HomeमनोरंजनWhat is the cost of IPL Trophy Is really made of gold...

What is the cost of IPL Trophy Is really made of gold You will be shocked to hear the price| IPL ट्रॉफीची किंमत किती असते माहितेय? झळाळती ट्रॉफी खरंच सोन्याची असते का? किंमत ऐकून व्हाल थक्क; वर्ल्ड कपपेक्षाही आहे महागडी


इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात श्रीमंत टी-२० क्रिकेट लीग आहे. आयपीएलला प्रत्येक सीजन नेहमीच खूप खास राहिला आहे. खेळाडू, खेळ, मैदान आणि अन्य गोष्टीसोबत आयपीएलमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे त्याची चमकणारी ट्रॉफी. आयपीएल ट्रॉफीचे सौंदर्य तर फारच आहे. तिची सुंदर रचना आणि भव्यता ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. पण कधी तुम्ही विचार केला आहे का की, ही ट्रॉफी बनवायला किती खर्च येतो?  आणि खरंच, ती सोन्याची असते का?

आयपीएल ट्रॉफी सोन्यापासून बनते?

आयपीएलची ही ट्रॉफी सोनेरी रंगात चमकत असते. मग अशावेळी असा प्रश्न पडतो की ही ट्रॉफी सोन्याची असते का? तर ती ट्रॉफी संपूर्ण सोन्याची नसून, त्यामध्ये चांदी, अ‍ॅल्युमिनियम आणि काही इतर धातूंचा वापर केला जातो. मात्र तिच्यावर शुद्ध सोन्याची पॉलिश केली जाते. याच कारणामुळे ती इतकी आकर्षक आणि चकचकीत दिसते. साधारणपणे या ट्रॉफीचे वजन सुमारे 6 किलो असते आणि तिची उंची 26 इंच आहे.

हे ही वाचा: IPL चा एक सामना हरल्यावर किती रुपयांचं नुकसान होतं? समजून घ्या ‘कोट्यवधींचं गणित’

किंमत ऐकून व्हाल थक्क

आयपीएल ट्रॉफीची नेमकी किंमत अधिकृतरीत्या कधीच जाहीर करण्यात आलेली नाही. पण अनेक अहवालांनुसार या ट्रॉफीची किंमत 30 लाख ते 50 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.  भारतातील प्रसिद्ध दागिन्यांच्या ब्रँड ORRA कडून ही ट्रॉफी बनवली जाते. 2008 पासून ही ट्रॉफी ते डिझाईन करत आहेत.

हे ही वाचा: IPL 2025 जिंकणाऱ्या संघाला किती मिळणार बक्षिसाची रक्कम? Playoff मधील संघांनाही मिळणार भरघोस पैसे

वर्ल्ड कप ट्रॉफी स्वस्त की आयपीएलची?

ग्लोबल स्तरावर सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या वनडे क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफीची किंमत अंदाजे 30,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 26 लाख रुपये इतकी आहे. एवढी किंमत असूनही यामध्येही आयपीएल ट्रॉफी किंमतीच्या बाबतीत पुढे असल्याचं दिसून येतं आहे. आजकाल  आयपीएल ट्रॉफी ही फक्त विजेत्यांचा सन्मान नसून, संपूर्ण लीगच्या ग्लॅमर आणि मार्केटिंगचं प्रमुख आकर्षण बनली आहे. यंदाच्या सिजनमध्ये ही ट्रॉफी कोणता संघ उंचवणार हे बघणे रंजक ठरेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

TMC चे 3 माजी राज्यसभा खासदार भाजपत सामील:सुष्मिता, सुखेंदू व प्रकाश चिक यांनी विधानसभा...

0
तृणमूल काँग्रेस (TMC) चे तीन माजी राज्यसभा खासदार सुष्मिता देव, सुखेंदू शेखर राय आणि प्रकाश चिक बराइक गुरुवारी भाजपामध्ये सामील झाले. प्रदेशाध्यक्ष सामिक...

मोशी कचरा डेपो अपघात | आयुक्त सूर्यवंशी यांनी अडकलेल्या नातेवाईकांना दिले आश्वासन

0
मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन...

पतियाळामध्ये संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन केले:बँक मॅनेजर वडील आणि मुलीचा मृत्यू; आई-मुलगा गंभीर अवस्थेत...

0
पंजाबच्या पतियाळा येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विषारी पदार्थ खाल्ला. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, ज्यामुळे सर्वांना राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान...

9 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते, कुंभ राशीच्या...

0
गुरुवार, 9 जुलै रोजी मिथुन राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते आणि व्यवसायात नवीन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या सरकारी...
spot_img

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...
error: Content is protected !!