Homeमहाराष्ट्रExclusive : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मनोमिलन कसं झालं? संजय...

Exclusive : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मनोमिलन कसं झालं? संजय राऊत यांनी सांगितलं नेमकं कारण


राज ठाकरेवरील संजय रत – उदव ठाकरे: राज ठाकरे यांनी 2005 मध्ये शिवसेनेची साथ सोडली आणि नवीन पक्षाची स्थापना केली. राजकीय मतभेदामुळे काका बाळासाहेब ठाकरे आणि भाऊ उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर आज 2025 मध्ये हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठी माणसासाठी एकत्र येणार आहे. 5 जुलैला होणाऱ्या मोर्चासाठी दोन्ही भाऊ अनेक वर्षांनंतर एकाच विषयासाठी सरकारविरोधात उभे राहणार आहेत. पण या दोन भावांचं मनोमिलन कसं झालं. या दोघा भावांमध्ये संवाद आहे का? याचं नेमकं कारण खासदार संजय राऊत यांनी झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या ‘टू द पॉइंट’ या मुलाखतीत सांगितलं आहे.

परद्यामागे एक पटकथा कोण लिहितंय?

या मुलाखात संजय राऊत म्हणाले की, पटकथा लिहिली जातेय म्हणून तर उद्याचा मोर्चा एकत्र होतोय ना. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील लोकांची ही इच्छा आहे. महाराष्ट्रात जसंजसं आक्रमण दिल्ली आणि गुजरातचे वाढत आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्रात हल्ले होत आहेत. तेव्हा लोकांच्या मनात एकच भावना आहे की, मराठी माणसांमध्ये फूट पडल्यामुळे आमच्यावर आक्रमण होतं आहे. यासाठी मराठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे. जी बाळासाहेबांची अभेद संघटना होती मराठी माणसांची ती निर्माण व्हायला पाहिजे. ही लोक भावना आहे. मग लोक भावनेमध्ये काय मुद्दा असतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्राच्या दुश्मनाशी लढता येणार नाही. हे ठाकरे ब्रँड आहे त्यांनी एकत्र आलं पाहिजे. बाकी कोणी एकत्र नाही आले तरी चालेल. लोकांची भावना काय आहे की ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे. आम्ही असं ठरवले म्हणजे उद्धव ठाकरे यांनी असं ठरवलं की, वारंवार आपल्या बाबतीत हा प्रश्न विचारला जातो, शिवसेना मनसेला सोबत घ्यायला तयार नाही. आणि म्हणून एकत्रिकरण होत नाही आहे. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या एका मुलाखतीतून ऐक्याची साद घातली. सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठी माणूस आणि महाराष्ट्र संकटात आहे. लचके तोडले जात आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून.

ब्रँड ठाकरे म्हणजे नेमकं काय?

पुढे ते म्हणाले की, अशात उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब पुढल्या 10 मिनिटांमध्ये राज ठाकरे यांच्या जी साद होती त्याला प्रतिसाद दिला. की आम्ही तयार आहोत. आपल्यामध्ये काही मतभेद असतील, काही इतर विषय असतील ते संपवून महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसांच्या हितासाठी मी हात पुढे करायला तयार आहे. याचा एक चांगला परिणाम झाला. जशी वीज चमकावी अशी महाराष्ट्रात ऊर्जा निर्माण झाली मराठी लोकांमध्ये. लोकाही म्हणाले हे छान आहे, हे व्हायलाच पाहिजे. त्यानंतर अशा अनेक घडामोडी प्रक्रिया होतात. जसा आता हा विषय आहे, मराठी भाषेवर जी लादली जाते आहे हिंदी भाषा त्यानिमित्ताने दोन पक्ष आपल्या आपल्या भूमिका मांडत असताना दोघांनी आपली कार्यक्रम ठरवले. पण हा विषय इतका गंभीर आहे की, लोकांना आवडणार नाही. काल आम्ही निर्णय घेतला, 7 जुलैला मोर्चा काढण्याचा कृती समितीसोबत. तेव्हा मी बाहेर आलो मातोश्रीच्या तेवढात राज ठाकरेंचा फोन वाजला. आम्ही जुने मित्र आहोत. तेव्हा राज ठाकरे म्हणाली की, संजय बघा मी आताच पाहिलं शिवसेना 7 जुलैला मोर्चा काढणार आहे. आम्ही 6 जुलैला मोर्चा काढणार आहोत. दोघांचे विषय एकच आहे. थोडं बरं दिसणार नाही, एकाच विषयावर दोन मराठी माणसांचा विचार करणारा संघटना वेगवेगळे मोर्चे काढत आहेत. हे चित्र थोड वेगळे दिसेल. त्यावर मी म्हणालो हो, हे चित्र नक्कीच वेगळं दिसेल. मग काय करायला पाहिजे. त्यावर राज ठाकरे म्हणाले की आपण एकत्र मोर्चा काढला पाहिजे.  मी लगेचच गाडीतून उतरलो आणि मातोश्रीत जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. मी म्हटलं की राज असं म्हणतोय आणि मला त्याची भूमिका योग्य वाटतेय. उद्धव ठाकरे यांनी क्षणाचाही विचार न करता योग्य आहे. आपल्या माहिती नाही, त्यांनी मोर्चा जाहीर केला ते. एकाच वेळी दोन पत्रकार परिषद झाल्यात. अशात आपण काय करायला पाहिजे. तेव्हा मी म्हणालो, आपल्या मनात मराठी माणसासाठी कोणताही किंतूपंरतू नाही. आपण याला सुद्धा प्रतिसाद दिला पाहिजे.

…म्हणून मोर्चाची तारीख बदलण्यात आली!

आणि फक्त मुद्दा एवढाच आहे की, आपला मोर्चा 7 जुलैला सोमवारी आहे आणि त्यांचा 6 जुलैला आहे. आपण सुद्धा 6 तारखेचा विचार करत होतो, रविवार म्हणून…पण 6 जुलैला आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीला मुंबई असेल संपूर्ण महाराष्ट्र असेल हा विठ्ठल भक्तीमध्ये दिंड्या पताका देव्हळ्यात जाणं. पूजा अर्चा करणं. त्यामध्ये लोकं अडकलेले असतील. आपला जो विचार आहे, संघर्ष लोकांपर्यंत जाणार नाही. म्हणून आपण 7 तारखेला ठेवला आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. दिवस बदलता येतोय का पाहा. आमची ही स्पष्ट भूमिका आहे, मी परत बाहेर येत राज ठाकरेशी बोललो.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी बोलत आहेत का?

संजय राऊत म्हणाले की, एक लक्षात घ्या ते दोन भाऊ आहेत. लहानपणापासून ते एकत्र राहिले आहेत. बाळासाहेब ठाकरे असतील, माँ साहेब असतील श्रीकांतजी असतील हे एकत्र कुटुंबच होतं आणि आहे. त्याच्यात तो ओलावा तर आहे. राजकारणात थोडेफार मतभेद झालेत. त्या दोघांनी एकमेकांशी एकत्र चर्चा केली की नाही, हे मी का सांगू? पण हो त्यांच्यामध्ये संवाद नक्कीच आहे. बघा ना संवाद नसता तर उद्याच पाऊल उद्धव ठाकरेंनी टाकलंच नसतं. संवाद आहे, मनातील किल्मिष दूर झाली आहे आणि आपल्याला एकत्र येयचं ही मानसिकता आहे, ही संवाद असल्याशिवाय होत नाही. आणि हा संवाद असायलाच पाहिजे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भगवंत मान म्हणाले- काँग्रेसमध्ये 500 कोटींमध्ये मुख्यमंत्री बनतो:मजीठियावरही निशाणा, म्हणाले- जामिनावर बाहेर आले, किल्ला...

0
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंजाबमधील २८०० डेपो धारकांना नवीन परवाने सुपूर्द केले. यावेळी मोहाली येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!