Homeदेश-विदेशजगात चौथ्या स्थानी पोहोचला भारत, आता फक्त तीन देश पुढे; प्रत्येकासाठी अभिमानाची...

जगात चौथ्या स्थानी पोहोचला भारत, आता फक्त तीन देश पुढे; प्रत्येकासाठी अभिमानाची बाब!


जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था: भारताने पुन्हा एकदा आर्थिक आघाडीवर झेंडा फडकवलाय. भारताने आता जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलाय. याचा अर्थ आता भारतापेक्षा फक्त तीन देश पुढे आहेत.

नीती आयोगाचे सीईओ बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलाय. आयएमएफच्या आकडेवारीनुसार भारताचा जीडीपी आता 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेलाय.

नीती आयोगाच्या 10 व्या गव्हर्निंग काऊन्सिल बैठकीनंतर आर. सुब्रह्मण्यम यांनी पत्रकारांशी संवाद साधत अत्यंत महत्वाच्या विषयावर भाष्य केले. ‘सध्या जागतिक राजकीय आणि आर्थिक वातावरण भारताच्या बाजूने आहे. सध्या, मी बोलत असताना भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलाय’, असे त्यांनी सांगितले. आज भारताची अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झाल्याचे आयएमएफने म्हटलंय.

आता फक्त तीन देश भारताच्या पुढे

आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी या देशांची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर पुढील अडीच ते तीन वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असेही यावेळी नीती आयोगाचे सीईओ आर. सुब्रह्मण्यम  म्हणाले.

ट्रम्प यांची धमकी, सुब्रह्मण्यम यांचे उत्तर

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतात आयफोनच्या निर्मितीवर नाराजी व्यक्त केली आणि ट्रुथ सोशलवर एक पोस्ट लिहून ही धमकी दिली. ट्रम्प यांनी लिहिलेल्या पोस्टनुसार, ‘मी यापूर्वी अॅपलच्या टिम कुकलाही हे समजावून सांगितले होते. अमेरिकेत विकला जाणारा आयफोनदेखील अमेरिकेतच बनवला जाईल, भारतात किंवा इतर कोणत्याही देशात नाही. जर असे झाले नाही तर अ‍ॅपलला अमेरिकेत किमान 25 टक्के टॅरिफ भरावा लागेल.’ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅपलला दिलेल्या धमकीबद्दल सुब्रह्मण्यम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शुल्क काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण सध्याची परिस्थिती पाहता भारत हेच उत्पादनासाठी परवडणारे ठिकाण राहील. मालमत्ता मुद्रीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू आहे आणि ते ऑगस्टमध्ये सुरू केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नृपेंद्र मिश्रा म्हणाले- राम मंदिराच्या देणगीवर दरोडा टाकला गेला:मंदिर विश्वस्तांनी सांगितले- विश्वासघात झाला, संपूर्ण...

0
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष माजी IAS नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिरात अर्पण चोरीवर उघडपणे दरोडा टाकण्यात आला. मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन...

ऑगस्ट 2026 सर्व 12 चिन्हांसाठी राशिचक्र अंदाज

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा20 जूनच्या रात्रीपासून मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. या राशीत 2 ऑगस्टपर्यंत राहील. वृषभ शुक्राच्या मालकीची रास आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य...

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...
spot_img

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...

आयफोनसह ॲपलची उत्पादने महाग होतील:टिम कुक म्हणाले- चिपच्या कमतरतेमुळे खर्च वाढला, किंमती वाढवणे भाग...

0
टेक कंपनी ॲपल लवकरच आयफोन आणि तिच्या इतर उत्पादनांच्या किमती वाढवू शकते. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या एका...
error: Content is protected !!