Homeदेश-विदेशराजस्थान टोन्क मधील बॅनस नदीत बुडलेल्या पिकनिकला शोकांतिकेचे आठ

राजस्थान टोन्क मधील बॅनस नदीत बुडलेल्या पिकनिकला शोकांतिकेचे आठ


Rajasthan Banas River Tragedy: राजस्थानमध्ये 11 मित्र नदीत बुडाल्याची घटना घडली आहे. यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला असून तिघांचा शोध सुरु आहे. राजस्थानच्या जयपूरहून टोंकमध्ये पिकनिकसाठी  गेलेल्या 11 तरुणांचा नदीत पोहण्याचा मोह जीवाशी बेतला. बनास नदीत अंघोळीसाठी उतरलेले हे 11 जण वाहून गेले. यापैकी आठ जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या वृत्ताला स्थानिक पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. वाहून गेलेल्या तिघांचा शोध सुरु असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

नेमकं घडलं काय?

बनास नदीमध्ये हे 11 मित्र अंघोळीसाठी नदीत उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण बुडाले. मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना आहे. बनास नदीच्या एका जुन्या पुलापाशी हे तरुण पिकनिकसाठी गेले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वजण एकत्रच पाण्यात उतरले होते. परंतु, काही वेळातच पाण्याचा वेग वाढला आणि सर्वजण एकामागोमाग एक पाण्यात खेचले गेले.

स्थानिकांनी दिली माहिती, मदत पोहोचली पण…

डोळ्यासमोर हे तरुण वाहून जात असताना स्थानिकांनी आरडाओरडा करत पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. टोंक पोलीस आणि राज्य आपत्कालीन दलाची एक टीम तिथे मदतीसाठी पोहोचली. मात्र ही मदत येईपर्यंत फार उशीर झाला होता. या तरुणांना शोधण्यासाठी शोध मोहिम सुरु करण्यात आली. त्यावेळी आठ तरुणांचे मृतदेह सापडले. अजून तीन जणांचा शोध सुरु आहे.

यापूर्वीही इथं अनेकजण बुडालेत

सर्व मृतदेह सआदत हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्या कुटुंबियांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. डॉक्टरांनी या सर्व आठही जणांना मृत घोषित केले आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात ते तरुण उत्तरते होते तो खोलगट आहे. त्यामुळे यापूर्वीही अनेकजण तिथे बुडालेले आहेत. या दुर्घटनेची माहिती समजताच सआदत हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने मृतांच्या नातेवाईकांनी गर्दी केली. मृतांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

मृतांची नावं

सर्व मयत व्यक्ती जयपूरमधील रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये नौशाद (वय 35, रा. हसनपुरा), कासीम (रा. हसनपुरा), फरहान (रा. हसनपुरा), रिजवान (26, रा. घाटगेट), नवाब खान (28, रा. पानीपेच कच्ची बस्ती), बल्लू (रा. घाटगेट), साजिद (20, रा. घाटगेट), साजिद (20) यांचा मृत्यू झाला, तर बेपत्ता व्यक्तींमध्ये शाहरुख (30, रा. घाटगेट), सलमान (26, रा. घाटगेट), समौर (32, रा. घाटगेट) यांचा समावेश आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पहलगाम हल्ला- ड्रोनने पोहोचवली होती शस्त्रे:NIA च्या आरोपपत्रात खुलासा, गुप्तचर यंत्रणेच्या कमकुवतपणावर प्रश्नचिन्ह

0
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन मैदानात गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) आरोपपत्राने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. तपासानुसार, सीमेपलीकडून...

स्वामी अवधेशानंद गिरीजींचे जीवनसूत्र:जीवनात यश हवे असल्यास आपल्या क्षमता ओळखा, चांगले विचार स्वीकारा, सत्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; तुमच्या क्षमता ओळखा, चांगले विचार आत्मसात करा, सत्याच्या पाठीशी उभे राहा आणि...

शुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट...

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटशुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट बातम्या, बीसीसीआय, भारतीय क्रिकेट संघक्रीडा डेस्क7 तासांपूर्वीलिंक कॉपी...

फादर्स डे:वडिलांना हे प्रश्न विचारा… त्यांच्या मनातील भावना सांगतील उत्तरे

0
लहानपणी आपल्याकडे वडिलांना विचारण्यासाठी अनेक प्रश्न असतात... पण जसजसे आपण मोठे होतो, तसतसा संवाद कमी होऊ लागतो. तज्ञांचे मत आहे की, मोठे झाल्यावरही...
spot_img

शुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट...

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटशुभमन गिल, भारत एकदिवसीय संघ, इंग्लंड दौरा, श्रेयस अय्यर, विराट कोहली, रोहित शर्मा, क्रिकेट बातम्या, बीसीसीआय, भारतीय क्रिकेट संघक्रीडा डेस्क7 तासांपूर्वीलिंक कॉपी...

फादर्स डे:वडिलांना हे प्रश्न विचारा… त्यांच्या मनातील भावना सांगतील उत्तरे

0
लहानपणी आपल्याकडे वडिलांना विचारण्यासाठी अनेक प्रश्न असतात... पण जसजसे आपण मोठे होतो, तसतसा संवाद कमी होऊ लागतो. तज्ञांचे मत आहे की, मोठे झाल्यावरही...

पापाराझींना अक्षय कुमारचे विटी प्रत्युत्तर; जंगल प्रकाशन तारखेवर आपले स्वागत आहे

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत दिसले. खरं तर, दिल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा...

रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली C6 ची डिलिव्हरी बंगळुरूमध्ये सुरू:पूर्ण चार्जमध्ये 154 किमी धावेल, 3.7...

0
भारतीय टू-व्हीलर उत्पादक रॉयल एनफील्डने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक 'फ्लाइंग फ्ली C6' ची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने बंगळुरूमधून याची सुरुवात केली. रॉयल...
error: Content is protected !!