Homeदेश-विदेशA helicopter flies every 2.5 minutes in Kedar Khera, 304 in 12...

A helicopter flies every 2.5 minutes in Kedar Khera, 304 in 12 hours!, air traffic load increases in highly sensitive area | भास्कर ग्राउंड रिपोर्ट: केदार खाेऱ्यात दर अडीच मिनिटांनी एका हेलिकॉप्टरचे उड्डाण, 12 तासांत 304!, उच्च संवेदनशील क्षेत्रात एअर ट्रॅफिक लोड वाढला


  • मराठी बातम्या
  • राष्ट्रीय
  • केदार खेरा येथे दर 2.5 मिनिटांत हेलिकॉप्टर उडते, 12 तासात 304!, अत्यंत संवेदनशील क्षेत्रात हवाई रहदारीचे भार वाढते

डेहराडून (उत्तराखंड)39 मिनिटांपूर्वी

  • कॉपी दुवा

केदारनाथ धाम हे एक अतिशय दुर्गम आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे. ११ हजार फूट उंचीवरील खोल व्ही-आकाराच्या अरुंद दरीतून हेलिकॉप्टर जातात. १२ वर्षांत या मार्गावर १० हेलिकॉप्टर अपघात झाले आहेत. यात ३० जणांचा जीव गेला. तरीही, यावेळी हवाई वाहतुकीचा भार इतका जास्त आहे की दर अडीच मिनिटांनी गुप्तकाशी, फाटा आणि शेरसी येथून एक हेलिकॉप्टर उड्डाण घेत आहे. केदार हेलिकॉप्टर सेवा नोडल कार्यालयानुसार, २ मे ते ६ जून या कालावधीत ४९१७५ भाविक हेलिकॉप्टर सेवेने गेले. ये-जा करताना ९ हेलिकॉप्टरच्या ८५३४ शटल ट्रिप (दररोज सरासरी २३७ उड्डाणे) झाल्या. केवळ ६ जूनबद्दल बोलायचे झाले तर ९ हेलिकॉप्टरने सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ३०४ उड्डाणे केली, हा विक्रम आहे. ५ जून रोजी २८७ उड्डाणे झाली.

एका महिन्यातली चौथी घटना

चारधाम यात्रेत हेलिकॉप्टर अपघाताची ही चौथी घटना आहे. पहिली घटना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गंगाणी येथे घडली, ज्यामध्ये ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. दुसरी घटना १२ मे रोजी बद्रीनाथ येथे घडली. तिसरी घटना १७ मे रोजी केदारनाथ येथील एम्स ऋषिकेशच्या हेलिकॉप्टरमध्ये घडली.

आधी ४ कंपन्या हेली सेवा देत होत्या, आता ९

प्रवास सुकर व सुरक्षित करण्यासाठी २००४ मध्ये अगस्त्यमुनीहून हेली सेवा सुरू करण्यात आली. २०१२ पर्यंत ४ कंपन्या ही सेवा देत होत्या, ज्या आता ९ पर्यंत वाढल्या. इतक्या वाहतुकीच्या भारानंतरही उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाने केदार परिसरात हवाई वाहतूक नियंत्रण टॉवरसाठी पुढाकार घेतला नाही. वाऱ्याची दिशा व दाब सांगणारी कोणतीही यंत्रणाही बसवली नाही. ज्यांच्या दुकानावर हेलिकॉप्टरचे पंखे आदळले ते दिनेश गजवन म्हणाले, जर हेलिकॉप्टर ५० मीटर पुढे पडले असते, तर कदाचित कोणीही वाचले नसते, कारण पुढे १०० मीटर खोल दरी आहे. माझ्या दुकानाचे छत उडून गेले.

उत्तराखंड : हेलिकॉप्टरची रस्त्यावर इमर्जन्सी लँडिंग

रुद्रप्रयाग। उत्तराखंडमधील केदारघाटीत वैमानिकाच्या सतर्कतेमुळे शनिवारी एक मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला. दुपारी १:०२ वा. क्रिस्टल कंपनीच्या हेलिकॉप्टरने बदासू हेलिपॅडवरून ५ भाविकांसह उड्डाण केले. परंतु ते दोन मीटर वर येताच त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. परिस्थिती लक्षात येताच ५५ वर्षीय वैमानिक रवींद्रसिंह सोधी यांनी रुद्रप्रयाग-गौरीकुंड महामार्गावरच हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग केले. त्या वेळी रस्त्यावर एक कार उभी होती. हेलिकॉप्टरची शेपटी कारला लागली तर पंख्यांमुळे रस्त्याच्या कडेच्या दुकानाचे छत उडाले. या अपघातात वैमानिकाच्या पाठीला दुखापत झाली, तर पाचही भाविक सुरक्षित आहेत. रवींद्र १० वर्षांपासून हेलिकॉप्टर उडवत आहेत. शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांनी १४ शटल केले होते.

आम्ही मेरठचे आहोत. मी, माझी ११ वर्षांची मुलगी नव्या, माझा १५ वर्षांचा मुलगा व माझी ७१ वर्षांची सासू अनिता गर्ग हेलिकॉप्टरमध्ये होतो. सोबत आणखी एक प्रवासीही होता. माझे पती पुढच्या शटलने येणार होते. हेलिकॉप्टरने उड्डाण करताच लाल दिवा पेटला. पायलट शांत होता, पण घाम फुटला होता. हेलिकॉप्टर डगमगू लागले. मागचा भाग हेलिपॅडच्या कडेला आदळला व नंतर हेलिकॉप्टर रस्त्यावर पडले. जणू काही डोंगर कोसळला, असे वाटले. आम्ही घाबरलो. मुले ओरडू लागली. कोणीतरी गेट उघडून आम्हाला खाली उतरवले. आम्ही दर्शन न घेता मेरठला परतलो. ते एका मिनिटाचे दृश्य आम्ही कधीही विसरणार नाही. -मोनिका, हेलिकॉप्टरमधील प्रवासी



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!