हार्डोई पेट्रोल पंप व्हायरल व्हिडिओ : सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. सोशल मीडियावर पापा की परी म्हणून तरुणींचे असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. इथे एका तरुणीने तिच्या वडिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यावर रिव्हॉल्व्हर रोखल्याच पाहिला मिळतेय. बिलग्राम शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर हरदोईमधील सांडी रोडवर असलेल्या एचपी सीएनजी पेट्रोल पंपावरील हा धक्कादायक व्हिडीओ आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पेट्रोल पंप कर्मचारीचा एक व्यक्तीशी वाद होतो आहे. नेमका वाद कशावरून झाला हे समजलेलं नाही. पण मिळालेल्या माहितनुसार शहाबादमधील रहिवासी एहसान खान त्यांची पत्नी आणि मुलगी अरीबा खान यांच्यासह रविवारी त्यांच्या गाडीत इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आली होती. सीएनजी भरत असताना, एहसान खान आणि पंप कर्मचाऱ्या रजनीश कुमार यांच्यात काही कारणावरून वाद झाला. हा वाद एवढा वाढला की, कर्मचाऱ्याने एहसानच्या छातीवर धक्का दिल्याचा आरोप आहे, जो कॅमेऱ्यात कैद झाला. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वडिलांचा अपमान झालेला लेकीला सहन झाला नाही. तिने या वादात उडी मारली आणि तिच्या वडिलांना धक्का दिल्यानंतर, त्यांची संतप्त मुलगी कारकडे धावते, रिव्हॉल्व्हर काढते आणि थेट कर्मचाऱ्याच्या छातीवर रोखते.
दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी ताबडतोब हस्तक्षेप केला आणि गोळीबार होण्यापूर्वीच परिस्थिती आटोक्यात आणली. प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, मुलीने कर्मचाऱ्याला धमकी देत म्हटलं आहे की, “मी इतक्या गोळ्या झाडेन की तुमच्या कुटुंबातील सदस्यही तुम्हाला ओळखण्यास नकार देतील.”
“मी इतके शूट करेन की घरगुतीसुद्धा ओळखण्यास नकार देतील”
सीएनजी हार्डीई जिल्ह्यातील कारमध्ये भरणार होता. विक्रेत्यांना कार चालकांना खाली उतरण्यास सांगितले. यावर एक वाद होता. या महिलेने सेल्समनच्या छातीवर एक रिव्हॉल्व्हर दाखविला.
एरिबे खान, हुनाबानो, एहसन खान, रिव्हॉल्व्हरने जप्त केले. pic.twitter.com/kulajg48 सेमी
– सचिन गुप्ता (@सॅचिंगुपपेअप) 16 जून, 2025
या घटनेनंतर पेट्रोल पंप कर्मचारी रजनीश कुमार यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली. एहसान खान, त्यांची पत्नी हुस्नबानो आणि मुलगी अरीबा खान यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, या आरोपांमध्ये शस्त्रास्त्र कायद्याचे कलम आणि गुन्हेगारी धमकीचा समावेश आहे. बिलग्राम पोलीस स्टेशनचे प्रभारी राकेश कुमार यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेत वापरलेले रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आल्याची सांगितलंय. तसंच अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.






























