Homeमनोरंजनभारतीय क्रिकेटपटू शिवम दुबे आणि पत्नी अंजुम खान मुंबईत 2 लक्झरी हाऊस...

भारतीय क्रिकेटपटू शिवम दुबे आणि पत्नी अंजुम खान मुंबईत 2 लक्झरी हाऊस खरेदी करतात

मनोरंजन (क्रीडा): मुंबईत आपलं स्वतःच हक्काचं घर असावं अशी इच्छा अनेकांना असते. मुंबईतील गगनचुंबी इमारती आणि त्यातले आलिशान फ्लॅट अनेकांना आकर्षित करतात. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत भारतातील अनेक दिग्गज आणि नामवंत लोकांची घर आहेत. भारतातील अनेक क्रिकेटर्सनी देखील मुंबईत त्यांचं हक्काची घर विकत घेतलीयेत. आता भारताचा स्टार फलंदाज आणि आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सचा भाग असलेला शिवम दुबे (Shivam Dube) याचाही या यादीत समावेश झाला असून याने पत्नी सह मुंबईत 2 आलिशान घर खरेदी केलं आहे.

कुठे खरेदी केलाय आलिशान फ्लॅट?

ऑनलाइन प्रॉपर्टी पोर्टल Squareyards.com द्वारे नोंदणी महानिरीक्षक (IGR) च्या वेबसाइटवर पुनरावलोकन केलेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, शिवम दुबे आणि पत्नी अंजुम खान यांनी खरेदी केलेल्या फ्लॅटची एकूण किंमत जवळपास 27.50 कोटी रुपये आहे. जून 2025 मध्ये याचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं असून हे दोन्ही अपार्टमेंट डीएलएच एन्क्लेव्ह नावाच्या निवासी प्रकल्पात आहेत आणि शेजारील मजल्यांवर आहेत. या दोन्ही अपार्टमेंटचे एकूण कार्पेट क्षेत्र 4,200 चौरस फूट (390 चौरस मीटर) आहे आणि त्यांच्याकडे 3800 चौरस फूट 353 चौरस मीटर) चा टेरेस देखील आहे. दोन्ही अपार्टमेंटचे एकूण बिल्ट-अप क्षेत्रफळ 892.19 चौरस मीटर (9,603 चौरस फूट) आहे.

हेही वाचा : Ind vs ENG: ish षभ पंतला ‘हाय’ फॉल्ट त्रुटी महागात, चाचणी दम्मा आहे

शिवम दुबेने हे फ्लॅट्स देव लंड आणि हाउसिंग लिमिटेड (Dev Land and Housing Limited) कडून खरेदी करण्यात आले आहेत. यात तीन पार्किंगचा देखील समावेश आहे. या फ्लॅटच्या खरेदीवर एकूण 1.65 कोटींचं स्टॅम्प शुल्क आणि 30,000 रुपयांची नोंदणी शुल्क भरावं लागलं आहे. शिवम दुबेच हे घर अंधेरी भागात असून हे ठिकाण वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे, लिंक रोड, एसवी रोड आणि वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो लाइन इत्यादींशी जोडलेलं आहे.

शिवम दुबेची कारकीर्द :

शिवम दुबेचा जन्म 25 जून 1993 रोजी झाला असून त्याने भारतीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये पदार्पण केलं होतं. शिवम दुबे हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळतो. तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो मागील काही वर्षांपासून चेन्नई सुपरकिंग्सचा भाग आहे. शिवम दुबे हा भारताच्या टी 20 वर्ल्ड कप संघाचा भाग होता ज्यांनी 2024 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

अमृतसरमध्ये बॉयफ्रेंडला जिवंत जाळले:ब्रेकअपनंतर भेटायला आला होता, गर्लफ्रेंड आणि तिचा चुलत भाऊही भाजले, दोघांना...

0
अमृतसरमध्ये गर्लफ्रेंडने चुलत भावासोबत मिळून बॉयफ्रेंडला जिवंत जाळले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आग लागल्यावर संतापलेल्या बॉयफ्रेंडने दोघांनाही आपल्याकडे ओढले. त्यामुळे गर्लफ्रेंड आणि तिचा...

पुणे शहरात विविध अपघातांत 3 जणांचा मृत्यू:कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी, लोणीकंद परिसरात घटना

0
पुणे शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी आणि पुणे-अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात या अपघाताच्या घटना घडल्या...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपले विचार सकारात्मक, वाणी मधुर आणि संयमित असावी, सर्व लोकांशी...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; आपले विचार सकारात्मक असले पाहिजेत, आपले बोलणे दयाळू आणि आदरयुक्त असले पाहिजे...

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...
spot_img

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...
error: Content is protected !!