Homeदेश-विदेश‘हिंदू आतंकवाद’च्या खोट्या षड्यंत्राचा भांडाफोड; षड्यंत्र रचणार्‍यांना  कठोर शिक्षा झालीच पाहिजे! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु...

‘हिंदू आतंकवाद’च्या खोट्या षड्यंत्राचा भांडाफोड; षड्यंत्र रचणार्‍यांना  कठोर शिक्षा झालीच पाहिजे! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (NIA) न्यायालयाने आज सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्यामुळे अखेर ‘हिंदु आतंकवाद’ वा ‘भगवा दहशतवाद’ या नावाने रचलेले घृणास्पद काँग्रेसी षड्यंत्र उघडे पडले आहे. केवळ हिंदू असल्यामुळे राष्ट्रनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि अजय राहिरकर यांच्यासारख्या अनेक राष्ट्रप्रेमी व्यक्तींना अकारण वर्षानुवर्षे तुरुंगात डांबले. त्यांचा अमानुष मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला. हा केवळ त्यांच्या विरोधातील अन्याय नव्हे, तर संपूर्ण हिंदू समाजाला बदनाम करण्याचा मोठा विखारी कट होता. त्यामुळे ही केस आता बंद करून चालणार नाही; हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे षड्यंत्र रचणार्‍यांवर कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी मालेगाव बॉबस्फोटप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर केली आहे.

         श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की, मालेगाव प्रकरणात ‘हिंदु आतंकवाद’ या शब्दाचा वापर करणारे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नंतर ती चूक असल्याचे जाहीरपणे कबूल केले; पण त्यांनी तो शब्द कोणाच्या सांगण्यावरून वापरला? हिंदूंना बदनाम करण्यामागे कोणाचे षड्यंत्र होते ? त्या सूत्रधारांवरही कारवाई झाली पाहिजे. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी मध्यंतरी ‘या देशात हिंदू दहशतवाद ही पाकिस्तानातील लष्करी इस्लामी आतंकवादापेक्षा मोठी समस्या आहे’ असे विधान अमेरिकेच्या राजदूतासमोर केल्याचे विकिलिक्स केबलने उघड केले होते. हिंदू समाजावर दहशतवादाचा खोटा शिक्का मारणारे, राष्ट्रनिष्ठ व्यक्तींना यात अडकवणारे आणि तपासाच्या नावाखाली अन्याय करणारे सगळे दोषी शोधून त्यांना कठोर शिक्षा देणे हाच न्याय आहे!

   

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!