Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र राजकारण अजित पवार आणि शरद पवार यांना एनसीपीच्या दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणासाठी...

महाराष्ट्र राजकारण अजित पवार आणि शरद पवार यांना एनसीपीच्या दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणासाठी एनसीपी नेत्यांचा विरोध


महाराष्ट्र राजकारण: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणावरुन मतभेद निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांचा पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध आहे. पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मुद्द्यांनरुन मोठा वाद होऊ शकते. हे मुद्दे कोणते हे देखील या नेत्यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी (SP)ला सोबत घेण्यास पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांचा विरोध असल्याची माहिती मिळत आहे. पक्षात दोन सत्तास्थानं नको अशी पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र, आता दादांच्याच राष्ट्रवादीतच विलिनीकरणावरून मतभेद असल्याची माहिती मिळतेय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास दादांच्या राष्ट्रवादीमधील दोन नेत्यांनी विरोध केल्याची माहिती आहे. पक्षात दोन सत्तास्थानं नको म्हणून अशी भूमिका दादांच्या राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस गटातच विलीनीकरणाच्या मुद्द्यावर तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर केंद्रात प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यात मंत्रिपदावरून रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता. विलिनीकरण झाल्यास जयंत पाटील यांना मंत्रिपद द्यायचं की प्रदेशाध्यक्षपद? याबाबत देखील संभ्रम होऊ शकतो अस विलिनीकरणाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरून संजय राऊतांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र डागलंय. काहींना भाजपसोबत जाण्याची तहान लागल्या खोचक  टोला संजय राऊतांनी लगावला आहे. तहान लागली म्हणून कुणी गटाराचं पाणी पित नाही असा टोला खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी (SP)च्या नेत्यांना लगावला. दरम्यान शरद पवार सत्तेस आल्यास काही लोकांची संधी हुकणार असं म्हणत संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन व्हावं असं विधान रामदास आठवले यांनी केलंय. अजित पवारांकडे राष्ट्रवादी पक्ष असल्याचंही रामदास आठवले यांनी म्हटलंय. तसंच दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आनंद होईल अशी
प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रामलला दरबार कॉर्पोरेट शैली | श्री राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख निवृत्त आय.ए.एस

0
सचिन मुदगल/संतोष सिंग. अयोध्या2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जबाबदाऱ्या आता मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सांभाळतील. ट्रस्टींनी ठरवले आहे की कोणत्याही...

‘माझ्या बापाला मरू द्यायचं नाही…’:ओक्साबोक्शी रडत ‘सैराट’ फेम सल्याने मागितली मदत, काही तासांतच डिलीट...

0
'सैराट' चित्रपटामध्ये परश्याचा जिगरी मित्र 'सल्या' (सलीम) ही भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख सध्या खऱ्या आयुष्यात एका अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरा जात आहे....

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:जीवनात सुख-शांती, समाधान आपल्या ज्ञान, समजूतदारपणा, सत्य आणि सकारात्मक विचारांवर...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; जीवनातील आनंद, शांती आणि समाधान हे आपले ज्ञान, शहाणपण, सत्यता आणि सकारात्मक...

FIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये | आशियाई संघ नाहीतन्यू यॉर्क39 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा2026 फिफा वर्ल्ड कप आता आपल्या...
spot_img

FIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: 32 वर्षांनंतर 6 युरोपियन संघ क्वार्टरमध्ये | आशियाई संघ नाहीतन्यू यॉर्क39 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा2026 फिफा वर्ल्ड कप आता आपल्या...

प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा...

0
भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया...

काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...

0
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...

‘चुकीचे काम करणाऱ्यांवर टीका व्हायलाच पाहिजे’:अयोध्येतील देणगी चोरीवर अनुपम खेर म्हणाले- यामुळे लोकांच्या श्रद्धेवर...

0
चित्रपट अभिनेते अनुपम खेर मंगळवारी अयोध्येत पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी आणि राम जन्मभूमीत दर्शन-पूजन करून भगवान राम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. यानंतर...
error: Content is protected !!