Homeदेश-विदेशब्लॅकमेल करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत आरोपीला अशी शिक्षा सुनावली...

ब्लॅकमेल करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत आरोपीला अशी शिक्षा सुनावली की…’


अण्णा युनिव्हर्सिटी बलात्कार प्रकरण: देशातील विविध शहरांमध्ये छेडछाड, बलात्काराच्या अनेक घटना समोर येत असतात. अशा शिक्षांमध्ये आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, ज्यामुळे कोणी असे गुन्हे करण्यास धजावणार नाहीत, अशी जनभावना असते. पण एका बलात्काराच्या घटनेत कोर्टाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये चेन्नईच्या आण्णा विद्यापीठात 19  वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली होती.

काय म्हणाले न्यायाधीश?

बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनावताना न्यायाधिशांनी महत्वाचे विधान केले. आरोपीला किमान 30 वर्षे तुरुंगात राहावे लागेल. त्याच्यावर कोणतीही दया दाखवू नये, असे न्यायाधीश एम. राजलक्ष्मी म्हणाले. न्यायाधीश राजलक्ष्मी यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर २ जूनपर्यंत शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला होता. ज्यामध्ये आज न्यायालयाचा निर्णय समोर आला आहे. याप्रकरणात शिक्षा सुनावताना आरोपी ज्ञानशेखरनला आजीवन कारावासाची शिक्षा आणि 90 हजार रुपयांचा दंडही ठोठावलाय.

महिला न्यायालयाने सुनावली शिक्षा

अणा विद्यापीठ कॅम्पस बलात्कारात विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक छळ प्रकरणात तामिळनाडूतील चेन्नई येथील महिला न्यायालयाने आरोपी ज्ञानशेखरनला बलात्कारासह 11 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले. न्यायाधीश एम. राजलक्ष्मी यांच्या नेतृत्वाखालील न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत ही शिक्षा सुनावली. या प्रकरणातील आरोपपत्र 24 फेब्रुवारी रोजी विशेष तपास पथकाने (एसआयटी) दाखल केले. त्यांनी ग्रेटर चेन्नई पोलिसांकडून प्रकरण ताब्यात घेतले.

विद्यार्थिनीला धमकावून बलात्कार

घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी रस्त्याच्या कडेला बिर्याणी विकणारा आणि गुन्हेगारी कारवायांचा इतिहास असलेला गुन्हेगार ज्ञानशेखरन याला अटक केली. ही घटना 23 डिसेंबर 2024 रोजी घडली. पीडित मुलगी इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी होती आणि तिच्या पुरुष मित्रासह कॉलेज कॅम्पसमध्ये होती. ज्ञानशेखरनने त्यांना एक बनावट व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केले. व्हिडीओ लोकांना शेअर केला तर तुला कॉलेजमधून काढून टाकले जाईल अशी धमकी दिली होती.

त्यानंतर त्याने मुलाला जबरदस्तीने तेथून निघून जाण्यास भाग पाडले आणि मुलीला कॅम्पसच्या एका निर्जन भागात घेऊन गेला. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकडून मुलाची चौकशी सुरू आहे असे भासवून त्याने पीडितेला आणखी धमकावले. जेव्हा तिने त्याच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला तेव्हा ज्ञानशेखरनने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि व्हिडिओ देखील बनवला.

विद्यार्थ्यांना धमकी दिली

आरोपीने विद्यार्थीनीचा फोन नंबर घेतला आणि तिला ब्लॅकमेल केले. जर ती पुन्हा भेटली नाही तर व्हिडिओ तिच्या वडिलांना आणि कॉलेज अधिकाऱ्यांना पाठवण्याची धमकी आरोपीने दिली. असे असताना मुलीने गप्प राहण्यास नकार देऊन पोलीस तक्रार करण्याचे धाडस दाखवले. तिच्या कुटुंबाच्या आणि कॉलेज प्रशासनाच्या मदतीने तिने दुसऱ्याच दिवशी कोट्टूरपुरम ऑल वुमन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे ज्ञानशेखरनला अटक करण्यात आली.

खटल्यादरम्यान आरोपीच्या वकिलाने वैयक्तिक कारणांचा उल्लेख करून शिक्षेत सौम्यता आणण्याची विनंती केली होती. पण गुन्ह्याचे जघन्य स्वरूप आणि आरोपीचा गुन्हेगारी इतिहास पाहता सरकारी वकिलांनी शिक्षेवर तीव्र आक्षेप घेतला होता. न्यायाधीश राजलक्ष्मी यांनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर 2 जून रोजी शिक्षेवरील निर्णय राखून ठेवला. हा निर्णय पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले गेले. शैक्षणिक कॅम्पसमध्ये महिलांना लक्ष्य करणाऱ्या गुन्ह्यांविरुद्ध एक मजबूत संदेश या शिक्षेकडे पाहिले जात आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!