एसआयपी कॅल्क्युलेटर: सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करणे हा नेहमीच सर्वात सुरक्षित आणि सर्वाधिक परतावा देणारा पर्याय मानला जातो. लोक त्यांच्या गुंतवणूक क्षमतेनुसार त्यात गुंतवणूक करतात. तुम्हालाही फक्त 21 वर्षात श्रीमंत व्हायचे असेल तर SIP चा 10X21X12 फॉर्म्युला फॉलो करा. या फॉर्म्युल्याद्वारे गुंतवणुकीच्या रकमेवर 12 टक्क्यांपर्यंत जरी परतावा मिळाला तरी तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. असे असताना शेअर बाजारातील चढउतारांमुळे या फॉर्म्युलावर परिणाम होऊ शकतो, हेदेखील लक्षात असू द्या.
10X21X12 फॉर्म्युला
21 वर्षात करोडपती होण्याचे तुमचे स्वप्न एसआयपीद्वारे प्रत्यक्षात येऊ शकते. SIP चा 10X21X12 फॉर्म्युला फॉलो करून तुम्ही एक मोठा फंड तयार करू शकता. खरं तर चक्रवाढीच्या जादूने तुमच्या गुंतवणुकीची रक्कम त्यात वेगाने वाढेल. म्हणून या उत्तम गुंतवणूक योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
म्युच्युअल फंड एसआयपी
जर तुम्ही दरमहा 10 हजारची एसआयपी केलात तर तुम्हाला त्या गुंतवणुकीवर सरासरी 12% परतावा मिळू शकतो. खरं तर, गुंतवणूकदारांना एसआयपीमध्ये सहज 12 ते 15 टक्के परतावा मिळतो. म्हणून जर तुम्ही आता 30 वर्षांचे असाल तर 10X21X12 फॉर्म्युला वापरून तुम्ही 51 वर्षांच्या वयात करोडपती होऊ शकता. म्हणजेच 10 हजारची गुंतवणूक तुम्हाला निवृत्तीनंतर श्रीमंत बनवू शकते.
21 वर्षांची गुंतवणूक तुम्हाला बनवेल श्रीमंत
जर एखादा गुंतवणूकदार एसआयपीद्वारे दरमहा 10 हजारची गुंतवणूक करत असेल तर ते फक्त 21 वर्षे ते चालू ठेवा. याने तुम्हाला चक्रवाढीचा प्रचंड फायदा मिळवू शकतो. कारण या गुंतवणुकीवर सरासरी 12% वार्षिक परतावा मिळतो असू धरुन चालू. अशा परिस्थितीत तुमची छोटी मासिक गुंतवणूक कोटींमध्ये बदलू शकते. दीर्घकाळ शिस्तबद्ध गुंतवणूक करून आर्थिक स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण करता येते. म्हणजेच जर तुमचा पगार 50 हजाराच्या आसपास असेल. तर तुम्ही 10 हजारची एसआयपी करून निवृत्तीपूर्वी करोडपती बनू शकता.
कसे असते कॅल्क्यूलेशन?
तर जर तुम्ही दरमहा 10 हजारचा एसआयपी केली तर ही छोटीशी सवय दीर्घकाळात एक मोठा निधी निर्माण करू शकते. 12% वार्षिक परताव्याचा अंदाज पाहिला तर 21 वर्षांमध्ये गुंतवणूक 2520000 होईल. ज्यावर परतावा सुमारे ₹7910067 तर तुम्ही 21 वर्षे SIP चालू ठेवल्यास गुंतवणूक सुमारे 10430067 कोटींपर्यंत पोहोचू शकते. ही चक्रवाढीची शक्ती आहे.
चक्रवाढीची जादू
म्युच्युअल फंड शेअर बाजाराशी जोडलेले असतात. त्यामुळे त्यात चढ-उतार होणे स्वाभाविक आहे. पण जर तुम्ही दीर्घकाळ संयमाने SIP केली तर कालांतराने एक मोठा निधी निर्माण होऊ शकतो. असे असले तरी बाजारातील घसरणीला घाबरण्याचे कारण मानू नका. तर ती गुंतवणूक करण्याची संधी समजा. नियमित गुंतवणूक आणि चक्रवाढीची जादू तुम्हाला सहजपणे करोडपती बनवू शकते.





























