रोल्स रॉयस व्हायरल व्हिडिओ: सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओ हे मनोरंजन, सामाजिक संदेश किंवा इतर कोणत्याही प्रकारचे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक देखील आश्चर्यचकित झाले आहेत.
खरंतर, सोशल मीडियावर रोल्स-रॉयस कारचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक शेतकरी हा त्याच्या कोट्यवधीच्या कारद्वारे चक्क शेत रोटरताना दिसत आहे. जे पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यामध्ये या शेतकऱ्यांने जगातील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक असणारी कार शेतीसाठी का वापरली असेल. काय आहे या मागील कारण?
व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
या व्हिडीओमध्ये एक शेतकरी चक्क रोल्स-रॉयस कारने शेती करताना दिसत आहे. शेतकऱ्यांने रोल्स-रॉयस कारच्या मागे रोटावेटर जोडला आहे. ज्याद्वारे तो त्याचे शेत रोटरताना दिसत आहे. हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे. जगातील सर्वात सुंदर आणि महाग कारद्वारे हा व्यक्ती शेती कशी रोटरत असेल असं लोकांना वाटत आहे. या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.
खरंतर, व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला जे वाटत आहे त्यासारखे काहीही नाही. हा व्हिडीओ एडनिराजच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटवर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ आहेत. हा व्हिडीओ पूर्णपणे AIच्या मदतीने बनवण्यात आला आहे.
भारतात रोल्स-रॉयलची किंमत किती?
जगातील सर्वात महागडी आणि सुंदर कार म्हणून रोल्स-रॉयलला ओळखले जाते. मात्र, व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे या कारमध्ये अशी कोणतेही वैशिष्ट्य नाहीत. ज्याद्वारे शेती करता येईल किंवा रोटावेटर जोडता येईल. रोल्स-रॉयल कार ही फार कमी प्रमाणात ऑफ-रोडवर चालते. त्यामुळे ही कार मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये दिसते. खडबडीत आणि कठीण शेतीच्या कामांसाठी वापरली जात नाही. या कारची किंमत ही कोट्यावधींमध्ये आहे. भारतात या कारी किंमत सुमारे 6 कोटी 95 लाख रुपयांपासून सुरु होते.






























