Homeसांस्कृतिकपाणी - हळद ट्रेंड चुकूनही करु नका! नाहीतर तुमच्या घरी संकट येईल;...

पाणी – हळद ट्रेंड चुकूनही करु नका! नाहीतर तुमच्या घरी संकट येईल; ज्योतिषाचा धोकादायक इशारा Viral Video

सांस्कृतिक : पाणी आणि हळद : हा सोशल मीडियाचा जन्माना आहे, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. सोशल मीडियावर दररोज एक नवीन ट्रेंड येत असतो. सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमधील ट्रेंड सध्या क्षणात व्हायरल झाला आहे. हा ट्रेंड तुम्हाला माहिती असेलच, आम्ही बोलत आहोत, हळद आणि पाणी हा ट्रेंड खूप चर्चेत आहे. या ट्रेंडचा पहिला व्हिडीओ एका लहान मुलांसोबत केलेला प्रयोग दाखवण्यात आला आहे. त्यानंतर हा ट्रेंड नेटकरी करत आहेत. यामध्ये लोक फोनच्या टॉर्चवर एक ग्लास पाणी भरुन ठेवतात. त्यानंतर एका चमच्याने हळद हळूहळू टाकलं जातं.

हळद पाण्यात मिसळून रंग बदलताच त्या चिमुकल्याचे डोळे मोठे होतात आणि चेहरा आश्चर्याने भरून जातो. मुलीची ही निरागस आणि गोंडस प्रतिक्रिया सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आणि लोक त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. पण आता या ट्रेंडबद्दल ज्योतिषशास्त्राने आक्षेप घेतला आहे.

हा ट्रेंड करुन लोक स्वतःसाठी संकटाला आमंत्रण देत आहेत, असं सोशल मीडियावरील एका ज्योतिषशास्त्र अरुण कुमार व्यास नावाच्या एका ज्योतिषीने या विचित्र ट्रेंडबद्दल गंभीर इशारा दिला आहे. त्यांचा असा दावा आहे की, असे करून तुम्ही तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ देत नाही तर ही कृती भूतांनाही आमंत्रण देण्यासारखे आहे. ज्योतिषाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, अनेक नेटिझन्स गोंधळात पडले आहेत.

ज्योतिषी व्यास यांचा दावा आहे की पाण्यात हळद मिसळणे ही सामान्य प्रक्रिया नाही तर एक तांत्रिक विधी आहे. त्यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये लोकांना इशारा दिला आहे की, चुकूनही हे करून पाहू नका कारण यामुळे त्यांच्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. इतकंच नाही तर त्यांना भूतांचा त्रास देखील होऊ शकतो.

त्यांनी सांगितले की अशा कृती तुमच्या जन्मकुंडलीतील चंद्र आणि गुरु ग्रह कमकुवत करू शकतात, ज्याचा तुमच्या नशिबावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमची मानसिक स्थिती देखील बिघडू शकते. ज्योतिषाने असा दावा केला की ही पूर्णपणे हानिकारक प्रक्रिया आहे, जी तुमच्या घरात संकट आणू शकते. म्हणून, अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत.

पाण्यात हळद घालण्याच्या ट्रेंडबद्दल एका ज्योतिषाचा हा इशारा देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. काही तासांतच तो 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका वापरकर्त्याने काळजीने लिहिले, मी व्हिडीओ बनवला आहे. आता मी काय करावे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं, अनेक ज्योतिषी आपल्याला पाण्यात हळद पावडर घालून आंघोळ करण्यास सांगतात. कृपया उत्तर द्या. दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, जर आपण पाण्यात हळद पावडर घालून आंघोळ केली तर काय होईल.

(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. शिवतेज न्यूज या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

अमृतसरमध्ये बॉयफ्रेंडला जिवंत जाळले:ब्रेकअपनंतर भेटायला आला होता, गर्लफ्रेंड आणि तिचा चुलत भाऊही भाजले, दोघांना...

0
अमृतसरमध्ये गर्लफ्रेंडने चुलत भावासोबत मिळून बॉयफ्रेंडला जिवंत जाळले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आग लागल्यावर संतापलेल्या बॉयफ्रेंडने दोघांनाही आपल्याकडे ओढले. त्यामुळे गर्लफ्रेंड आणि तिचा...

पुणे शहरात विविध अपघातांत 3 जणांचा मृत्यू:कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी, लोणीकंद परिसरात घटना

0
पुणे शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी आणि पुणे-अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात या अपघाताच्या घटना घडल्या...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपले विचार सकारात्मक, वाणी मधुर आणि संयमित असावी, सर्व लोकांशी...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; आपले विचार सकारात्मक असले पाहिजेत, आपले बोलणे दयाळू आणि आदरयुक्त असले पाहिजे...

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...
spot_img

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...
error: Content is protected !!