Homeमहाराष्ट्रBhaskar Jadhav Reaction On Narayan Rane intrested to Join Shivsena Again Marathi...

Bhaskar Jadhav Reaction On Narayan Rane intrested to Join Shivsena Again Marathi News | नारायण राणेंनी शिवसेनेत जाण्याचा अनेकदा प्रयत्न केला, भास्कर जाधवांचा मोठा गौप्यस्फोट


नारायण राणे वर भ्स्कर जाधव: नारायण राणे 2014 साली शिवसेनेत येणार होते, असे विधान भरत गोगावले यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत म्हटले होते. याला आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी दुजोरा दिला आहे. नारायण राणे शिवसेनेत पुन्हा येण्यास इच्छुक होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना घ्यावं अशाप्रकारचे त्यांचे प्रस्ताव होते. पण यातील खरं खोट मला माहिती नाही, त्याचा माझ्याकडे पुरावा नाही. पण मी ऐकलं होतं राणे इच्छुक होते, असे भास्कर जाधव यांनी टू द पॉइंट मुलाखतीत सांगितले. ते काँग्रेसमध्ये गेले पण त्यांचं काँग्रेसमध्ये जमत नव्हतं. त्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. पण त्यांच्या पक्षात मुलगापण गेला नाही. तो पक्ष एका वर्षाच्या आत बंद झाला. यानंतर मला भाजपमध्ये घ्या असं म्हणत होते, राणेंना आम्ही घेऊ पण त्यांच्या 2 मुलांचं काय करायचं. त्यांना पक्षात घ्यायचं की नाही ते ठरवा पण त्यांना घेऊन तुमचा पक्ष चालणार नाही, असे मी त्यांना सांगितले.

शिवसेना का सोडली होती?

बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना का सोडली? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. माझ वय 68 वर्षे आहे. मी आक्रमक आहे. ओरिजनल शिवसेनेचा गुणधर्म माझ्यात दिसतो. तोच आक्रमकपण, प्रमुखावर कोणी बोललं तर तुटून पडणे. आजही मी तितकाच आक्रमक आहे. आज मी असा आहे तर त्या काळात मी कसा असेन? कोकणात सर्वात जास्त शिवसेनेसाठी केसेस घेतलेला मी होतो. माझी वैयक्तिक केस नव्हत्या. सर्व शिवेसेनेसाठी घेतल्या होत्या. त्यामुळे डोळ्यात पाणी येणं स्वाभाविक असल्याचे भास्कर जाधव म्हणाले.

‘उद्धव ठाकरे भेटत नाहीत, म्हणून तुम्ही नाराज होतात?’ या प्रश्नाला उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, तो इतिहास झाला. त्याची खपली काढण्यात अर्थ नाही. 16 सप्टेंबर 2004 रोजी मला बाळासाहेबांनी उमेदवारी दिली पण माझी उमेदवारी काढली. कोणाला उमेदवारी द्यावी, हा निर्णय पक्षनेतृत्वाने घ्यायचा असतो. पण एवढी वर्षे काम केल्यानंतर बोलून निर्णय घ्यायला हवं होतं, असं मला वाटल्याचे भास्कर जाधव म्हणाले.

माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक

राज्यात महाविकास आघाडीचे 2019 मध्ये सरकार आल्यावर भास्कर जाधव यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. पवारांची साथ सोडल्यामुळे पवारांनी भास्कर जाधव यांना मंत्रीपद मिळू दिले नाही का? आजवरचा इतिहास आहे की पवारांना जे सोडून गेले त्यांना भविष्यात कोणतंही पद मिळालं नाही.  या प्रश्नावर उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, शरद पवार हा मोठ्या मनाचा माणूस आहे. त्यांनी माझ्या मंत्रीपदाला विरोध केला असेल असे  मला वाटत नाही.  पण त्यांनी जर केले असेल तर ते बरोबर केलं आहे. पवार साहेबांना सोडून शिवसेनेत दाखल होणे ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती अशी कबुली जाधव यांनी दिली. पवारांनी माझ्या मंत्रीपदाला जर विरोध केला असेल तर त्यामागचे कारण सांगताना जाधव म्हणाले, मी शिवसेनेत होतो, त्यावेळी उमेदवारी मिळण्याची लायकी नसताना ज्या माणसाने मला राष्ट्रवादीत घेतलं. राज्याचं सरचिटणीस केलं. विधान परिषद मला दिली, निवडून आणलं. विधानसभा दिली, निवडून आणलं. मला मंत्रीमंडळात घेतलं. मला पक्षाचा अध्यक्ष केला. त्या व्यक्तीने मी पक्ष सोडल्यावर माझ्या मंत्रीपदाला विरोध केला असेल. तर ते बरोबरच केलं. शेवटी मला माझं प्राक्तन भोगलं पाहिजे. माझ्याकडून चूकच झाली होती. पवारांना सोडून जाणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, अशी कबुली भास्कर जाधव यांनी या कार्यक्रमात दिली.

भास्कर जाधव पुढे म्हणाले,  हे मी आज शिवसेनेत असताना बोलतो आहे. कदाचित या बोलण्याचे मला परिणाम भोगावे लागतील, हेही मला माहिती आहे. चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे सांगण्याचं नैतिक धाडस माझ्यामध्ये आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो पवार साहेबांना नक्की हे केलं नसेल. कारण त्यांचं माझ्यावर आजही प्रेम आहे, असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

15 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना मुलाखतीत यश मिळेल, मकर राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळण्याची...

0
बुधवार, 15 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांना थांबलेले पेमेंट मिळू शकते. मिथुन राशीच्या...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण:9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी

0
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18...
spot_img

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
error: Content is protected !!