Homeदेश-विदेशनवीन विवाह कायदा हरियाणा विधनसभामध्ये भाजपच्या आमदाराच्या जोडप्यासाठी पालकांची संमती

नवीन विवाह कायदा हरियाणा विधनसभामध्ये भाजपच्या आमदाराच्या जोडप्यासाठी पालकांची संमती


नवीन विवाह कायद्याची मागणीः भारतीय लग्न सोहळे हे जगभरात प्रसिद्ध आहेत. मोठ्या संख्येनं नातेवाईकांची उपस्थिती, भेटीगाठी आणि अनेक दिवस सुरु असणारं सेलिब्रेशन ही या प्रसिद्धीमागील मुख्य कारणं आहेत. खरं तर भारतात लग्न हे केवळ दोन व्यक्तींमधील नाते मानले जात नाही तर कुटुंबांचे मनोमिलन मानले जाते. परंतु काही प्रकरणांमध्ये मुलगा आणि मुलगी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून जातात आणि त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न करतात. जरी आपला जोडीदार निवडणे हा स्वातंत्र्याचा एक भाग असला तरी, अनेकदा या असल्या निर्णयांमुळे वाद आणि तणाव निर्माण होतात.  म्हणूनच आता पळून जाऊन लग्न करण्याविरोधात कायदा करण्याची मागणी केली जात आहे.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

कुठे आणि कोणी केली ही मागणी?

पळून जाणाऱ्यांविरोधात कायदा करण्याची मागणी हरियाणा विधानसभेत करण्यात आली आहे. विधानसभेत विवाह कायद्याचा मुद्दा उपस्थित झाला. पळून जाऊन लग्न करण्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपच्या एका आमदाराने नवीन विवाह कायद्याची मागणी केली आहे. खरं तर, हरियाणा भाजपचे आमदार राम कुमार गौतम यांनी मंगळवारी शून्य प्रहरात सांगितले की लग्नापूर्वी पालकांची परवानगी अनिवार्य करावी. सफिदोन मतदारसंघातील आमदार गौतम यांनी असा युक्तिवाद केला की सध्याच्या परिस्थिती पाहता असा कायदा आवश्यक आहे. ते म्हणाले की अनेक मुले आणि मुली पळून जातात आणि अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते की पालकांना आत्महत्या करावी लागते. म्हणून सरकारने अशी तरतूद करावी की पालकांच्या परवानगीशिवाय लग्न होऊ शकत नाही.

जमिनीच्या भावातील तफावत कमी करण्याची मागणी

आमदारांच्या या मागणीवर उपस्थित इतर सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. पळून लग्न करण्याच्या मुद्द्याबरोबरच आमदार राम कुमार गौतम यांनी विधानसभेत बोलताना जमीन कलेक्टर रेटचा मुद्दाही उपस्थित केला. अनेक ठिकाणी सरकारी दर आणि जमिनीच्या बाजारभावात मोठी तफावत आहे. हा फरक दूर केला पाहिजे. कारण यामुळे भ्रष्टाचारही थांबेल, अशी मागणी राम कुमार गौतम यांनी केली.

विधानसभेबाहेरही या मागणीवर चर्चा

जेव्हा राम कुमार गौतम यांची बोलण्याची वेळ संपली तेव्हा सभापती हरविंदर कल्याण यांनी त्यांना थांबवले. गौतम यांना त्यांचे भाषण पुढे चालू ठेवायचे होते परंतु सभापतींनी हस्तक्षेप केला आणि सांगितले की जर त्यांना दुसऱ्या विषयावर काही बोलायचे असेल तर त्यांनी सूचना द्यावी. ज्याच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्याने सध्या विधानसभेच्या बाहेरही आमदारांमध्ये विवाह कायद्याच्या मागणीवर चर्चा सुरू असल्याचं चित्र दिसत आहे.

FAQ

पळून जाऊन लग्न करण्याविरोधात कायदा करण्याची मागणी कोणी केली?
हरियाणा भाजपचे आमदार राम कुमार गौतम यांनी विधानसभेत ही मागणी केली. त्यांनी शून्य प्रहरात सांगितले की, लग्नापूर्वी पालकांची परवानगी अनिवार्य करणारा कायदा बनवावा.

ही मागणी कुठे आणि कधी उपस्थित झाली?
ही मागणी हरियाणा विधानसभेत मंगळवारी (26 ऑगस्ट 2025) शून्य प्रहरात उपस्थित झाली.

राम कुमार गौतम यांनी कायदा करण्यामागचे कारण काय सांगितले?
राम कुमार गौतम यांनी सांगितले की, अनेक मुले आणि मुली पालकांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन लग्न करतात, ज्यामुळे काही वेळा पालकांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते. यामुळे पालकांच्या परवानगीशिवाय लग्न होऊ नये, अशी तरतूद असावी.

या मागणीला विधानसभेत काय प्रतिसाद मिळाला?
या मागणीवर इतर सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सभापती हरविंदर कल्याण यांनी गौतम यांना त्यांचे भाषण थांबवण्यास सांगितले आणि दुसऱ्या विषयावर बोलायचे असेल तर सूचना देण्यास सांगितले, ज्यावर पुढील निर्णय घेतला जाईल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!