Homeमहाराष्ट्रबस थांब्यावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे : परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

बस थांब्यावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे : परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

महाराष्ट्र (मुंबई) : पंढरपूर वारीसाठी सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर येथे वाढीव बसगाड्या देण्यात याव्यात. प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व बस थांबा परिसरात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश परिवहन, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीस विभागाचे सहसचिव रा.मो.होळकर, वाहतूक महाव्यवस्थापक नि. नि. मैंद, उपमहाव्यवस्थापक श्री. बोंबले, महाव्यवस्थापक जयेश बामणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, पूर्ण क्षमतेने बसगाड्या पुरविण्यात याव्यात. कोरोना कालावधीत बंद झालेल्या मार्गिका पुन्हा सुरू करण्यात याव्यात. २५१ बस डेपोपैकी उर्वरित १२ डेपोला गाड्यांचे वितरण करण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी. सार्वजनिक –खासगी भागीदारीवर डेपो देण्यासाठी वापर, परतावा याबाबतचे अभ्यासपूर्ण निरीक्षण करावे. डेपो अंतर्गत स्वच्छतागृह, विश्रामगृह व तृतीयपंथी यांच्यासाठी असलेल्या सुविधांची पाहणी करावी आणि त्या उपलब्धतेबाबत कार्यवाही करावी.

प्रवाशांच्या व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सर्व आगार, बस स्थानके, विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यालय, मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था व मध्यवर्ती कार्यशाळा अशा सुमारे ६५० ठिकाणी नवीन सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासंदर्भात योग्य निकष वापरून कार्यवाही करावी, असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.

नवीन २६४० पैकी १६६९ वाहनांचे वितरण करण्यात आले आहे. तीन हजार अत्याधुनिक उपकरणांसह नवीन वाहने खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!