Homeमनोरंजनयूके बाई इलेक्ट्रिक टूथब्रशच्या मदतीने पतीची फसवणूक करताना पकडते की तिला त्याचे...

यूके बाई इलेक्ट्रिक टूथब्रशच्या मदतीने पतीची फसवणूक करताना पकडते की तिला त्याचे अतिरिक्त वैवाहिक संबंध कसे सापडले हे माहित आहे


पत्नीने पतीची फसवणूक पकडली: युनायटेड किंग्डममधील एका महिलेने नवऱ्याच्या स्मार्ट इलेक्ट्रीक ब्रशच्या सहाय्याने नवऱ्याचं विवाहबाह्य संबंध असल्याचं पुराव्यासकट समोर आणलं आहे. या इलेक्ट्रीक ब्रशच्या टेडाच्या माध्यमातून तिने नवऱ्याचा भांडाफोड केला आहे. दातांसंदर्भातील स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून एका पत्नीने कशाप्रकारे स्मार्ट ब्रशमधील डेटा वापरुन नवऱ्याला रंगेहाथ पकडलं याबद्दल खासगी गुप्तहेर पॉल जॉन्सने संपूर्ण किस्सा सांगितला आहे.

नेमकं घडलं काय?

या विवाहित महिलेला दोन मुलं आहेत. मुलं नियमितपणे दात घासतात की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी ही महिला अॅप्लिकेशनच्या माध्यमातून लक्ष ठेवायची. यासाठी तिने स्मार्ट टूथब्रश आणले होते. मात्र एकदा हा डेटा तपासताना तिला मुलांचे टूथब्रश मुलं शाळेत असतानाही वापरले जात असल्याची माहिती मिळाली. ज्यावेळेस नवरा आणि मुलं घरात नसतात तेव्हा ब्रश वापरला जात असल्याचं डेटा दाखवत होता. हा डेटा पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला.

“सुरुवातीला तिला याबद्दल फारसं काही वाटलं नाही. मात्र नंतर वारंवार एका ठराविक अचूक वेळेला आणि लोकेशन बेस टेडा मिळू लागला. मात्र ब्रश करताना व्यक्ती इमोशनलेस असल्याचंही डेटामधून स्पष्ट झालं. म्हणजे दर शुक्रवारी सकाळी 9 वाजता ऑफिसला जात असेल आणि तिचा ब्रश 10 वाजून 48 मिनिटांनी वापरला जात असेल तर शंका येणं सहाजीक आहे,” असं जॉन्सनने म्हटलं.

आधी तिने शाळेत चौकशी केली

आता हा ब्रश नेमका कोण वापरतं हे तपासून पाहण्याआधी या महिलेने आधी मुलांच्या शाळेत चौकशी केली. शाळेमध्ये मुलांचा हजेरीपट तपासून पाहिला असता मुलं शाळेतच होती असं स्पष्ट झालं. त्यानंतर तिने तिचा मोर्चा नवऱ्याकडे वळवला. नवऱ्याने आपण कायम या वेळी ऑफिसलाच असतो असं सांगितलं. मात्र डिजीटल डेटा वेगळीच माहिती देत होता. या महिलेने गुप्तहेराच्या मदतीने तपास केला असता तिला असं दिसून आलं की तिला नवरा ऑफिसला जातोय असं सांगून त्याच्या प्रेयसीला त्यांच्याच घरात भेटायचा. दर शुक्रवारी तो प्रेयसीला घरी आणून तिच्यासोबत वेळ घालवायचा असं त्याने कबूल केल्याचं हा खासगी गुप्तहेर म्हणाला.

‘द मिरर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये जॉन्सनने, “शुक्रवारी एखादी व्यक्ती उशीरा ब्रश करतेय याबद्दल शंका वाटण्यासारखं काही नाही. मात्र वारंवार हाच डेटा येत असल्याने पत्नीला शंका आली. ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी ब्रशचा वापर होत असल्याचं दिसून आलं,” असं सांगितलं. हा नवरा मुलांचे ब्रश वापरलायचा असं तपासानंतर स्पष्ट झालं आणि त्यामधूनच त्याचं अफेर उघडं पडलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘प्रथमोपचार प्रशिक्षण’शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

0
आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे येथे वारकऱ्यांसाठी आयोजित‘प्रथमोपचार प्रशिक्षण’शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !       पुणे - जीवनात कोणत्याही वेळी अपघाती प्रसंग किंवा वैद्यकीय मदतीची गरज उद्भवू शकते.अशा वेळी रुग्णालयात जाण्यापूर्वी मिळणारे प्रथमोपचार हे केवळ उपचार नसून ते जीवदान ठरू शकतात.सध्या सुरू झालेल्या आषाढी वारीसारख्या प्रवासादरम्यान किरकोळ दुखापतींपासून ते गंभीर आजारासारखी कोणतीही स्थिती निर्माण झाल्यास अशा वेळी घाबरून न जाता धैर्याने परिस्थिती हाताळण्यासाठी आणि प्रत्यक्ष डॉक्टरांकडे नेण्यापूर्वी रुग्णाची स्थिती अधिक बिघडू नये,याकरिता प्रथमोपचाराचे मूलभूत ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे, याच उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आषाढी वारी निमित्त 10 जुलै रोजी नाना पेठेतील श्रीराम मंदिर येथे सकाळी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा, एरंडवणा या ठिकाणी सायंकाळी  वारकरी बंधूंसाठी मोफत प्रथमोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या दोन्ही शिबिराला 200 हून अधिक वारकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरातील सहभागी वारकऱ्यां ना प्रामुख्याने रुग्णाची श्वास पडताळणी कशी करावी आणि मनगट तसेच गळ्याची नाडी कशी तपासावी, खांदा निखळणे, बरगड्यांना अस्थिभंग होणे,तसेच हाताला दुखापत...

तेलंगणा- बलात्काराच्या आरोपीने पीडित आणि कुटुंबाची केली हत्या:आपल्या पत्नीला आणि मुलांनाही मारले; जामिनावर बाहेर...

0
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात शुक्रवार रात्री जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपीने 6 खून केले. आरोपी राजकुमारने आधी घरी त्याच्या 30 वर्षीय पत्नीची, 4 वर्षांच्या...

स्टार्टअप फ्रंटियर 1.0:स्टार्टअपद्वारे ज्ञानाचे उद्योगात रूपांतर करून विकसित भारत घडविण्याची गरज– राज्यपाल जिष्णू देव...

0
ज्ञानाचे नाविन्यपूर्ण उपाययोजनांमध्ये, आव्हानांचे संधींमध्ये आणि कल्पनांचे उद्योगांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता हीच आजच्या आर्थिक प्रगतीची खरी ताकद आहे. त्यामुळे विद्यापीठांनी केवळ पदवी प्रदान...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:जो व्यक्ती मोठ्यांचा आदर करतो, त्याला दीर्घायुष्य, विद्या, यश आणि...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; जी व्यक्ती आपल्या वडिलांचा आदर करते त्याला दीर्घायुष्य, ज्ञान, सन्मान आणि सामर्थ्य...
spot_img

जोकोविचचे 25 वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले:सिनरकडून उपांत्य फेरीत पराभव, मुचोवा-नोस्कोवा यांच्यात महिला...

0
39 वर्षीय दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचचे 25 वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत त्यांना स्वतःपेक्षा...

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...
error: Content is protected !!