Homeदेश-विदेशआपल्याला हॅपी इंडिगो डे विक्रीबद्दल माहित असणे आवश्यक आहे की घरगुती आणि...

आपल्याला हॅपी इंडिगो डे विक्रीबद्दल माहित असणे आवश्यक आहे की घरगुती आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण तिकिटांचे दर बुकिंग तारख


हॅपी इंडिगो डे विक्रीबद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक आहे: भारतात विमानसेवा पुरवणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगो एअरलाइन्सने प्रवाशांसाठी एक खास ऑफर दिली आहे. कंपनीच्या  19 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांना एक खास भेट देण्यात आली आहे. कंपनीने ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. या सेलअंतर्गत एअरलाइन स्वस्त विमान तिकिटे विकत आहे. ही ऑफर कमीत कमी किंमतीत विमान प्रवासाचा आनंद लुटण्याचा इच्छा असलेल्यांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. या ऑफरअंतर्गत तिकीटं किती रुपयांपर्यंत मिळणार आहेत पाहूयात…

किती ते किती तारखेपर्यंत करता येणार बुकींग?

इंडिगोच्या या विशेष सेलअंतर्गत, प्रवासी 10 ऑगस्ट 2025 ते 31 मार्च 2026 दरम्यानच्या प्रवासासाठी तिकिटे बुक करू शकतात. बुकिंग विंडो 3 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 00:01 वाजल्यापासून सुरू होतील. तर विशेष सवलतीअंतर्गत 6 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11.59 रोजी बुकिंग बंद होईल.

किती असणार तिकीटांचा दर?

इंडिगोच्या या सेलमध्ये, देशांतर्गत उड्डाणांसाठीची तिकीट 1 हजार 219 रुपयांना तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी 4319 रुपयांमध्ये तिकीटं उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे इंडिगो स्ट्रेच सीटसाठी 9119 पासून सुरू होते. या सर्व ऑफर 3 ऑगस्टपासून इंडिगोच्या वेबसाइट, मोबाइल अॅप आणि 6 एस्काई एआय असिस्टंटद्वारे उपलब्ध आहेत. 4 ऑगस्टपासून इतर बुकिंग प्लॅटफॉर्मवर देखील या दरांमध्ये तिकीटं उपलब्ध आहेत. देशांतर्गत उड्डांसाठीचं तिकीट हे वंदे भारतच्या 1500 रुपयांच्या तिकीटांपेक्षाही कमी आहे.

इतर कोणत्या सुविधा मिळणार?

इंडिगोच्या या सेलमध्ये, प्रवाशांना केवळ स्वस्त तिकिटेच मिळणार नाहीत, तर कमी किंमतीत अनेक अतिरिक्त सुविधा देखील मिळतील, असं कंपनीने जाहीर केलं आहे. उदाहरणार्थ, प्रवाशांना फक्त 500 रुपयांमध्ये एक्सएल सीटचा पर्याय मिळेल. त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये प्रीपेड बॅगेज आणि 15 ते 30 किलो वजनाच्या बॅगवर 50% पर्यंत सूट दिली जात आहे.

याशिवाय, फास्ट फॉरवर्ड सेवेवर देखील 50% पर्यंत सूट उपलब्ध असेल. काही निवडक फ्लाइटमध्ये 6E प्राइम आणि 6E सीट अँड ईट सारख्या सेवांवर 30% पर्यंत सूट दिली जात आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी 999 रुपयांमध्ये तिकीट कॅन्सलेशनवर एकही रुपया कापला जाणार नाही अशी योजना देखील उपलब्ध आहे. जर तुम्ही वर नमुद केलेल्या कालावधीमध्ये कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही संधी चुकवू नका. यासंदर्भातील अधिक माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पुरीमध्ये भगवान जगन्नाथ 15 दिवस आजारी राहतील:आज सोन्याच्या विहिरीतून 108 घागरी पवित्र जल आणणार,...

0
ओडिशातील जगन्नाथ मंदिरात सोमवारी देवस्नान पौर्णिमा साजरी केली जाईल. विश्वप्रसिद्ध रथयात्रेपूर्वी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांना...

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....
spot_img

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...
error: Content is protected !!