Homeदेश-विदेशयूके YouTuber vlogger लॉर्ड माईल्स एक वर्षानंतर पाकिस्तानमध्ये चोरलेल्या एअरपॉड्स प्रोचा मागोवा...

यूके YouTuber vlogger लॉर्ड माईल्स एक वर्षानंतर पाकिस्तानमध्ये चोरलेल्या एअरपॉड्स प्रोचा मागोवा घेतात

ट्रॅव्हल व्लॉग्ससाठी प्रसिद्ध असलेला आणि युटूबरवर 1.7 लाखांहून अधिक फॉलोअर्स सबस्क्राइबर्स असलेला युट्यूबर लॉर्ड माइल्सने एक इंटरेस्टिंग गोष्ट शेअर केली आहे. त्याने त्याच्या एक्स अकाउंटवर एक अपडेट शेअर केले आहे. ब्रिटनमधील प्रसिद्ध युटूबर लॉर्ड माइल्स सध्या एका भन्नाट मिशनसाठी चर्चेत आहे.तब्बल एक वर्षापूर्वी दुबईमधील एका हॉटेलमधून चोरीला गेलेले त्याचे एअरपॉड्स प्रो (AirPods Pro)  त्याला थेट पाकिस्तानात ट्रॅक झालेत. आता तो स्वतः तिथे जाऊन ते परत मिळवण्याच्या मिशनवर निघालाय.

एक्स अकाउंटवर दिली माहिती

लॉर्ड माइल्सने आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर एक स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यात त्याचे एअरपॉड्स सध्या पाकिस्तानात कुठेतरी असल्याचं दाखवलं आहे. पोस्टमध्ये तो म्हणतो, “माझे AirPods चोरीला जाऊन एक वर्ष झालं, आणि आता मी स्वतः पाकिस्तानात जाऊन ते परत घेणार आहे!”

युटूबरने दिला थेट इशारा

पयडच्या एका पोस्टमध्ये त्याने सांगितले की हे एअरपॉड्स दुबईच्या एका हॉटेलमधून चोरीला गेले होते आणि आता ते पाकिस्तानात कुठेतरी “Lost Mode” वर ट्रॅक होत आहेत. तो म्हणाला  “मी Lost Mode चालू केलंय आणि तेव्हा-तेव्हा ‘Find Me’ साऊंड प्ले करतो जेव्हा कोणी ते वापरतं आहे हे समजतं. आता मी पोलिस घेऊन त्या भागात घुसणार आणि हे सगळं कॅमेऱ्यावर रेकॉर्ड करणार आहे. चोरांना अजिबात माफ नाही!” असा ठाम इशारा त्याने दिलाय.

त्याने “Taken” या चित्रपटाचा संदर्भ देत एक AI जनरेटेड फोटोही पोस्ट केला, ज्यात लिअम नीसन हातात एअरपॉड्स धरून उभा आहे. फोटोखाली त्याने   “My AirPods were TAKEN! I will find you.” अशी लाईन लिहत इशारा दिला आहे.

नेटिझन्सने उडवली खिल्ली

मात्र यानंतर सोशल मीडियावर लोकांनी मिशनची खिल्ली उडवायला सुरुवात केली. “तू इतका खर्च करून पाकिस्तानात जाशील? त्यापेक्षा नवीन एअरपॉड्स विकत घेणं स्वस्त नाही का?” असे एका युजरने लिहले. दुसऱ्याने लिहिलं, “AirPodsच्या 2% किंमतीत तुला नवीन मिळतील, पण तू विमानतळापर्यंतच 50 पट खर्च करणार.” काहींनी त्याला सल्ले द्यायला सुरुवात केली. म्हणाले  “पाकिस्तानात जे AirPods आहेत ते कदाचित कोणी विकत घेतले असतील. आता ते त्याचे झालेत, तुझं मालकत्व संपलं, पुढच्या वेळी नावाचं स्टिकर लाव.”

लॉर्ड माइल्सचं हे मिशन कितपत यशस्वी होतं हे पाहणं रंजक ठरेल.  पण एका एअरपॉड्ससाठी इतक्या मोठ्या प्रवासासाठी किंमत खरंच वाजवी आहे का?  हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

डियॉर-गुच्ची देखील स्वीकारत आहेत भारतीय हस्तकला:भारतीय वस्त्रोद्योगाचे नवे पर्व; जग स्वीकारत आहे, असे करा...

0
भारतीय हँडलूम आता फक्त लग्न आणि सणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. चंदेरी, जामदानी, इकत, कोटपद आणि कांजीवरम यांसारखे पारंपरिक वस्त्र आता ऑफिस वेअर, कॅज्युअल...

गायक गिप्पी गरेवालच्या घरावर गोळीबार:लॉरेन्स टोळीने म्हटले होते – सलमानला सांगा येऊन वाचवावे, गायकाने...

0
पंजाबचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते रुपिंदर सिंग उर्फ गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडा येथील घरावर 2023 साली गोळीबार झाला होता. काही काळानंतर लॉरेन्स गँगने...

फुली सेल्फ ड्राइव टेस्ला मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू:6 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर...

0
एलन मस्कची EV कंपनी टेस्ला इंडियाने भारतात आपली सर्वात लांब इलेक्ट्रिक SUV मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू केली आहे. ही भारतात टेस्लाची पहिली...

पाक राष्ट्रपती झरदारी म्हणाले- वाराणसीतील गंज शहीदा मशीद धोक्यात:भारताला कारवाई थांबवण्याचे आवाहन

0
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी भारतातील मुस्लिम धार्मिक स्थळांबाबत चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रपती कार्यालयाने शनिवारी त्यांचे निवेदन जारी केले. निवेदनात...
spot_img

डियॉर-गुच्ची देखील स्वीकारत आहेत भारतीय हस्तकला:भारतीय वस्त्रोद्योगाचे नवे पर्व; जग स्वीकारत आहे, असे करा...

0
भारतीय हँडलूम आता फक्त लग्न आणि सणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. चंदेरी, जामदानी, इकत, कोटपद आणि कांजीवरम यांसारखे पारंपरिक वस्त्र आता ऑफिस वेअर, कॅज्युअल...

गायक गिप्पी गरेवालच्या घरावर गोळीबार:लॉरेन्स टोळीने म्हटले होते – सलमानला सांगा येऊन वाचवावे, गायकाने...

0
पंजाबचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते रुपिंदर सिंग उर्फ गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडा येथील घरावर 2023 साली गोळीबार झाला होता. काही काळानंतर लॉरेन्स गँगने...

फुली सेल्फ ड्राइव टेस्ला मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू:6 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर...

0
एलन मस्कची EV कंपनी टेस्ला इंडियाने भारतात आपली सर्वात लांब इलेक्ट्रिक SUV मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू केली आहे. ही भारतात टेस्लाची पहिली...

गुगलने अमेरिकेत सर्च एजंट सादर केला:पार्श्वभूमीवर 24 तास एआय काम करेल; अपडेट्सवर त्वरित अलर्ट...

0
25 वर्षांपासून इंटरनेटवर काहीही शोधण्याची पद्धत जवळपास सारखीच राहिली आहे. जेव्हाही कोणत्याही प्रोडक्टची, फ्लाइट तिकिटाची किंवा एखाद्या बातमीची माहिती हवी असते, तेव्हा आपल्याला...
error: Content is protected !!