Homeमनोरंजनधक्कादायक पॅरास छाब्राने शेफली जारीवाला पॉडकास्ट व्हिडिओ दरम्यान कुंडली वाचल्यानंतर अचानक मृत्यूचा...

धक्कादायक पॅरास छाब्राने शेफली जारीवाला पॉडकास्ट व्हिडिओ दरम्यान कुंडली वाचल्यानंतर अचानक मृत्यूचा अंदाज वर्तविला होता


धक्कादायक व्हिडिओ शेफली जरवाला अचानक मृत्यू: अभिनेत्री शेफाली जरीवालाचं वयाच्या 42 व्या वर्षी आकस्मिक निधन झाल्याने मनोरंजनसृष्टीला शुक्रवारी मोठा धक्का बसला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफाली तिच्या अंधेरीमधील घरी मृतावस्थेत आढळून आली. मात्र तिचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. शेफालीला तातडीने अंधेरीमधील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. शेफालीच्या मृत्यूचा चाहत्यांना धक्का बसलेला असतानाच एक जुना व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये एका व्यक्तीने शेफालीच्या मृत्यूची भविष्यवाणीच केलेली की काय अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.

मृत्यूनंतर व्हिडीओ व्हायरल, सर्वांनाच बसला धक्का

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा पारस छाबराच्या पॉडकास्टमधील आहे. या व्हिडीओमध्ये पारस हा शेफालीची कुंडली पाहून ‘आकस्मिक मृत्यू’ची शक्यता व्यक्त करताना दिसतोय. आता शेफालीच्या मृत्यूनंतर हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

कुंडली पाहून काय म्हणालेला तो?

ऑगस्ट 2024 मध्ये शेफाली पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये ‘आबरा का डाबरा’ या कार्यक्रमात सहभागी झालेली. यापूर्वी पारस आणि शेफाली बिग बॉस 13 च्या पर्वात एकत्र झळकले होते. यावेळी पारसने शेफालीची कुंडली पाहून सर्वांनाच गोंधळवून टाकणारं विधान केलेलं. “तुझ्या कुंडलीमध्ये आठव्या घरात चंद्र, बुध आणि केतू बसलेले आहेत. चंद्र आणि केतूचा असा एकत्र योग येणं हे सर्वात वाईट असतं. आठव्या घरात हे दोघे आहेत यावरुन काहीतरी गमावणार हे निश्चित आहे. अचानक मृत्यू, प्रिसिद्धी लोप पावणे, लपून ठेवलेलं गुपित समोर येणं, तांत्रिकाशीसंबंधित गोष्टींबद्दलची शक्यताही नाकारता येत नाही. आधीच चंद्र आणि केतूमुळे वाईट परिस्थिती असताना त्यात बुधही सहभागी झाला आहे. यामधून अस्वस्थता आणि न्यूरोलॉजिकल समस्यांचे संकेत मिळतात,” असं पारसने शेफालीची कुंडली पाहून म्हटलं होतं.

एपिलिप्सिव्हर चटई

या पॉडकास्टमध्ये शेफालीने तिने कशाप्रकारे एपिलिप्सीवर मात केली याबद्दलचा अनुभव सांगितलेला. कशाप्रकारे खाण्यापिण्याच्या सवयी आणि नियमित औषधोपचाराने आपण यावर नियंत्रण मिळवलं हे शेफालीने सांगितलं. पारस हा शेफालीचा नवरा पराग त्यागीचाही चांगला मित्र आहे. तो अनेकदा बीग बॉस 13 मध्ये शेफालीचा उल्लेख ‘भाभी’ असा करायचा.

त्याची इन्स्टाग्राम स्टोरी

शेफालीच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर पारसने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेफालीसोबतचा फोटो शेअर करत, “कोणाचं आयुष्य किती लिहिलेलं आहे कोणालाच ठाऊक नाही, ओम शांती” अशी कॅप्शन दिली होती.

शेफालीचं काम…

शेफालीला सर्वात आधी ‘काँटा लगा’ गाण्यातून लोकप्रियता मिळाली. 2008 साली शेफाली बुगी-वुगी कार्यक्रमातही सहभागी झालेली. तिने 2025 अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं. पराग आणि शेफाली हे दोघे ‘नच बलिए’ या डान्स रिअॅलिटी शोमध्येही सभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या पाचव्या आणि सातव्या पर्वात दोघेही सहभागी झालेला. त्याचप्रमाणे मध्यंतरी शेफाली अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस 13’मध्येही सहभागी झाली होती.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!