Homeमनोरंजननव्या नियमाने खेळला जाणार टेस्ट क्रिकेट, 'या' चुकीबद्दल फील्डिंग करणाऱ्या संघाला बसणार...

नव्या नियमाने खेळला जाणार टेस्ट क्रिकेट, ‘या’ चुकीबद्दल फील्डिंग करणाऱ्या संघाला बसणार दंड

मनोरंजन (क्रिकेट) : चाचणी क्रिकेटमधील आयसीसी नवीन नियमः क्रिकेटचं विश्व सतत बदलत असतं आणि हे बदल खेळ आणखी रोचक बनवतात. अनेक नियम वेळेनुसार, खेळाडूंच्या वागणुकिणीसार  नवीन नियम आणणे आवश्यक असते. अशाच एका नव्या बदलाचा अनुभव आता टेस्ट क्रिकेटमध्ये पाहायला मिळणार आहे. आयसीसीने टेस्ट मॅचेसमध्येही ‘स्टॉप क्लॉक’ नियम लागू केला आहे. हा नियम वनडे आणि टी-20 मॅचमध्ये आधीपासूनच आहे, पण आता तो टेस्ट क्रिकेटमध्येही लागू करण्यात आला आहे.

काय आहे हा नियम?

नव्या नियमानुसार, फील्डिंग करणाऱ्या संघाने एका ओव्हरच्या शेवटीनंतर एक मिनिटाच्या आत पुढचा ओव्हर सुरू करण्यासाठी तयार असायला हवं. जर संघ वेळेत तयार नसला, तर अंपायर त्या टीमला दोन वेळा वॉर्निंग देतील.

दोन वेळा वॉर्निंग, नंतर थेट 5 रनचा दंड!

जर दोन वेळा वॉर्निंग दिल्यानंतरही संघ वेळेचा आदर करत नसेल, वेळेत पुढील ओव्हर सुरु करत नसेल तर त्याला दंड बसणार. हा दंड साधासुधा नसून थेट 5 रनची पेनल्टी फील्डिंग टीमवर लावली जाईल. याचा अर्थ असा की फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात पाच अतिरिक्त धावा जमा होतील.

80 ओव्हरपर्यंत नियम लागू, मग होईल रिसेट

हा नियम 80 ओव्हरपर्यंत लागू राहणार असून त्यानंतर वॉर्निंग्स रिसेट केल्या जातील. याचाच अर्थ असा की पुन्हा नव्यानं वॉर्निंग दिल्या जातील.

नवीन उदाहरणे …

या प्रकरणाचे ताजे उदाहरण म्हणजे इंडिया वि. इंग्लंड टेस्ट मॅचमध्ये अंपायर्सनी बेन स्टोक्स आणि शुभमन गिलला वेळेच्या बाबतीत वॉर्निंग दिली होती.

कधीपासून आला नियम?

हा नियम आता अधिकृतपणे 2025-27 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) पासून लागू करण्यात आलेला आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Maharashtra Government Stops Free Saree Scheme; Eknath Shinde Policy Halted

0
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तून पडताळणीदरम्यान ९२ लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना...

NEET-UG 2026 निकाल घोषित: 11.21 लाख विद्यार्थी पात्र

0
नवी दिल्ली52 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करानॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने गुरुवारी NEET-UG 2026 चा निकाल जाहीर केला आहे. या वर्षी देश-विदेशातील 551 शहरांमधील 5,440...

जगन्नाथ रथयात्रा:87 दिवसांत 220 कारागीर तीन रथ बनवतात, यात्रेनंतर एक चाक 3 लाखांपर्यंत विकले...

0
ओडिशातील पुरी येथे आज भगवान जगन्नाथाची रथयात्रा काढण्यात येत आहे. भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह वेगवेगळ्या रथांमध्ये स्वार...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...
spot_img

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...

MG नवीन हायब्रिड व EV तंत्रज्ञान उद्या सादर करेल:SUV 69.2kWh बॅटरी पॅकसह 530 किमीची...

0
एमजी मोटर्स 16 जुलै रोजी भारतात आपली नवीन 'न्यू एनर्जी व्हेईकल' टेक्नॉलॉजी सादर करणार आहे. कंपनी या कार्यक्रमात आपली नवीन प्लग-इन हायब्रिड किंवा...
error: Content is protected !!