Homeमहाराष्ट्रHingoli Storm Damages 1577 Hectares of Crops | हिंगोली जिल्ह्यातील वादळी वाऱ्यामुळे...

Hingoli Storm Damages 1577 Hectares of Crops | हिंगोली जिल्ह्यातील वादळी वाऱ्यामुळे 1577 हेक्टरचे नुकसान: मदतीसाठी लागणार 5.77 कोटी रुपये, शासनाकडे अहवाल सादर – Hingoli News

हिंगोली जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तब्बल 1577 हेक्टर क्षेत्राच्या केळी व पपई पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले असून या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 5.77 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्या

?

हिंगोली जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी तालु्क्यात केळीचे पिक घेतले जाते. यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून केळीचे पिक काढणीसाठी आले असतांनाच ता. 9 जून रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागाच उध्वस्त झाल्या आहेत.

यामध्ये प्रामुख्याने कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बुद्रूक, डोंगरकडा, सालापूर, रेडगाव, वडगाव, जवळापांचाळ, भाटेगाव यासह परिसरातील गावांचा समावेश आहे. तर वसमत तालुक्यातील कुरूंदा, गिरगाव यासह परिसरातील गावांचा समावेश आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार जीवककुमार कांबळे, शारदा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने पंचनामे सुरु केले होते. यामध्ये कळमनुरी तालुक्यात 1049 हेक्टर वरील फळबागांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले असून वसमत तालुक्यात 528 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 5.77 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत नुकसानीची माहिती शासनाकडे सादर केली आहे. आता नुकसानीच्या मदतीसाठी निधी कधी उपलब्ध होणार याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

15 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना मुलाखतीत यश मिळेल, मकर राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळण्याची...

0
बुधवार, 15 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांना थांबलेले पेमेंट मिळू शकते. मिथुन राशीच्या...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण:9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी

0
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18...
spot_img

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
error: Content is protected !!