Homeमनोरंजनराहुल, पंतने कमावलं आणि शेपटाने गमावलं, टीम इंडिया 364 धावांवर ऑल आऊट

राहुल, पंतने कमावलं आणि शेपटाने गमावलं, टीम इंडिया 364 धावांवर ऑल आऊट

मनोरंजन (क्रीडा) : Ind vs ENG 1 ला चाचणी: भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. सोमवारी 23 जून रोजी या सामन्याचा चौथा दिवस असून यादिवशी भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना आधी केएल राहुलने मग त्यापाठोपाठ ऋषभ पंतने आपलं शतक पूर्ण केलं. मात्र राहुल आणि पंतने फलंदाजीत ठेवलेली ही लय टीम इंडियाच्या उर्वरित फलंदाजांना कायम ठेवता आली नाही. परिणामी 400 हुन अधिक धावांचं टार्गेट देण्याची अपेक्षा असताना टीम इंडिया (Team India) 364 धावांवर ऑल आउट झाली.

राहुल, पंतची शतकीय खेळी :

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लीड्समधील हेडिंग्लेच्या मैदानात सामना खेळवला जात आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारतीय फलंदाजांनी कमालीची खेळी करून स्कोअर बोर्डवर तब्बल 471 धावसंख्या केली. यात भारताकडून यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत या तिघांनी शतक ठोकले. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांनी 465 धावांवर ऑल आउट केले. ज्यामुळे भारताने 6 धावांनी आघाडी घेऊन फलंदाजीच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली. यावेळी सलामीवीर फलंदाज केएल राहुलने शतक ठोकलं. केएल राहुलने 202 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. राहुलनंतर इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या इंनिंगमध्ये पुन्हा दमदार फलंदाजी करून ऋषभ पंतने शतक ठोकलं. त्याने 130 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं.

टीम इंडियाची फलंदाजी गडगडली :

ऋषभ पंत आणि केएल राहुल यांनी भारतासाठी फलंदाजीत चांगली पार्टनरशिप केली. दोघांनी जवळपास 245 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाचे उर्वरित फलंदाज पुढे अशीच कामगिरी कायम ठेवतील अशी अपेक्षा असताना पंतच्या विकेटनंतर भारताची फलंदाजी गडगडली. पंटनंतर आलेला करुण नायर 20 धावांवर बाद झाला. त्यानंतर 91 व्या ओव्हरमध्ये इंग्लंडने भारताच्या तीन विकेट घेतल्या ज्यात शार्दूल ठाकूर, बुमराह आणि सिराजचा समावेश होता. त्यानंतर रवींद्र जडेजाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसिद्ध कृष्णाची दहावी विकेट गेल्यामुळे जडेजा 25 धावांवर नाबाद राहिला. परिणामी टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये 364 धावांवर ऑल आउट झाली. टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या सामन्यात विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं.

भारताची प्लेईंग 11 :

यशसवी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्नाधर), ish षभ पंत (विकेटकीपर), करुन नायर, रवींद्र जडेजा, शार्डुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिरीज, प्रासिध कृष्णा.

इंग्लंडची प्लेईंग 11 :

झॅक क्रॉली, बेन डॉकेट, ओली पोप, जो रूट, हरे ब्रूक, बेन स्टोक्स (कर्नाधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वॉक्स, ब्रिजन कार, जोश तुंग, शोएब बशीर

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

अमृतसरमध्ये बॉयफ्रेंडला जिवंत जाळले:ब्रेकअपनंतर भेटायला आला होता, गर्लफ्रेंड आणि तिचा चुलत भाऊही भाजले, दोघांना...

0
अमृतसरमध्ये गर्लफ्रेंडने चुलत भावासोबत मिळून बॉयफ्रेंडला जिवंत जाळले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आग लागल्यावर संतापलेल्या बॉयफ्रेंडने दोघांनाही आपल्याकडे ओढले. त्यामुळे गर्लफ्रेंड आणि तिचा...

पुणे शहरात विविध अपघातांत 3 जणांचा मृत्यू:कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी, लोणीकंद परिसरात घटना

0
पुणे शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी आणि पुणे-अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात या अपघाताच्या घटना घडल्या...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपले विचार सकारात्मक, वाणी मधुर आणि संयमित असावी, सर्व लोकांशी...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; आपले विचार सकारात्मक असले पाहिजेत, आपले बोलणे दयाळू आणि आदरयुक्त असले पाहिजे...

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...
spot_img

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...
error: Content is protected !!