Homeदेश-विदेशश्रीराम राजागोपालन सेवानिवृत्त मध्यमवर्गीय चेन्नई मॅनने 225 कोटी जिंकले लॉटरी एमिरेट्स ड्रॉ...

श्रीराम राजागोपालन सेवानिवृत्त मध्यमवर्गीय चेन्नई मॅनने 225 कोटी जिंकले लॉटरी एमिरेट्स ड्रॉ मेगा 7


भारतीय माणसाला 225 कोटी लॉटरी: कोणाचं नशीब कसं फळफळेल सांगता येत नाही, असं म्हणतात. असाच प्रत्यय संयुक्त सौदी अरेबियामध्ये मागील 20 वर्षांपासून नोकरी करणाऱ्या एका भारतीय इंजिनिअरला आला आहे. खरं म्हणजे हा इंजिनिअर निवृत्त होऊन भारतात परतल्यानंतर त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा सुखद धक्का मिळाला आहे. सौदी अरेबियामध्ये दोन दशकं काम केल्यानंतर निवृत्त झाल्यावर देश सोडण्यापूर्वी या व्यक्तीने डोळे बंद करुन लॉटरीचं तिकीट निवडलं आणि तो मायदेशी कायमचा परतला. मात्र आता ही लॉटरी या व्यक्तीला लागल्याचं लॉटरी कंपनीने जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे बक्षिसाच्या रक्कमेचा विचार केला तर ही परदेशात कोणत्याही भारतीयाला लागलेल्या सर्वात मोठ्या लॉटरीपैकी एक आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण या भारतीयाने डोळे बंद करुन निवडलेल्या नंबरवरुन तब्बल 225 कोटी रुपये जिंकले आहेत.

देश सोडण्यापूर्वी सहज काढलेली लॉटरी

ज्या भारतीयाला ही लॉटरी लागली आहे त्याचं नाव श्रीराम राजगोपालन असं आहे. श्रीराम हे मूळचे चेन्नईचे आहेत. त्यांना 100 मिलियन द्राम्स म्हणजेच 225 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. ‘इमिरिट्स ड्रॉ मेगा 7’ असं श्रीराम यांना एका रात्रीत कोट्याधीश करणाऱ्या लॉटरीचं नाव आहे. मंगळवारी या लॉटरीच्या विजेत्याची जाहीर घोषणा कंपनीने केली. देश सोडण्यापूर्वी आपलं नशीब आजमावून पाहूयात असा विचार करुन श्रीराम यांनी लॉटरीची सोडत काढली होती.

डोळे बंद करुन निवडला नंबर

लॉटरी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 16 मार्च रोजी विक्री करण्यात आलेल्या तिकीटाचा श्रीराम यांनी निवडलेला नंबर हा विजेता नंबर ठरला आहे. ‘इमिरिट्स ड्रॉ’ नावाच्या कंपनीने जारी केलेल्या पत्रकामध्ये श्रीराम यांनी डोळे बंद करुन क्रमांक निवडला होता असंही म्हटलं आहे. “श्रीराम यांनी त्यांच्या फोनवर डोळे बंद करुन स्टायलच्या मदतीने वाटेल ते आकडे निवडले होते,” असं कंपनीने म्हटलं आहे.

विश्वासच बसत नव्हता

“मी निकाल पाहिला तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. मी पुन्हा तो व्हिडीओ प्ले करुन पाहिला. विजेता नंबर स्क्रीनवर झळकत होता तेव्हा मी पुरावा म्हणून स्क्रीनशॉटही काढून ठेवला,” असं श्रीराम यांनी ‘खलीज टाइम्स’ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे.

अनेक पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती निर्माण करण्याची संधी

हा सारा प्रकार म्हणजे ’70 टक्के आनंद आणि 30 टक्के भिती’ असा असल्याचं श्रीराम यांनी म्हटलं आहे. “ही फारच मोठी रक्कम असून याबद्दल मी कधी विचारही केला नव्हता. मात्र हा पैसा केवळ माझ्यासाठी नाही. हा पैसा माझ्या कुटुंबासाठी एक आशेचा किरण आहे. माझ्या मुलांसाठी आणि सर्वांसाठी हे फार आशायादी आहे. प्रत्येक बापाला त्याच्या मुलांचं भविष्य सुरक्षित असावं असं वाटतं. आता मला तसं वाटतंय. अनेक पिढ्यांना पुरेल एवढं धन यामधून निर्माण करता येईल अशी संधी या लॉटरीच्यानिमित्ताने आम्हाला मिळाली आहे,” असं म्हणत श्रीराम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!