Homeदेश-विदेशआनंद महिंद्राने पुणे डॉक्टरांचे कौतुक केले जे मुलीच्या जन्मासाठी शुल्क आकारत नाही

आनंद महिंद्राने पुणे डॉक्टरांचे कौतुक केले जे मुलीच्या जन्मासाठी शुल्क आकारत नाही


आनंद महिंद्रा: सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या आणि बहुतांश संवेदनशी मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या सेलिब्रिटी मंडळींपैकी एक नाव म्हणजे (Mahidnar And Mahindra ) महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा. याच महिंद्रांनी नुकतीच अशा एका व्यक्तीची ओळख साऱ्या जगाला करून दिली आहे, त्याच्या कर्तृत्त्वापुढं भलेभलेही लहानच ठरत आहेत. या व्यक्तीच्या एका कृतीनं माणुसकी अजूनही संपलेली नाही हेच स्पष्ट होत आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

सध्याच्या घडीला मानवतेचं मूर्तीमंत उदाहरण असणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर गणेश राख. (Dr. Ganesh Rakh). उद्योगपती महिंद्रा यांनी या डॉक्टरांची प्रेरणादायी कहाणी सर्वांसमोर आणली आहे. आयएएस अधिकारी डी. प्रशांत नायर यांनी ऑनलाईन पद्धतीनं या डॉक्टरांची कहाणी शेअर केली असून आनंद महिंद्रांनासुद्धा त्याकडे दुर्लक्ष करता आलं नाही.

नायर यांनी शेअर केलेल्या पोस्टमधील माहितीनुसार, ‘एका मजुरानं पत्नीला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केलं होतंय. मात्र सिझेरियन पद्धतीनं होणाऱ्या प्रसूतीच्या खर्चाची त्याला चिंता होती, की यासाठी आपलं घर गहाण ठेवावं लागेल, बाळाच्या जन्मानंतर वडिलांनी मुलगा झाला की मुलगी असंही डॉक्टरांना विचारलं.

डॉ. राख यांनी सांगितलं, तुमच्या घरी एक परी आली आहे’. त्या क्षणी रुग्णालयाच्या खर्चाविषयीची चिंता डॉक्टरांना या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसली आणि ते म्हणाले, ‘जेव्हाजेव्हा परि (मुली) जन्मतात तेव्हातेव्हा मी कोणतेही पैसे घेत नाही’. डॉक्टरांच्या या वाक्यानं वडिलांना भावना दाटूवन आल्या आणि त्यांनी डॉक्टरांचे पाय धरून त्यांचे आभार मानले. ‘तुम्ही देव आहात’ असं म्हणून त्यांनी या डॉक्टरांचे आभार मानले.

असं म्हटलं जातं की 2007 पासून म्हणजेच डॉ. गणेश राख एका दशकाहून अधिक काळापासून आपल्या रुग्णालयात मुलींच्या जन्मानंतर कुटुंबीयांकडून कोणतीही रक्कम आकारत नाहीयते. ‘बेटी बचाओ’ योजनेअंतर्गत त्यांनी एक हजारहून अधिक मुलींच्या जन्मानंतर पैसे आकारले नाहीत. त्यांच्या याच कृतीनं आनंद महिंद्रासुद्धा भारावले.

सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लिहिलं, ‘दोन मुलींचा बाप असल्याच्या नात्यानं मी दोन गोष्टी जाणतो की जेव्हा तुमच्या घरी एका परीचा जन्म होतो तेव्हा किती आनंद होतो… पण हे डॉक्टरसुद्धा एक देवदूतच आहेत. दया आणि उदारतेचे देवदूत’. आठवड्याची याहून सुरेख सुरूवात असूच शकत नाही असं म्हणत त्यांनी या सकारात्मक कृतीला उचलून धरलं.

दरम्यान बीबीसीशी संवाद साधताना एकदा डॉ. राख म्हणाले होते की देशात जेव्हा मुलींच्या जन्मानंतर आनंद साजरा केला जाईल तेव्हा आपण प्रसूतीसाठीचं शुल्क आकारू. त्यांचा हा निर्णय आणि समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत या महत्त्वाच्या मार्गानं त्याच्याकडून सामाजिक कार्यात लागणारा हातभार हा अतुलनीय आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

माजी CEC राजीव कुमार HDFC चे अध्यक्ष:हरियाणा राजस्थानला देणार वार्षिक 580 दशलक्ष घनमीटर पाणी,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जनरल उपेंद्र द्विवेदी पदावरून निवृत्त आर्मीत जनरल 2....

दुःखी पती-पत्नीला संतांचा उपदेश:वैवाहिक जीवनात सुख नशिबाने नाही, तर परस्पर सामंजस्य, प्रेम, धैर्य, आदर...

0
फार जुन्या काळातील एक लोककथा आहे. एका छोट्या गावात एक जोडपे (दंपत्ती) राहत होते, त्यांचे वैवाहिक जीवन खूप सुखी होते. पती आपल्या पत्नीवर...

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर विठूनामाचा गजर:संत गजानन महाराजांच्या दिंडीचे वाढोण्यात जंगी स्वागत

0
गण गण गणात बोते, जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे बुधवारी ता. 1 मराठवाड्यात...
spot_img

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...

‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

0
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...
error: Content is protected !!