नुशरत भारुचा व्हायरल व्हिडिओ: बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सगळ्यात आधी तिचं चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे तिनं दुसऱ्या कोणाकडे तिचे बूटं काढले आणि दुसरं कारण म्हणजे इंटरनॅशनल योगा डे प्रोग्राममध्ये तिच्या बाजूला गर्दी दिसली होती. त्यावेळी ज्या प्रकारे तिनं प्रतिक्रिया दिली त्यावरून तिला नेटकरी ट्रोल करत आहेत.
नुसरतनं दुसऱ्याकडून काढून घेतले शूज
नुसरत भरुचानं शनिवारी मुंबईत इंटरनॅशननल योगा दिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या एका प्रोगाममध्ये भाग घेतला. या दरम्यान, चाहत्यांनी तिच्या आजुबाजूला गर्दी केली कारण प्रत्येकाला तिच्यासोबत सेल्फी काढायचा होता. व्हिडीओमध्ये नुसरत ही ओरडून विचारताना दिसली की ‘माझे लोक कुठे आहेत?’ कारण ती या सगळ्या गर्दीत तिच्या टीमला शोधू शकत नव्हती. त्याशिवाय तिला या गर्दीत अनकम्फर्टेबल होऊ लागलं होतं.
दुसऱ्याकडून शूज काढल्यानं नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
नुसरतचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ती प्रोग्राममध्ये असलेल्या वॉलेन्टियर्सकडून बूट काढताना दिसला. त्यावरून तिला अनेकांनी अनेक गोष्टी सुनावल्या आहेत. तर या कार्यक्रमात नुसरत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या योगा करताना दिसल्या.
योगा करायला आली आणि गर्दीत अडकली
या व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. एकानं कमेंट केली की ‘ती योगा करायला आली आहे, पण ती वाकू शकत नाही आणि स्वत: चे बूट काढू शकत नाही. म्हणजे काय म्हणायचं.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘दुसऱ्या कोणत्या व्यक्तीनं तिचे बूट का काढावे. ती स्वत: असं करू शकत नाही का, तर ती इतकी फिट का आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘स्वत: हात लावला नाही.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘पैसा आणि लोकप्रियता दोन्ही गोष्टी मिळाल्यामुळे तिला काही कळत नाहीये. मॅडमला योगा करायचा आहे पण बूट काढायला माणसं लागतात.’
हेेही वाचा : भारतसोडून परदेशात का स्थायिक झाला विवेक ओबेरॉय? दुबईला गेल्यानंतर नेटवर्थमध्ये प्रचंड वाढ
नुसरतच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती सगळ्यात आधी ‘छोरी 2’ मध्ये दिसली. तिचा हा चित्रपट ‘छोरी 2’ प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला होता. नुसरत भरूचाशिवाय सोहा अली खान आणि गश्मीर महाजनी देखील यात दिसले होते.





























