Homeदेश-विदेशसौदी अरेबिया सरकारने मक्कामध्ये सुमारे 270,000 हज यात्रेकरूंची प्रवेश का मर्यादित केली

सौदी अरेबिया सरकारने मक्कामध्ये सुमारे 270,000 हज यात्रेकरूंची प्रवेश का मर्यादित केली


हज 2025: हज यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात यात्रेकरू मक्का या  ठिकाणी येत असतात. रविवारपर्यंत मक्का येथे आलेल्या यात्रेकरूंनची संख्या 14 लाखांवर गेली आहे. अजूनही काही यात्रेकरू येण्याची शक्यता आहे. मात्र, अशातच सौदी अरेबिया प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. ज्यामध्ये यावर्षी हज यात्रेपूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने सौदी अरेबियाने सुमारे 2.7 लाख यात्रेकरूंना मक्कामध्ये प्रवेश नाकारला आहे. परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे येणाऱ्या यात्रेकरूंना रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अपघात किंवा जीवितहानी होणार नाही.

त्यामुळे हज यात्रेकरूंच्या मक्का प्रवेशावर निर्बंध घालण्याच्या हालचालीला अनधिकृत प्रवेशावरील व्यापक कारवाईचा एक भाग म्हटलं जात आहे. असं वृत्तसंस्था एपीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

…तर 4 लाख रुपयांचा दंड आणि कठोर शिक्षा

गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये हज येथे उष्णतेमुळे झालेले मृत्यू लक्षात घेता यावेळी सौदी अरेबिया सरकारने हज यात्रेला मोठ्या प्रमाणात सुरक्षित ठेवण्यासाठी पाऊले उचलली आहे. सौदी सरकारने गेल्या वर्षी बेकायदेशीरपणे हजमध्ये सहभागी झालेल्या यात्रेकरुंमुळे अनेक जीव गेल्याचं म्हटलं आहे. अशातच यावर्षी परवानगीशिवाय हजमध्ये सहभागी होण्यासाठी 5 हजार डॉलर्स म्हणजेच 4 लाख रुपये दंड त्यासोबतच देशातून हद्दपार आणि इतर कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आळी आहे.

सौदी अरेबिया सरकारने घेतलेला हा निर्णय इतर देशातील नागरिकांप्रमाणे तेथील स्थानिकांनाही लागू असणार आहे. मक्का येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अल-ओमारी यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते पुढे म्हणाले की, हजला येणारे यात्रेकरू आमच्या देखरेखीखाली असणार आहेत. जो कोणी नियम मोडेल त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे.

23 हजार लोकांवर कारवाई

दरम्यान, सौदी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 23 हजारहून अधिक स्थानिक लोकांना हज नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा करण्यात आली आहे. तसेच 400 हज सेवा कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी यावेळी हज यात्रे दरम्यान ड्रोन देखील तैनात केले जाणार आहेत.

हज हा इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे आणि प्रत्येक सक्षम मुस्लिमाने आयुष्यात किमान एकदा तरी तो करणे अनिवार्य मानले जाते. अलिकडच्या काळात खराब हवामान आणि मोठ्या गर्दीमुळे हजला जाणे आव्हानात्मक बनले आहे. त्यामुळे यावर्षी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

लेडी इंजिनिअरचे वडील म्हणाले- मुलगी दारू पीत नव्हती:अंत्यसंस्कारानंतर मसूरीला पोहोचले, जावयावर हत्येचा संशय व्यक्त...

0
गुरुग्राममधील एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या विशाखापट्टणम येथील रहिवासी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता पी. राधा गायत्री यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात नवीन वळण आले...

नगरपरिषदा/नगरपंचायतींमधील 38 रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न:सरासरी 71.84 टक्के मतदान, उद्या मतमोजणी

0
राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा व १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्यानंतर १० जिल्ह्यांतील...

पंजाबमध्ये बनावट व्हिडिओचा कट उघड:CM मान यांनी जत्थेदारांची भेट घेतली होती, व्हिडिओ त्यांचा नसल्याचे...

0
पंजाबच्या राजकारणात मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांना बदनाम करण्यासाठी रचलेला एक मोठा कट आता पूर्णपणे उघड होताना दिसत आहे. ज्या व्हिडिओवरून विरोधक आणि...

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांना नवीन करार मिळेल, सिंह राशीला नवीन ओळख, धनु राशीला...

0
शनिवार, 20 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत आणि नवीन करार मिळू शकतो. सिंह राशीच्या लोकांना कार्यस्थळी वेगळी...
spot_img

FIFA विश्वचषक 2026: परदेशी खेळाडूंशिवाय फक्त 8 संघ

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: परदेशी खेळाडूंशिवाय फक्त 8 संघ | फ्रान्सकडे ९८ खेळाडू आहेतशार्लोट हरपूर/जोशुआ क्लोक. न्यू यॉर्क10 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६...

डियॉर-गुच्ची देखील स्वीकारत आहेत भारतीय हस्तकला:भारतीय वस्त्रोद्योगाचे नवे पर्व; जग स्वीकारत आहे, असे करा...

0
भारतीय हँडलूम आता फक्त लग्न आणि सणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. चंदेरी, जामदानी, इकत, कोटपद आणि कांजीवरम यांसारखे पारंपरिक वस्त्र आता ऑफिस वेअर, कॅज्युअल...

गायक गिप्पी गरेवालच्या घरावर गोळीबार:लॉरेन्स टोळीने म्हटले होते – सलमानला सांगा येऊन वाचवावे, गायकाने...

0
पंजाबचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते रुपिंदर सिंग उर्फ गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडा येथील घरावर 2023 साली गोळीबार झाला होता. काही काळानंतर लॉरेन्स गँगने...

फुली सेल्फ ड्राइव टेस्ला मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू:6 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर...

0
एलन मस्कची EV कंपनी टेस्ला इंडियाने भारतात आपली सर्वात लांब इलेक्ट्रिक SUV मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू केली आहे. ही भारतात टेस्लाची पहिली...
error: Content is protected !!