आयएनडी वि इंजिन टेस्ट: भारत आणि इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना हा बर्मिंघमच्या एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने लीड्समध्ये खेळवण्यात आलेला पहिला सामना 5 विकेटने गमावला ज्यामुळे इंग्लंडने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. असं असताना आता टेस्ट सीरिजमधील दुसरा सामना जिंकणं भारतीय टेस्ट संघासाठी अतिशय महत्वाचं असेल. हा सामना 2 जुलै ते 6 जुलै दरम्यान खेळवला जाईल.
एजबेस्टनच्या पिचवर कोणाचा असणार दबदबा :
भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा टेस्ट सामना हा एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मैदानात फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळतो. या मैदानात सुरुवातीला दोन ते तीन दिवस ही पिच फलंदाजांसाठी मदतशीर ठरते. परंतू ओवरकास्ट कंडीशंस झाल्यावर वेगवान गोलंदाजांना या पीचकडून थोडी मदत मिळते. परंतू या पिचवर फलंदाजच जास्त हावी असतात.
एजबेस्टनमध्ये खेळवण्यात आले 60 टेस्ट सामने :
एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत 60 टेस्ट सामने खेळवण्यात आले असून या मैदानावर पहिल्या इनिंगमध्ये सरासरी स्कोअर 302 धावांचा राहिला आहे. तर दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा फलंदाजीचाच दबदबा पाहायला मिळालाय. दुसऱ्या इंनिंगमध्ये सुद्धा सरासरी स्कोअर 302 धावा हा आहे. तथापि, चौथ्या इनिंगमध्ये पिच कठीण होते. शेवटच्या इनिंगमध्ये सरासरी धावसंख्या ही 157 धावा आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 19 सामने जिंकले आहेत. तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने 23 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
हेही वाचा : गौतम गंभीरने ऋषभ पंतच्या सेलिब्रेशनवर आणली बंदी? नेमकं कारण काय?
विजयासाठी इंग्लंडला दिलं होतं 371 धावांचं आव्हान :
पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना भारताकडून आधी केएल राहुलने मग त्यापाठोपाठ ऋषभ पंतने आपलं शतक पूर्ण केलं. मात्र राहुल आणि पंतने फलंदाजीत ठेवलेली ही लय टीम इंडियाच्या उर्वरित फलंदाजांना कायम ठेवता आली नाही. परिणामी 400 हुन अधिक धावांचं टार्गेट देण्याची अपेक्षा असताना टीम इंडिया (Team India) 364 धावांवर ऑल आउट झाली. टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या सामन्यात विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने हे आव्हान 5 विकेट राखून पूर्ण केलं.
भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज वेळापत्रक :
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : 20 ते 24 जून
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना : 2 ते 6 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना : 10 ते 14 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना : 23 ते 27 जुलै
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट































