आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी शिक्षण घेतलेल्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील सर्व परदेशी शाळा बंद करण्याचे आवा
?
हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यासाठी त्यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे ज्या इंग्रजी शाळेत शिकले, त्या शाळेचे नावही घेतले होते. यावरुन राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मोदींना सांगून या देशातल्या सर्व इंटरनॅशनल स्कूल, परदेशी शाळा बंद करा, या संदर्भात एक उत्तम जीआर काढा, तुम्हाला जीआर काढण्याची हौस आहेच, अशा शब्दात राऊत यांनी पलटवार केला आहे. या महाराष्ट्रातील सर्व इंटरनॅशनल शाळांच्या छत्र्या उगवलेल्या आहेत, तो धंदा तुमचेच लोक करत आहेत. तुमच्या शिक्षण सम्राटांचा हा धंदा बंद करण्याचे आवाहन देखील संजय राऊत यांनी केले आहे.
मुंबई तोडण्याचे प्रयत्न तुमचे दिल्लीतले ‘बाप’ करत आहेत
मुंबईला कमजोर करण्याचे, मुंबई तोडण्याचे प्रयत्न तुमचे दिल्लीतले ‘बाप’ करत आहेत. अशा शब्दात राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भावनिक मुद्दे काढले जातील, मुंबई तोडण्याची भीती दाखवली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्याला देखील राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चोराच्या मनात चांदणे, असे म्हणत राऊत यांनी फडणवीस यांना स्वप्नात देखील मुंबई तोडलेली दिसत असेल, असा आरोप केला आहे. वास्तविक त्यांच्यावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा दबाव असल्याचे म्हटले आहे. तसे नसते तर धारावी आणि मुंबईची जागा त्यांनी गौतम अदानी यांच्या घशात घातली नसती, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…





























