Homeदेश-विदेशआर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी केंद्र सरकारकडे निधीची मागणी

आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी केंद्र सरकारकडे निधीची मागणी

‘सहकार मंथन’ बैठकीत मंत्री बाबासाहेब पाटील यांचा ठाम पवित्रा

देश-विदेश  (नवी दिल्ली, दि.३०) : राज्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या सात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने 2004 व 2014 प्रमाणेच प्रायोजित स्वरूपात निधी द्यावा, अशी स्पष्ट मागणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सोमवारी नवी दिल्लीत केली. भारत मंडपममध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘सहकार मंथन’ या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीत सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशीष कुमार भूटानी यांच्यासह देशभरातील विविध राज्यांचे सहकार मंत्री, सचिव आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष 2025 च्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली.

राज्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून कर्जपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अडचणीत असलेल्या जिल्हा बँकांना केंद्र सरकारकडून आर्थिक हातभार लागणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी अधोरेखित केले. “या बँकांचे पुनरुज्जीवन करायचे असल्यास केंद्राने तातडीने निधी द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

बैठकीत प्राथमिक कृषी सहकारी संस्था (पॅक्स) यांचे डिजिटल सक्षमीकरण, गट सचिवांची संख्या वाढविणे, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अर्थसहाय्य, तसेच सहकारी संस्थांचे विविध व्यवसायांमधील योगदान यावरही सखोल चर्चा झाली. राज्यातील सुमारे २१,००० पॅक्स संस्थांचे संगणकीकरण पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

“सहकारी संस्था केवळ कर्जवाटपापुरती मर्यादित राहू नयेत. दुग्धव्यवसाय, खरेदी-विक्री, प्रक्रिया उद्योग आदी क्षेत्रांमध्येही त्यांना सक्षम बनवायचे आहे,” असे स्पष्ट करत पाटील यांनी सहकार क्षेत्रात नव्या शक्यता अधोरेखित केल्या.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सहकारी संस्थांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी पारदर्शक आणि प्रभावी कारभार करण्याचे निर्देश दिले. “सहकार क्षेत्र हे ग्रामीण भारताचा कणा आहे. त्यामुळे सहकारी संस्थांनी लोकाभिमुख काम करावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य-केंद्र समन्वय वाढवून नव्या सहकारी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही काळाची गरज आहे. “ही बैठक सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल,” असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!