आनंद महिंद्रा: सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या आणि बहुतांश संवेदनशी मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या सेलिब्रिटी मंडळींपैकी एक नाव म्हणजे (Mahidnar And Mahindra ) महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा. याच महिंद्रांनी नुकतीच अशा एका व्यक्तीची ओळख साऱ्या जगाला करून दिली आहे, त्याच्या कर्तृत्त्वापुढं भलेभलेही लहानच ठरत आहेत. या व्यक्तीच्या एका कृतीनं माणुसकी अजूनही संपलेली नाही हेच स्पष्ट होत आहे.
सध्याच्या घडीला मानवतेचं मूर्तीमंत उदाहरण असणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर गणेश राख. (Dr. Ganesh Rakh). उद्योगपती महिंद्रा यांनी या डॉक्टरांची प्रेरणादायी कहाणी सर्वांसमोर आणली आहे. आयएएस अधिकारी डी. प्रशांत नायर यांनी ऑनलाईन पद्धतीनं या डॉक्टरांची कहाणी शेअर केली असून आनंद महिंद्रांनासुद्धा त्याकडे दुर्लक्ष करता आलं नाही.
नायर यांनी शेअर केलेल्या पोस्टमधील माहितीनुसार, ‘एका मजुरानं पत्नीला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केलं होतंय. मात्र सिझेरियन पद्धतीनं होणाऱ्या प्रसूतीच्या खर्चाची त्याला चिंता होती, की यासाठी आपलं घर गहाण ठेवावं लागेल, बाळाच्या जन्मानंतर वडिलांनी मुलगा झाला की मुलगी असंही डॉक्टरांना विचारलं.
डॉ. राख यांनी सांगितलं, तुमच्या घरी एक परी आली आहे’. त्या क्षणी रुग्णालयाच्या खर्चाविषयीची चिंता डॉक्टरांना या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसली आणि ते म्हणाले, ‘जेव्हाजेव्हा परि (मुली) जन्मतात तेव्हातेव्हा मी कोणतेही पैसे घेत नाही’. डॉक्टरांच्या या वाक्यानं वडिलांना भावना दाटूवन आल्या आणि त्यांनी डॉक्टरांचे पाय धरून त्यांचे आभार मानले. ‘तुम्ही देव आहात’ असं म्हणून त्यांनी या डॉक्टरांचे आभार मानले.
असं म्हटलं जातं की 2007 पासून म्हणजेच डॉ. गणेश राख एका दशकाहून अधिक काळापासून आपल्या रुग्णालयात मुलींच्या जन्मानंतर कुटुंबीयांकडून कोणतीही रक्कम आकारत नाहीयते. ‘बेटी बचाओ’ योजनेअंतर्गत त्यांनी एक हजारहून अधिक मुलींच्या जन्मानंतर पैसे आकारले नाहीत. त्यांच्या याच कृतीनं आनंद महिंद्रासुद्धा भारावले.
सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लिहिलं, ‘दोन मुलींचा बाप असल्याच्या नात्यानं मी दोन गोष्टी जाणतो की जेव्हा तुमच्या घरी एका परीचा जन्म होतो तेव्हा किती आनंद होतो… पण हे डॉक्टरसुद्धा एक देवदूतच आहेत. दया आणि उदारतेचे देवदूत’. आठवड्याची याहून सुरेख सुरूवात असूच शकत नाही असं म्हणत त्यांनी या सकारात्मक कृतीला उचलून धरलं.
दोन मुलींचे वडील म्हणून, मला माहित आहे की जेव्हा आपल्या घरात एखादा देवदूत जन्माला येतो तेव्हा असे काय होते….
पण हा डॉक्टर देखील एक देवदूत आहे. कृपा आणि उदारपणाचा एक देवदूत.
आणि या पोस्टने मला आठवण करून दिली आहे की स्वत: ला कसे विचारून आठवडा सुरू करण्याचा आणखी एक शक्तिशाली मार्ग नाही…
– आनंद महिंद्रा (@अनाडमाहिंद्रा) 25 ऑगस्ट, 2025
दरम्यान बीबीसीशी संवाद साधताना एकदा डॉ. राख म्हणाले होते की देशात जेव्हा मुलींच्या जन्मानंतर आनंद साजरा केला जाईल तेव्हा आपण प्रसूतीसाठीचं शुल्क आकारू. त्यांचा हा निर्णय आणि समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत या महत्त्वाच्या मार्गानं त्याच्याकडून सामाजिक कार्यात लागणारा हातभार हा अतुलनीय आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
































