Homeदेश-विदेशUPI तर फ्री मग गुगल पे आणि फोन पेने 5065 कोटी कसे...

UPI तर फ्री मग गुगल पे आणि फोन पेने 5065 कोटी कसे कमावले? जाणून घ्या बिझनेस मॉडेल! | how did Google Pay and PhonePe earn Rs 5065 crore Know business model


गूगल पे आणि फोनपे बुईसनेस मॉडेल: युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हे डिजिटल पेमेंट्सचे एक सोपे आणि पूर्णपणे मोफत माध्यम आहे. Google Pay आणि PhonePe यांनी UPI सारख्या मोफत सेवेचा उपयोग करून आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय मॉडेल्सद्वारे प्रचंड कमाई केली आहे. किराणा दुकानांमधील व्हॉइस स्पीकर, स्क्रॅच कार्ड्सद्वारे जाहिरात, आणि इतर डिजिटल सेवांमधून मिळणारा महसूल यांच्या जोरावर या कंपन्या यशस्वीपणे मोठा नफा कमावत आहेत. त्यांचे हे मॉडेल विश्वास, तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रित सेवांवर आधारित आहे, ज्यामुळे त्या डिजिटल पेमेंट क्षेत्रात अग्रेसर राहिल्या आहेत.  Google Pay आणि PhonePe यांसारख्या कंपन्यांनी मागील वर्षी एकत्रितपणे 5,065 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. कोणतेही प्रत्यक्ष उत्पादन विक्री न करता या डिजिटल कंपन्यांनी हे यश कसे मिळवले? यामागील कारण आहे.

बिझनेस मॉडेलचा सविस्तर खुलासा

आयसी व्हेंचर कॅपिटलच्या संस्थापक भागीदार मृणाल झवेरी यांनी लिंक्डइनवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये या कंपन्यांच्या महसूल मॉडेलचा सविस्तर खुलासा केला आहे. त्यांच्या मते, या कंपन्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा लहान किराणा दुकानांमधून मिळतो. विशेषतः, PhonePe सारख्या ॲप्सनी किराणा दुकानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हॉइस-नियंत्रित स्पीकर सेवेच्या माध्यमातून कमाईचा एक स्थिर स्रोत तयार केला आहे.

कशी होते कमाई?

हे स्पीकर, जे “PhonePe वर 60 रुपये प्राप्त झाले” अशा घोषणा करतात, किराणा दुकानदारांना दरमहा 100 रुपये भाड्याने दिले जातात. ही सेवा सध्या 30 लाखांहून अधिक दुकानांमध्ये कार्यरत आहे, ज्यामुळे दरमहा 30 कोटी रुपये आणि वार्षिक 360 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. ही सुविधा केवळ ग्राहकांना UPI पेमेंट्सकडे आकर्षित करते. यासोबतच दुकानदारांना त्यांच्या व्यवहारांचा हिशेब ठेवण्यास आणि व्यवसाय वाढवण्यास मदत करते.

स्क्रॅच कार्ड्स आणि जाहीरात

या कंपन्यांच्या कमाईचे आणखी एक महत्त्वाचे स्रोत आहे स्क्रॅच कार्ड्स. ही कार्ड्स ग्राहकांना 12 रुपये कॅशबॅक किंवा कूपन्ससारख्या ऑफर्सद्वारे आकर्षित करतात. मात्र, हे केवळ ग्राहकांना प्रोत्साहन देण्यापुरते मर्यादित नाही, तर ब्रँड्ससाठी जाहिरातीचे एक प्रभावी साधन आहे. विविध ब्रँड्स त्यांच्या उत्पादनांचा प्रचार आणि दृश्यमानता वाढवण्यासाठी या स्क्रॅच कार्ड्सच्या जाहिरातीसाठी पैसे देतात. यामुळे गुगल पे आणि फोन पे यांना दुहेरी फायदा होतो. एकीकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स आणि दुसरीकडे ब्रँड्सकडून जाहिरात महसूल. हे मॉडेल एका यशस्वी गुंतवणूक यंत्राप्रमाणे कार्य करते. ज्यातून कंपन्यांना नफा मिळत राहतो.

अतिरिक्त महसूल स्रोत

या प्लॅटफॉर्म्सनी UPI च्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन इतर सेवांमधूनही कमाई वाढवली आहे. यामध्ये बिल पेमेंट्स, ऑनलाइन खरेदी, मर्चंट सर्व्हिसेस आणि डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, मर्चंट्ससाठी पेमेंट गेटवे सुविधा, क्रेडिट स्कोअर तपासणी, आणि विमा किंवा म्युच्युअल फंड खरेदी यांसारख्या सेवांमधून कमिशन मिळवले जाते. याशिवाय डेटा ॲनालिटिक्स आणि पर्सनलाइज्ड मार्केटिंग सेवांमधूनही या कंपन्या महसूल मिळवतात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!