आयपीएल 2025 पात्रता 1: आयपीएल 2025 चा क्वालिफायर 1 सामना गुरुवार 29 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Punjab Kings VS Royal Chellengers Bengluru) यांच्यात होणार आहे. महाराजा यादविंद्र सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम पंजाब येथे हा सामना पार पडणार असून या सामन्यानंतर आयपीएल 2025 ला त्यांचा पहिला फायनलिस्ट संघ मिळेल. तर पराभूत झालेला संघ फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी रविवारी एलिमिनेटर सामन्याच्या विजेत्या सोबत क्वालिफायर 2 सामना खेळेल. पंजाब आणि आरसीबी या दोन्ही संघांनी आयपीएलमध्ये उत्तम प्रदर्शन केलं असून 14 लीग स्टेज सामन्यांपैकी 9 सामने जिंकून प्लेऑफच्या टॉप 2 मध्ये फिनिश केलं आहे
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ सध्या मजबूत स्थितीत असून त्यांनी या सीजनमध्ये 9 सामने जिंकले आहेत. मात्र त्यांची गोलंदाजी थोडी कमजोर आहे. तर दुसऱ्या बाजूला पंजाब किंग्स हा संघ सुद्धा मजबूत आहे. परंतु त्यांचं प्रदर्शन सुद्धा काही सामन्यांमध्ये चांगलं नव्हतं. परंतु आता दोन्ही संघांची अपेक्षा असेल की क्वालिफायर 1 सामन्यात संघांच्या सर्व विभागाकडून चांगलं प्रदर्शन व्हावं. संपूर्ण स्पर्धेत बेंगळुरू संघाने चांगल्या लयीत आहे. मात्र त्यांची गोलंदाजी थोडी चिंतेची बाब आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये गोलंदाजांनी खूप जास्त धावा दिल्या आहेत. प्लेऑफमध्ये त्यांना याकडे लक्ष द्यावे लागेल.
पंजाब आणि आरसीबीचा हेड टू हेड रेकॉर्ड :
पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये 35 सामने झाले असून यापैकी 18 सामने पंजाब किंग्सने तर 17 सामने आरसीबीने जिंकले आहेत. यात आरसीबीची सर्वोच्च धावसंख्या 241 धावा आहे. तर पंजाबची सर्वोत्तम धावसंख्या 232 धावा इतकी आहे. तर आयपीएल 2025 मध्ये पंजाब विरुद्ध आरसीबीमध्ये 2 लीग स्टेज सामने झाले असून यात 20 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात आरसीबीने7 विकेटने विजय मिळवला होता. तर 18 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने 5 विकेटने विजय मिळवला होता.
हेही वाचा : MI ची साथ सोडून अचानक वडिलांच्या मुंबईमधील ऑफिसमध्ये पोहचला सूर्यकुमार; कारण…
पंजाब किंग्सची संभाव्य प्लेईंग 11 :
प्रभासिमरन सिंग, प्रियणश आर्य, जोश इंग्लिश, श्रेयस अय्यर (कर्नाधर), नेहल वधेरा, शशंक सिंह, मार्कस स्टोइनिस, अजमतुल्ला ओमार्जई, हरप्रेत बारार, कैल जिमिसन, विजिकुमार वैशाक/युझक
आरसीबीची संभाव्य खेळणे 11:
विराट कोहली, फिल सलाट, रजत पाटीदार (कर्नाधार), मयंक अग्रवाल, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, रोमियो शेफर्ड, क्रुनल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, नुवान तुशारा/जोश हेझलवुड, सुयाश शर्मा
































