; रात्री ९ वाजेपर्यंत घाडगे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने चौकशीच्या नावाखाली त्यांच्या मानसिक छळ करणे; चौकशीदरम्यान धमक्या देणे; वैयक्तिक मोबाईल काढून त्यातील वैयक्तिक माहिती घेणे; त्यांच्या फोनमधील कॉल लॉग्स व वैयक्तिक कागदपत्रांचे फोटो काढणे; साधकाला त्यांच्या वकिलाशी वा कुटुंबियांशी संपर्क साधू न देणे; तसेच रात्री ९ वाजता त्यांना कोणताही कागदोपत्री पुरावा न देता सोडून देणे, ही संपूर्ण कारवाई ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ (BNSS) च्या कलम ३५ चे सरळ उल्लंघन करणारी आहे. तसेच हा पोलिसांनी केलेल्या अधिकारांच्या दुरुपयोगाचा गंभीर नमुना आहे, असे श्री. वर्तक यांनी म्हटले आहे.

श्री. अभय वर्तक पुढे म्हणाले की , गणेशोत्सवाच्या काळात गणेशपूजनाचे शास्त्र, गणेशाची कृपा कशी संपादावी, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा, याविषयी प्रबोधन करणे गुन्हा आहे का ? हा भारतीय संविधानाने दिलेल्या हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यावर पोलीस प्रशासनाने घातलेला घाला आहे. कधी पोलिसांनी मुसलमान अथवा ख्रिश्चन धर्मियांना त्यांच्या धार्मिक कृतीविषयी माहिती सांगतांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन छळ करण्याचे धाडस केले आहे का ? याचे उत्तर किडवई मार्ग पोलिसांनी जनतेला द्यावे ! हिंदू सणांच्या वेळी हिंदूंची ही मुस्कटदाबी आम्ही कदापी सहन करणार नाही. जर दोषी अधिकाऱ्यांवर मुंबई पोलीस आयुक्तांनी तात्काळ कायदेशीर कारवाई केली नाही, तर आम्ही या विरोधात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करू, तसेच दोषींना शिक्षा होईपर्यंत सनातन संस्था या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहे, असेही श्री. वर्तक यांनी म्हटले आहे.

 

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!