देश : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळणं मिळालं आहे. SIT ला दररोज नवनवे पुरावे सापडत आहेत. यामध्ये सोनम रघुवंशी संशयीत तरुण संजय वर्मासोबत तासन् तास गप्पा मारत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जेव्हा संजयय वर्मा यांना फोन करतो तेव्हा त्यांचा नंबर बंद असतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पण सोनमने १ मार्च ते २५ मार्च दरम्यान संजय वर्माला तब्बळ ११९ वेळा फोन केले. संजय आणि सोनम यांनी एका महिन्यात २३४ वेळा एकमेकांना फोन केले आहेत. आता संजय वर्मा कोण आहे? राजा रघुवंशी प्रकरणात त्याची काय भूमिका असू शकते? २३ मे रोजी शिलाँगमध्ये राजा रघुवंशीची हत्या झाली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सोनमसह ५ जणांना अटक केली आहे.
शिलाँग पोलीस राजा रघुवंशी हत्या प्रकरण गांभीर्याने घेत आहेत आणि एका धागा दुसऱ्या धाग्याशी जोडून गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात, मंगळवारी पोलिसांचे एक पथक इंदूर येथील राजा रघुवंशीच्या घरी पोहोचले. पोलिस अधिकाऱ्यांनी राजाच्या कुटुंबाशी बोलून सोनमच्या वागण्याबद्दल आणि लग्नानंतर इंदूरमध्ये घालवलेल्या दिवसांबद्दल विचारपूस केली. पोलिस पथकातील तीन अधिकाऱ्यांनी राजा रघुवंशी यांचा भाऊ विपिन रघुवंशी आणि त्यांच्या आईचीही चौकशी केली. चौकशीनंतर विपिनने सांगितले की, तीन अधिकारी आमच्या घरी आले होते. लग्नानंतर चार दिवस सोनम आमच्या घरी राहिली तेव्हा तिचे वर्तन कसे होते आणि घरातील सदस्यांशी ती कशी संवाद साधते याबद्दल त्यांनी आमच्याकडून फक्त माहिती घेतली.
विपिन म्हणाले की, मी अधिकाऱ्यांना सांगितले की, मी सोनमचा दिर आहे. मी कधीही तिच्याशी थेट बोललेलो नाही एवढंच नव्हे तर तिच्याकडे गेलो नाही. मी त्यांना सांगितले की, आम्ही सोनमला फारसे पाहिलेही नाही, त्यामुळे ती कशी वागली याबद्दल आम्ही जास्त काही सांगू शकत नाही. यादरम्यान, पोलिसांनी राजा रघुवंशीच्या आईचीही चौकशी केली आणि सोनमच्या उपस्थितीत घरात काही असामान्य हालचाल किंवा तणाव दिसून आला का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
२ जून रोजी, मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा येथील रियात अरलियांग येथील वेई सावडोंग पार्किंग लॉटच्या खाली असलेल्या खोल खड्ड्यातून सोनमचा पती राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. तिच्या पतीचा मृतदेह सापडल्यानंतर काही दिवसांनी, सोनमने ७ जून रोजी उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये पोलिसांना शरण गेली आणि तिला पटना, नंतर कोलकाता आणि नंतर गुवाहाटी येथे नेण्यात आले. गुवाहाटी विमानतळावरून, तिला शिलाँगमधील सदर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. उर्वरित चार आरोपींना शिलाँगला आणण्यात आले. ११ जून रोजी सर्व आरोपींना शिलाँग जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
न्यायालयात हजर होण्यापूर्वी सोनमने तिचा पती राजा रघुवंशी यांच्या मृत्यूतील तिची भूमिका मान्य केली होती. मेघालय पोलिसांनी तिचा प्रियकर राज कुशवाहासोबत तिची भेट घेऊन तिची चौकशी केली तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला.






























